" तिळ गुळ घ्या गोड गोड बोला"
मकसंक्रांत म्हंटल की... तिळगुळ, हळदीकुंकू, वाण यांची आठवण होते. तसेच पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सगळेच जण रांगोळीत पतंग रेखाटण्याचा प्रयत्न करतात. मला ही पतंग काढायला खूप आवडतं. परंतु या वेळेस मनात थोडा वेगळा विचार आला ...उन्हाळ्याची चाहूल घेवुन येणारा हा सण त्यामुळे पक्ष्यांसाठी बाल्कनीत पाण्याचे छोटे भांडे भरून ठेवायला हवे याची आठवण झाली... पतंग उडवून झाल्यावर झाडावर राहिलेल्या मांज्यात अनेक छोटे पक्षी अडकतात त्यांना इजा होते हे टाळायला हवे.... चिमण्यांची संख्या कमी झाली आहे ती टिकवण्यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत....
आजही ज्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते त्या चिमण्यांसाठी हि रांगोळी ....

देता दाना , मिळता पाणी
भूक भागते चिमण्या जीवांची
गाती चिव चिव गाणी
सजुदे मैफिल याच सुरांची
किलबिल पडू दे कानो कानी....
©️ अंजली मीनानाथ धस्के
भूक भागते चिमण्या जीवांची
गाती चिव चिव गाणी
सजुदे मैफिल याच सुरांची
किलबिल पडू दे कानो कानी....
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment