डिझाइन काढायला बसले की काय कढ़ाव असा प्रश्न मलाही पडायचा. सवई ने डिझाइन काढतांना आपल्या कल्पना शक्तीला भरपूर वाव असतो हे लक्षात आले . यात सिमेट्री राखण्याचे बंधन नसल्यामुळे तुम्हाला हवे तसे डिझाइन तुम्ही काढू शकता. डिझाइन मधे डिझाइन काढणे व त्यातील रंगसंगती या दोघांनाही सारखेच महत्त्व असते. रंगसंगतित एकाच रंगाच्या अनेक छटा वापरूनही तुम्ही डिझाइन खुलवु शकता. रांगोळीत काढलेल्या रेषांना पेन्सिल च्या किंवा बोटाच्या साह्याने इफ़ेक्ट दिल्यास डिझाइन अधिक आकर्षक बनते.
No comments:
Post a Comment