#घर_उन्हातलं
लहानपणी इतर भावंडांची खोड्या काढणाऱ्या बबड्या विरूद्ध तक्रार ऐकुन आई त्यांना समजावत नेहमी म्हणायची ," या बबड्याचे घर ना आपण उन्हातच बांधू "
शिक्षा म्हणून त्याला उन्हात उभं करायची. त्याला तसं उन्हात उभं बघून सावलीतल्या भावंडांना आनंद व्हायचा.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून बाहेर गावाहून परतलेल्या बबड्याला आईने आनंदाने घरात न घेता त्याच्या सामानासहित दोन तास कडकडीत उन्हात उभं केलं.
आज मात्र त्याला तसं बघून भावंडांचं काळीज तुटलं.
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment