कामिनी (भाग १३)

#कामिनी
#भाग१३
©️ अंजली मीनानाथ धस्के


       कामिनी गायब झाली त्या दिवशीचे बंगल्या समोरच्या नाक्यावरील एटीएमचे फुटेज चेक केले . त्या दिवशी उशिरा रात्री सचिन खडसे याने कामिनीच्या खात्यातून खूप मोठी रक्कम काढली होती.
          घरी न जाता तो बराच वेळ तिथेच कोणाची तरी वाट बघत उभा होता. थोड्या वेळाने तिथे एक मोठा ट्रक येवुन थांबला . सचिन खडसेने ड्राइवरला पैसे दिले आणि तो ट्रक गेला त्याच्या विरूद्ध दिशेने निघून गेला. आता या ट्रकचे रहस्य सोडवणे गरजेचे झाले.
            सीसीटीव्ही  व्हिडिओ झूम करून बघितल्यावर ट्रक चा नंबर मिळाला. मालकाचा पत्ता मिळाला . या ट्रकचा चालक सध्या एका अपघाताच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. तो तुरुंगात गेल्यावरही महिन्याच्या ठराविक तारखेला त्याच्या खात्यात ठराविक रक्कम जमा होत होती. ही रक्कम सचिन खडसे जमा करत होता.
           का जमा करत होता ? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ट्रक चालकाने जो अपघात केला होता त्याची माहिती घेणं गरजेचं होतं. गुंता सुटायला लागला होता. शोध कार्याने वेग घेतला होता. 
        अपघाताची माहिती घेता कळले की कामिनी रहात असलेल्या बंगल्याची देखभाल करणारे  सामंत कुटुंब शेजारच्या गावाहून परत येत असतांना ह्या  ट्रक चालकाचा ट्रॅकवरील ताबा सुटून त्यांच्यावर जावून आदळला. त्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला होता तर  सामंत कुटुंब जागच्या जागीच ठार झाले होते. याची अपघात म्हणून नोंद करण्यात आली होती पण सचिन खडसेच्या सांगण्यावरून केलेले ते खूनच होते. सचिन खडसेचा  हा नवीनच गुन्हा उघडकीस आला होता.
           सचिन खडसेला कोणी मारले याचा शोध लागला नसला तरी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता कोणीतरी त्याचा काटा काढला असावा अशी पोलिसांना खात्री वाटू लागली. कामिनीच्या गायब होण्यामागचा बराच गुंता सुटल्याने तपास कार्याचा वेग मंदावला.
              इकडे गावा बाहेरच्या  माळरानावर गुरख्यांना एक ठीक ठिकाणी पोचे आलेली  पेटी सापडली. पेटी उघडून बघता  त्यात छोट्या छोट्या दोन घुंगरांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यातील एकाने  ती पेटी स्वतः जवळ ठेवून घेतली तर एकाने ते घुंगरू स्वत:च्या काठीला अडकवले.

क्रमशः
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1





कामिनी (भाग १४)

#कामिनी
#भाग१४
#अंतिमभाग
©️ अंजली मीनानाथ धस्के

 
     पोलिसांना मिळालेली माहिती श्रेयाच्या वडीलांना सांगण्यासाठी तपास कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना फोन केला. " श्रेयाची तब्येत आता कशी आहे?" असं विचारल्यावर तिच्या वडिलांनी  सांगितलं ," आम्ही तिकडून इकडे आलो आणि तिची तब्येत बिघडली.  तिच्या पोटात ट्यूमर वाढत आहे. त्यामुळेच तिच्या पोटात वारंवार दुखत होते. सहा दिवसापूर्वीच ऑपरेशन केलं. तिला खूप त्रास झाला. तुम्ही तिला त्या गावातून बाहेर काढण्याचा योग्य सल्ला दिला होता. नाहीतर पोरगी हातची गेली असती. तुमचे खूप खूप धन्यवाद. "
पोलिस  अधिकारी म्हणाले,"  त्यात धन्यवाद कसले. श्रेया मला  माझ्या मुलीसारखीच आहे. जे सांगायला फोन केला ते सांगतो आधी. कामिनी प्रकरण  संदर्भात आम्ही आमचा सगळा तपास पूर्ण केला.  तुम्ही इथून गेल्यावर कामिनीचे मृत शरीरही गुलाबाच्या वाफ्यातच मिळाले. सदाशिव खरात आधीच मरण पावले आहेत. कामिनीचा खून झाला तेव्हा ती गर्भवती होती. एवढंच नाही तर बंगल्याची देखभाल करणाऱ्या सामंत कुटुंबाचा श्रेया रहायला जाण्यापूर्वीच कामिनीचा प्रियकर असलेल्या सचिन खडसेने अपघात घडवून आणला होता. त्यातच ते मरण पावले आहेत."
          त्यांनी हे सांगितलं....
 श्रेयाच्या वडीलांना स्वत:च्या  कानांवर विश्वासचत बसत नव्हता. ते जवळ जवळ ओरडलेच ," काय ?????? कसं शक्य आहे हे???  काही काय बोलताय????" असं बोलत असतांनाच त्यांची नजर  श्रेयाच्या ऑपरेशन बद्दल ऐकुन तिला भेटायला आलेल्या सामंत काका काकूंवर गेली. दुसऱ्या क्षणात  तीच नजर   काकूंशीपोटावर हात ठेवून बोलणाऱ्या  श्रेयाकडे गेली. ऑपरेशन नंतरही श्रेयाच्या पोटाचा आकार वाढलेलाच दिसत होता.
  त्यांची दातखिळी बसली आणि ते धाडकन जमिनीवर कोसळले. पुढचं काहीच त्यांना ऐकू गेलं नाही.

समाप्त
#अंतिमभाग
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करतांना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
या कथेसाठी खास कथेला साजेशी रांगोळी ही काढलेली आहे.
कथेचे १ ते १४ भाग आहेत सगळे भाग anjali-rangoli.blogspot.com  आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.

सगळ्या भागांची लिंक इथे देत आहे. 👇👇👇👇👇
भाग १:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_35.html?m=1

भाग २:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1

भाग ३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_26.html?m=1

भाग ४:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_50.html?m=1

भाग ५:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_76.html?m=1

भाग ६:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_4.html?m=1

भाग ७:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_77.html?m=1

भाग ८:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_92.html?m=1

भाग ९:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_67.html?m=1

भाग १०:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_97.html?m=1

भाग ११:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_17.html?m=1

भाग १२:

http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_47.html?m=1

भाग १३:
http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_21.html?m=1

भाग १४: अंतिम भाग
 http://anjali-rangoli.blogspot.com/2020/05/blog-post_25.html?m=1







नवी दिशा


     #नवी_दिशा 
©️ अंजली मीनानाथ धस्के
         आज ईशाला भेटायला तिची बाल मैत्रीण श्रुती घरी येणार होती. तिने भराभर घर आवरायला घेतलं. एक एक वस्तू जागेवर ठेवतांना मनोमन 'ती नवऱ्याच्या सवयींचा उद्धार करत होती. एरवी सगळं घर सासूबाई आवरून ठेवतात. पण आज मला सुट्टी म्हणून त्याही नातेवाईकांकडे निघून गेल्या. श्रुती येणार म्हणून करतेय आज . रोज रोज मी नाही करणार. त्यांचा मुलगा काडी इकडची तिकडे करत नाही. सगळ्या अपेक्षा माझ्या एकटीकडून....'
  थोड्याच वेळात तिची चीड चीड सुरू झाली आणि तितक्यात दारावरची बेल वाजली. तिने बळेच हसून श्रुतीच स्वागत केलं.  ईशाच् काहीतरी बिनसलं होत हे श्रुतीला लगेच जाणवलं.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . ईशाने सगळा बेत श्रुतीच्या आवडीचा केला होता. सगळं आवरल्यावर दोघी बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या . श्रुतीने न राहवून ईशाला विचारलच," तुझं काय बिनसलं आहे ? "
तिने असं विचारताच ईशा मोकळे पणाने सांगू लागली,
" इतकी वर्षे झालीत लग्नाला पण सौरभ एक वस्तू जागेवर ठेवत नाही. मला पसारा केलेला आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्यात किंचित बदल होत नाही. ओला टॉवेल पलंगावर टाकू नको म्हणून हजारदा सांगितलं तरी रोज ओला टॉवेल पलंगावरच टाकून  मोकळा होतो.
बाहेरून आल्यावर तर कधीच चपला उचलून जागच्या जागी ठेवत नाही. 
      कितिदाही जेवणाच टेबल आवरून ठेवा . हा बाहेरून आला रे आला की सगळं सामान त्यावर ठेवून देतो.
 कपाट आवरून ठेवलं की हा काहीतरी शोधा शोध करून सगळ्या कपड्यांची घडी मोडतो आणि वेळा नाही म्हणत घाई घाईत त्यांचे बोळे करून कपाटात कोंबून देतो. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्याने मला त्रास होतो पण त्याला त्याचं काहीच वाटत नाही. कितीदा समजावून सांगितलं, चीड चीड केली तरी त्याचं ठरलेलं उत्तर असतं ..... 'या छोट्या छोट्या गोष्टी मला  लक्षात रहात नाही".
घरात असं वागणं तर बाहेरच्या व्यवहारातही अनेक गोंधळ घालून ठेवतो. एक काम धड करत नाही. अग साधी भाजी आणायला सांगितली तर धड आणत नाही. चुकून आणली तर तीही मला न आवडणारीच आणतो.
सासू सासरऱ्यांनी सौरभला नुसतं लाडावून ठेवलाय . काहीच वळण लावले नाही की जबाबदारीने वागण्याची सवय लावली नाही. हा  कोणतीच गोष्ट जबाबदारीने करत नाही. इतरांचे जबाबदारी घेणारे नवरे बघितले की हेवा वाटतो त्यांचा. संसार माझ्या एकटीचा थोडीच आहे. मीही देते सगळी जबाबदारी सासू सासऱ्यांवर ढकलून. तसंही त्यांना सगळी सूत्र त्यांच्याच हाती हवी आहेत. मुलाचे लाड केलेत. आता सूनेचेही करा म्हणते. सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनच का?"
"
           ती श्रुतीला तिच्या तक्रारी सांगत होती  तेवढ्यात चिन्मय शाळेतून आला. आल्या आल्या त्याने दारातच बुट आणि सॉक्स काढून फेकले. त्याच्या खोलीत जाता जाता दप्तर जेवणाच्या टेबलवर ठेवून दिलं. खोलीत गेल्यावर तर पलंगावर शाळेचा गणवेश काढून टाकला . हात पाय धुवून असल्यावर ओला टॉवेल ही तिथेच टाकून दिला आणि ईशाला मोठ्याने आवाज दिला," आई भूक लागली. लवकर काहीतरी खायला दे"   ईशाने तत्परतेने   ," थकल का ग माझं पिल्लू" म्हणत घाईने त्याच्या आवडीचा चिवडा भरलेली प्लेट आणि  त्याच्याच  आवडत्या चॉकलेट दुधाचा पेला त्याच्या हातात दिला.   त्यानेही पटापट सगळं संपवलं आणि तिथेच सगळा पसारा टाकून तो खेळायला पसार झाला.
      त्याने केलेला पसरा आवरून ठेवत ईशाने कॉफी ही करायला घेतली.
        ईशा सगळं जागेवर ठेवतांना श्रुती तिच्याकडे आश्चर्याने बघत होती.
ईशाने कॉफीचा कप तिच्या हातात देत विचारलं," येवढं आश्चर्याने काय बघते आहे "
श्रुती पटकन् बोलून गेली ," तुलाच बघते आहे, थोड्यावेळापूर्वी नवऱ्याच्या तक्रारी सांगत होतीस. त्याच्या वाईट सवयींसाठी सासूला दोष देत होती. आता स्वतः च्या मुलाच्या त्याच वाईट सवयींकडे किती सहज दुर्लक्ष केलंस "
तिच्या या बोलण्याने ईशा खजील झाली. श्रुती तिला समजावत बोलली ," तुझ्याशी सौरभच
 लग्न वयाच्या २८ वर्षी झालं. तोपर्यंत चांगल्या वाईट सवयीने तो घडलेला होता. २८ वर्षांच्या सवयी बदलणे तितकसं सोपं नाही. प्रयत्नपूर्वक नवीन सवयी आत्मसाद केल्याशिवाय ते सहजासहजी शक्य नाही. त्या सवयीसाठी सासूला दोष देवून मोकळी झाली हे ही कबूल पण चिन्मय तर तुझा मुलगा आहे. तूझ्या पोटी जन्म घेतला आहे. त्याच्यातही त्याच सगळ्या सवयी आहेत ज्या तुला सौरभमधे असलेल्या  आवडत नाही. चिन्मयच्या या सवयीसाठी कोण जबाबदार??? सौरभला बघून तो शिकला असंही तू म्हणू शकते पण मग तुला बघुन तो काहीच शिकला नाही का ? विचार कर बायको या नात्याने तू सौरभला बदलू इच्छिते... त्याच्यावर चीड चीड करतेस पण आई म्हणून चिन्मयच्या सवयींवर पांघरूण घालतेस. तुझं सौरभवर प्रेम होत म्हणून त्याच्याशी लग्न केलस ना .... की त्याला चांगल्या सवयी लावायच्या होत्या म्हणून त्याच्याशी लग्न केल? सौरभनेही काही चांगले बदल स्वतःमधे करायला हवेत  किंबहुना ते केलेही असतील फक्त तुला ते जाणवत नसतील. किंवा त्याने केलेल्या चुका शोधण्याच्या नादात त्यांच्याकडे तुझं लक्ष जात नसेल. सतत तक्रार नोंदवून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तो जसा आहे तसाच स्वीकारत बदल सुचवलेस तर त्याच्यातही बदल होईल. छोट्या छोट्या बदलाचे कौतुक करत राहिलीस तर तुला हवे असलेले मोठे बदल ही घडून यायला वेळ लागणार नाही.
 सासूला दोष देणं सोपं आहे ग ... परंतु आई म्हणून तू चिन्मयला घडवण्यात  कमी पडलीस तर उद्या तुझाही उद्धार होणार आहे हे विसरू नको. चीड चीड करून सौरभ आणि सासूला दोष देण्यापेक्षा आई म्हणून स्वतःला उत्तम घडव.... सगळं सोपं होईल. सासू सासऱ्यांनी सौरभला जबाबदारीची जाणीव करून दिली नाही हे खरंच आहे पण तूही चिन्मय च्या बाबतीत तेच करते आहेस. तुला सौरभ मधे बदल हवे आहेत पण त्या नादात तुझं चिन्मय कडे दुर्लक्ष होतंय. तुला त्याच्यासोबत अधिक वेळ घालवायला हवा. तो जितका वेळ बाबांना बघतो त्याच्यापेक्षा जास्त वेळा त्याला तुझी घरासाठीची तळमळ दिसायला हवी. मुलांना चांगल आणि वाईट दोन्ही कळत .  एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही दोघांनी मिळून चिन्मयशी संवाद साधा. त्याच्याशी बाप म्हणून बोलावं लागलं की सौरभमधे आपोआप जबाबदारीची जाणीव वाढीस लागेल. सौरभ ला जबाबदारी घेता येत नाही पण तुला ती घेता येते तरी तू सौरभकडे बोट दाखवून पळवाट शोधते आहे. खरं सांग तुम्हा दोघांमध्ये जास्त चूक कोणाची ?
मला माहीत असलेली ईशा जबाबदारी घेणारी होती ... टाळणारी नाही.
 तुझ्यात क्षमता आहेत म्हणून तुझ्याकडून अपेक्षा आहेत.  तुमच्या नात्यात ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतही असतील पण सासू सासऱ्यांना तुझ्या क्षमतांची त्यांना जाणीव आहे हेही नसे थोडके.  इतर अनेक घरांमध्ये सून बिनकामाची म्हणून तिच्या कडून काहीच अपेक्षा नसतात . त्या घरांमध्ये सगळ्या अपेक्षा मुलांकडून असतात. त्यांच्याशी तुलना करायला आवडेल? जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य असतो. कोणाचाही हेवा करू नकोस. तुझ्या कडे जे चांगले आहे ते बघ ... त्यावर लक्ष केंद्रित कर
 ."
      तिच्या बोलण्याने ईशाला तिची चूक कळली.सौरभमधे चांगले बदल घडवून आणण जेवढं गरजेचं आहे त्याही पेक्षा आई म्हणून चिन्मयला भविष्यासाठी चांगल्या सवयी लावणं आवश्यक आहे. जुन्याच नात्यांना नव्या दृष्टिकोनातून बघायला हवं.
 याची तिला जाणीव झाली. श्रुतीला तिने प्रेमभराने निरोप दिला. जाता जाता श्रुतीनेही तिच्यासाठी आणलेले खास फ्रेंडशिप बॅंड सारखे दिसणारे ब्रेसलेट तिच्या हातात घातले. श्रुती तर तिच्या घरी निघून गेली. पण जाता जाता आपल्या
 जिवलग मैत्रीणीच्या विचारांना नवी दिशा देवून गेली..
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com वर उपलब्ध आहे.
या कथेला साजेशी दोन मैत्रिणींची फुलांची रांगोळी.




मोकळा श्वास (कुटुंब दिना निमित्त)


#मोकळा_श्वास
©️ अंजली मीनानाथ धस्के

    रमाकाकू गेली तीन वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. मुलगा समीर आणि सून श्वेता दोघंही नोकरीला . छोटी ईश्र्वरी आणि केतन शाळेत शिकत होते. काकूंना दिवसभराची सोबत व्हावी म्हणून सविताला कामाला ठेवलेलं
       काकूंनीही मुख्याध्यापिका म्हणून नोकरी केलेली. नोकरीवर निवृत्ती मिळून सहा महिने झाले नसतील इतक्यात त्यांच्यावर पक्षाघाताचा आघात झाला. त्याचं आयुष्य बदलून गेलं. फिरण्याची आवड , नव नवीन पदार्थ बनवून बघण्याची आवड  त्यामुळे  काकूंना परावलंबी जीवन नको वाटू लागलं.
 पुन्हा स्वतःच्या उभं रहाता यावं म्हणून जिद्दीने अनेक उपाय केले. त्यालाच यश आलं होतं. त्या भींतीचा  आधार घेत घरातल्या घरात फिरू लागल्या.
         आता त्यांना खोली बाहेर पडण्याचे वेध लागले पण इतक्यात कोव्हीड१९ मुळे लॉक डाऊन घोषित झाले. घराबाहेर पडणारी मंडळीही घरात बंदिस्त झाली.
काही दिवसातच श्वेताची चीड चीड सुरू झाली. मुलांचा गोंधळ, समीरच वर्क फ्रॉम होम, सविताची लुडबुड याने तिला तिचा निवांत वेळ मिळेनासा झाला. तिलाही वर्क फ्रॉम होम असून माहेरी जाता येत नव्हतं याच तर दुःख होतंच पण घरातल्या कामांची सवय नसल्याने त्यातच दिवस जात होता याचीही खंत होती. एरवी वेळात वेळ काढून ती रमा काकूंच्या खोलीत जावून बसायची. ऑफिस मधून आलं की सध्याकाळचा चहा दोघी सोबतच घ्यायच्या. सासू सुनेचे नाते असले तरी कधी त्यांच्यात मतभेद नव्हते. ती आवर्जून काकुंशी दिवसभर केलेल्या कामाबद्दल अनुभवाबद्दल मन मोकळं बोलायची.  तिचं हे बोलणं ऐकून काकूंना ही उत्साह वाटायचा. नवीन गोष्टींची माहिती मिळायची.
  पण आता ती सतत चीड चीड करू लागली. मुलांनी पसारा केला की त्यांच्यावर ओरडू लागली. बाहेर खेळायला जात येत नव्हतं मग ती मुलं तरी काय करतील ती रमा काकूंकडे जावून आईची तक्रार करत होती. श्वेता चहा घेवून आली तरी आता फारस बोलत नव्हती. काकूंनी चौकशी केली की ," कित्येक दिवस बाहेरच पडत नाही तर काय विशेष असणार आहे बोलण्यासारखं" म्हणून ती बोलणं टाळत असे.
       आज तर काकूंना ती खोलीत आली तेव्हा अधिकच खिन्न जाणवली. नेहमी ती मन मोकळं करते आज आपणच मोकळेपणाने बोलू असं ठरवून काकू तिला बोलल्या ," श्वेता अग आज आपली ईश्र्वरी विचारात होती की आजी तुला नाही का ग कंटाळा येत एकाच खोलीत राहण्याचा , आम्हाला तर खूप कंटाळा आला ग घरात राहण्याचा"
श्वेता सहज बोलून गेली," आगावू झाली आहे कार्टी"
काकू पुन्हा बोलल्या ," आगावू नाही ग ... फार विचारी आहे. माझ्यात आणि तिच्यात तुलना केल्यामुळे तिला असे प्रश्न पडतात. पण कसं समजावं तिला अग कोरोना आता आला . मी गेली कित्येक वर्षे खोलीतच कोंडल्या गेले आहे. खूप खूप शिकवलं ग या दुखण्याने आधी मीही चिडचिडी होते पण आता संयम बाळगायला शिकले, तडजोड करायला शिकले,
 चार भिंतीत सुखाने नांदायला शिकले
आल्या संकटाचे संधीत रूपांतर करायला शिकले
छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचायला शिकले .माणूस म्हणून घडतांना एक पाऊल पुढे टाकायला शिकले. शिकले कसलं .... शिकावच लागलं. खोलीतल्या खोलीत चीडचीड केली असती तर तू माझ्याकडे बोलायला आली नसती. सतत तक्रारी केल्या असत्या तर समीरने बोलणं टाळलं असतं. दुखण्याच कौतूक करत बसले असते तर माझी रवाणगी नाईलाजाने तुम्हाला दवाखान्यात करावी लागली असती. इथे नातवंड डोळ्यासमोर खेळत असतांना दवाखान्यात जायला कोणाला आवडेल?  तुमचा अवती भोवती वावर असल्याने जो आनंद मिळतो त्याची किंमत फार मोठी आहे. एकट्याने रहाणाऱ्याला बघितलं की कुटुंबाचे महत्त्व पटते. आपण भांडलो तर समजूत काढायला कोणीतरी हवं असतं. काही विशेष बनवलं तर कौतुक करायला आपलं माणूस लागतं. घर कामात कितीही कष्ट पडले तरी आपल्या माणसाच्या मिठीत त्याचा विसर पडतो. मुलांच्या लाडिक हट्टाने.... नव नवीन फर्माईशिंनी तर जगणं सार्थकी लागल्याचा भास होतो. खोलीत जरी अडकून पडले तरी ही खोली माझ्या माणसांच्या घरट्यात आहे हे काय कमी आहे. माझ्या ह्या घरट्यात चिव चिव करणारी माझी पिल्ल मुक्त बागडतात याच समाधान खूप आहे. संकटाचे दिवसह जातातच ग..... पण या संकटात आपण सगळे सोबत आहोत हे किती महत्त्वाचं. " डोळा मारत त्या श्वेताला हसत म्हणाल्या," तसंही ..... असली मजा तो सब के साथ ही आता हैं

काय समजलीस?" 
          श्वेताला तिची चूक कळली. लेकीच्या मायेनी ती रमा काकूंच्या कुशीत शिरली. तिला तसं पाहून ईश्र्वरी, केतन आणि समीर ही सगळी काकूंना बिलगली.  काकूंनीही आईच्या मायेने त्यांना आपल्या पंखा खाली घेतलं.
चार भिंतीच्या आत घराने पुन्हा मोकळा श्वास घेतला.

©️अंजली मीनानाथ धस्के
     
टिपः सर्व वाचकांना कुटुंब दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
   लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

     इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.bligspot.com





गणेश चतुर्थी २०२०

#गणेश_चतुर्थी
   गणेश चतुर्थी निमित्त काढलेली ही रांगोळी खास व्हिडिओ स्वरूपात तुमच्या भेटीला येत आहे.
आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करून कळवा.






श्री गणेशा

#श्रीगणेशा
#सुखकर्ता
#विघ्नहर्ता
#अधिपती
©️ अंजली मीनानाथ धस्के
   आज इंद्राने तत्काळ बैठक बोलावली होती.  सगळे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर गोंधळून गेलेले होते. तेवढ्यात जमलेल्या सगळ्यांवर वरूण देवाने सॅनिटायझरचा पाऊस पडला . वायू देवाने सगळ्यांना कोरड केलं. विश्वकर्मा याने सगळ्यांना मास्क आणि हँड ग्लोजचे वाटप केले.
     दरबारात  इंद्र देवाचे आगमन झाले. आजच्या चर्चेचा विषय गंभीर होता. 
     कोरोना नावाच्या दानवाने पृथ्वीवर थैमान घातले होते.
     विष्णुदेवाने वरूण देवाला पृथ्वीवर अवकाळी पाऊस पाडण्यासाठी  कारणे द्या अशी नोटीस पाठवली होती. तर ब्रम्ह देवाकडून यमाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले होते.

 कोरोनामुळे मृत्यू मुखी पडलेले अनेक मनुष्य प्राणी स्वर्गात आणि नरकात दाखल होत होते. त्यांना इतर लोक सामावून घ्यायला तयार नव्हते . त्यांची वेगळी सोय करण्यात यावी अशी मागणीही केली जात होती.
धन्वंतरी  देवावर कामाचा ताण वाढत होता. यमाला उसंत घ्यायला वेळ मिळतं नव्हता.
सगळे देव आपापली कामे व्यवस्थित करत असूनही पृथ्वीवर मात्र काहीच सुरळीत सुरू नव्हतं
          चित्रगुप्त ही पुरता गोंधळलेला होता. सगळ्या मनुष्य प्राण्यांच्या आयुष्याच्या हिशेबात मृत्यू चिन्ह गंडांतर योग लिहिला होता. पण यात एकच मेख होती . जो कोणी स्वतःची, समाजाची  स्वच्छता पाळत नसेल आणि मुक्त भ्रमण करेल त्यालाच शोधून मृत्यु पाश आवळायचे असाच यमाचा हुकुम होता.
         सगळ्यांचे पालनपोषण करणाऱ्या विष्णु भगवंताला मोठीच काळजी लागून राहिली होती. जितके ते जगरहाटी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत तितकेच इतर देवांच कामकाज नियंत्रणाबाहेर जावू लागले होते.
     धन्वंतरी देवाने तर संशोधनाच्या मदतीने मनुष्याला अमर करण्याचा चंगच बांधला होता. त्या संशोधनातूनच हा नवीन दानव जन्माला आला होता आणि  बघता बघता या कोरोना दानवाने संपूर्ण पृथ्वीला विळखा घातला होता. मानवाने त्याच्याशी दोन हात करायची तयारी सुरू केली न केली तोच आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यमही कोणत्या ना कोणत्या मार्गाने पृथ्वीवर प्रवेश करू लागला . कुठे आग लागली, कुठे भूकंप, कुठे अती वृष्टी,  कुठे विषारी वायू गळती  तर कुठे मोठं मोठे अपघात घडू लागले.
        मृत्यूचा दर येवढा वाढू लागला की ब्रम्ह देवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला.

       महादेव मात्र हिमालयाच्या शिखरावर शांत... ध्यानस्थ बसून होते.
    गेली अनेक वर्षे मानवा प्रमाणेच देवांचाही मुजोर, भ्रष्ट आणि मनमानी कारभार सुरू होता. सत्यापेक्षा, कर्तव्यापेक्षा अहंकार मोठा झाला होता. पुन्हा एकदा देवांमधे स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू झाली होती.
          म्हणूनच की काय कोरोना दानवा विरूद्ध एकजुटीने लढण्या ऐवेजी वरुण देवताही वाटेल तेव्हा पाऊस पाडत होता. नदी नाल्यांना पूर आणत होता. सागर देवता ही त्याचीच री ओढत भरती अहोटीचा खेळ खेळत होता. वायू देवताही स्वतः चे महत्व सिद्ध करण्यासाठी वेगवान वादळे निर्माण करत होता. सूर्य देवही  तप्त तापून सुरू असलेल्या चढाओढीत त्याची दखल घ्यायला भाग पाडत होता.
       
महादेवाने समजावू पाहिलं होतं पण स्पर्धेच्या नादात  सत्तेचा उन्मत्तपणा, अहंकार  सगळे बाळगून होते. स्वतःची कर्तव्ये विसरून सत्ता मिळवण्याची हाव करत होते.
त्यामुळे  ' जे जे होईल ते ते पहावे ' अशीच भूमिका महादेवाने घेतली होती.
     
           कोरोना दानव महा ताकदवर झाला होता. कोणाचेच त्याच्यावर नियंत्रण नव्हते. त्याच्या दहशतीने भूतलावरील सगळे व्यवहार ठप्प झाले होतेच पण आता स्वर्ग लोकातही त्याची भीती पसरली होती.
       पृथ्वीवरील अनेक मनुष्य प्राण्यांनी देवतांना साकडे घातले, नवस बोलले, अभिषेक केले . काहींनी देवांना पाण्यात ही ठेवले होते. पण या महाकाय दानवापुढे कोणाचेच काहीच चालत नव्हते. सध्यातरी त्याला हरवण्याचा उपाय म्हणून घरातच राहण्याचा  सल्ला दिला जात होता. सगळे व्यवहार थांबले होते.  परंतु भुकेला थांबवणं कठीण . हातावर पोट असणारे देवांनाच दुसणे देत होते.  संयम सुटत चालला होता.  देवावरची श्रद्धा ढळू लागली होती. काळ मात्र कोणासाठी थांबायला तयार नव्हता.
     एकाबाजूला  देवांकडे रोज नव नव्या तक्रारींचे ढीग येवुन पडत होते. नव नवीन संकटे उभी रहात होती तर दुसऱ्या बाजूला कोरोना दावन पृथ्वी भोवतीचे त्याचे फास आवळतच होता.  देवांना वर्क फ्रॉम होम करणे अशक्य असल्याने त्यांनी वेश बदलून  कोरोना योध्यांच्यारुपात काम सुरू केले होते. येवढं करून  मानव त्यांचीही विटंबनाच करत होता. एकीकडे मूळ  देव रूपाला मंदिरात कैद केल्या गेले होते तर दुसरीकडे कोरोना योध्याच्या रुपात ही देवांच्या  प्राणांवर  बेतत होते. इकडे आड तिकडे विहीर अशीच सगळ्यांची अवस्था झाली होती.
    इंद्राच्या बैठकीत सगळेच देव हवालदिल झालेले होते. 
     
सगळे फक्त आपल्या तक्रारी सांगत होते. प्रत्यक्षात मात्र  कोणीच कोणाला सहकार्य करत नव्हते. आलेल्या अडचणींवर मात करण्याचा उपाय कोणाकडेच नव्हता.
   तेवढ्यात नारद मुनींनी सुचवले ,"  सगळ्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महादेवाचा धावा करावा. ते देवांचेही देव आहेत. ते या संकटावर नक्कीच उपाय सुचवतील "
       
        सगळ्यांनी लगेच  नारद मुनींचे म्हणणे
 मान्य केले. सगळे ताबडतोब हिमालय शिखरावर पोहचले. शिवाला ध्यानस्थ बघून आवाज देण्याची  कोणाचीच हिंमत होईना.
 अखेर इंद्राच्या आग्रहाखातर ब्रम्हदेव आणि विष्णुदेव यांनीच सगळ्यांची अडचण महादेवापुढे  मांडली.
     
    महादेवांनी कोरोना दानवापासून  पृथ्वीचे रक्षण  करावे अशी सगळ्यांनी मागणी केली.
       महादेवाने मंद स्मित केले.
         सगळे महादेवाला विनंती जरी करत होते तरी प्रत्येक जण आपापल्या परीने आल्या संकटाचे "देवकारण" करू पहात होता. या संकट काळी एकत्र येऊन लढण्यापेक्षा दुसऱ्याला कमी लेखून स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्याची संधी शोधत होता.
     खरं तर हे युद्ध कोरोना नावाच्या दानवाविरूद्ध जितकं होतं तितकंच ते स्वतःच्या अहंकराविरुद्धही होतं. कोरोना नावाचा दानव मुळात शक्तिशाली नव्हताच. त्याला प्रत्येकाने स्वतःच्या अहंकाराचे खतपाणी देवून मोठे केले होते. त्यामुळे  कोणा एकाच्या प्रयत्नाने तो नष्ट होणं केवळ अशक्य  झालं होतं. आता  तो दानवच सगळ्यांच्या नाड्या आवळत होता.
   
    महादेवांना जाणीव झाली की,  या सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्याची वेळ आली आहे.  प्रत्येकाने कितीही मनमानी कारभार केला तरी. आजही देवांचा अधिपती गणेशच आहे.  जग हितासाठी गणेश जे करेल तेच सर्वोत्तम असेल असा विश्वास प्रत्येकाने बाळगायला हवा.
 प्रत्येकाच्या अहंकाराने मोठ्या झालेल्या  कोरोना दानवाविरूद्ध एकट्याने लढण्यात काहीच अर्थ नाही.   सगळ्यांनी एकजुटीने त्याचा सामना करणे आवश्यक आहे सगळ्यांनी आपल्या पदापेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवे
आणि कर्तव्याच्या या लढाईला एक उत्तम नेतृत्वाची गरज आहे .
        शेजारीच लाडू खात बसलेल्या गणेशाकडे  महादेवाने एक प्रेमळ कटाक्ष टाकला. गणेशाच्या हातातील लाडू संपताच महादेवाने पृथ्वीला त्याच्या सुरक्षित हाती सुपूर्त केले. तिचे रक्षण करण्याची आज्ञा दिली.
        गणेशालाही तत्काळ त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली. देवांनाही त्यांची चूक कळली. " देवकारण" विसरून सगळे एकजुटीने ,एकमताने कोरोना दानवाविरुद्ध लढायला तयार झाले.
     सगळ्या विघ्नांचा नाश करण्यासाठी सुखकर्ता ही सज्ज झाला. गणेशाने वडिलांची आज्ञा प्रमाण मानत कोरोना  दानवाच्या अंतासाठीच्या युद्धाचा " श्री गणेशा " केला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#AnjaliMinanathDhaske
टिपः सोबतीला गणेश चतुर्थी निमित्त काढलेली ही रांगोळी खास तुमच्या भेटीला आली आहे.
इतर
 लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. इतर नावाने किंवा विना नावाने शेयर करू नये.
इतर लिखाण anjali-rangoli.blogspot.com या linkवर  उपलब्ध आहे.

आवरा सावर



   
#आवरा_सावर
©️ अंजली मीनानाथ धस्के

      बाळराजेंनी खोली आवरायला घेतली. पण एकट्याने होईल इतकं सोपं हे काम नाही याचा अंदाज आल्याने त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. खरं तर आवरा आवरी करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण आता मदती केली नसती तर नीटनेटके पणाच्या संस्काराला कायमच मुकावं लागलं असतं. नाईलाजाने का होईना मीही कामाला लागले. बघता बघता त्या खोलीतल्या पसाऱ्याचा एक भाग झाले.
सगळ्या पसाऱ्यात काय चांगलं, काय खराब हा भेद मला कळेनासा झाला. बाळराजेंनी आवरून ठेवलेल्या कप्प्यात मी पसाऱ्यात सापडलेल्या अनेक वस्तू भविष्यात कामाला येतील असे वाटून त्या    एक एक करून पुन्हा ठेवू लागले.
तसा बाळराजेंचा पारा चढला. " तू मदत करायला आली आहेस की पसारा आहे तसाच उचलून ठेवायला आली आहेस ?"
मी  तत्परतेने उत्तर दिलं," अरे मदतच करतेय .... तू अनेक वस्तू कामाच्या नाहीत म्हणून बाहेर ठेवायच्या पसाऱ्यात टाकल्या आहेत. त्या फक्त उचलून जागच्या जागी ठेवते आहे".
बाळराजे गरजले," त्यापैकी एकही वस्तू माझ्या कामाची नाही . मी भविष्यातही त्यांचा वापर करण्याची शक्यता नाही. तुला येवढ्याच त्या आवडल्या असतील तर तुझ्या कपाटात नेवून ठेव."
मी घाबरून ," नाही... अजिबात नाही माझ्या कपाटात सुई ठेवायला जागा नाही ".
बाळराजे ," अग त्या वस्तू दिसायला चांगल्या दिसतात पण प्रत्यक्षात मी एकही कधीच वापरत नाही.  ही काही खेळणी ही मी आता खेळणार नाही . जो कोणी या वस्तूंचा वापर करणार असेल त्याला देवून टाक ."
पटापट सगळं जास्तीच सामान त्याने एका पिशवीत भरले आणि ती पिशवी माझ्या हातात दिली.
मी उदास नजरेने त्याच्या आवरलेल्या आणि रिकामं रिकामं वाटणाऱ्या कप्प्याकडे बघत बोलले," तुला नक्की नकोय यातलं काही .... किती रिकामा दिसतोय कप्पा "
त्यावर बाळराजे समजावणीच्या सुरात बोलले," जुन्या  वस्तू ठेवून उगाच भरून ठेवायचा आहे का हा कप्पा ? ....अग रिकामा केला तरच नवीन गोष्टींसाठी जागा होईल न ..... तू जा बरं... आधी ही पिशवी ठेवून ये बाहेर नाहीतर पुन्हा त्या वस्तूंनी सगळी जागा व्यापून टाकशील"
     मी जमा केलेला सगळा पसारा बाहेर ठेवून आले. हे करतांना डोक्यात त्या वस्तुबद्दलच्या अनेक आठवणी आठवून लागले. उगाच वाटू लागलं की *आपल्या मनाचनही असंच आहे. अनेक गोष्टींची गरज असो नसो आपण त्या साठवून ठेवतो. इतक्या साठवून ठेवतो की  त्याचा ताण यायला लागतो. मानाचा कप्पाही असाच आवरून ठेवायला हवा. चांगल्या आठवणी, अनुभव ठेवायचे . बाकी  सगळे बाहेर  काढून टाकायचे. केलेल्या चुकांबद्दल  अपराधी भावना जपत बसण्यापेक्षा त्या चुका टाळण्यासाठीचे प्रयत्न करायला हवे. मनात राग ठेवण्यापेक्षा आनंद ठेवता यायला हवा. मन मोठं करून अनेक गोष्टी सोडून द्यायला हव्या*
            विचारांच्या तंद्रीत बाळराजेंच्या खोलीत पोहचले. खोलीत नेहमीचाच प्रकाश पण आज खोली एकदम उजळून निघाल्यासारखी भासत होती. या हवा पण आज जणु ती खोलीत मुक्तपणे  बागडत होती.

खोलीतली जागाही तेवढीच पण आज खोली मोठी झाल्यासारखी भासत होती.

      कळत  नकळत आज एक गोष्ट मी ही शिकले होते,"  मनात भावनांची अडगळ करण्यापेक्षा काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि नवीन चांगल्या अनुभवासाठी मन कायम तयार ठेवायचं"

   खोली आवरल्या गेली याचा आनंद बाळराजेंच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

     बाळराजेंची खोली तर आवरून झाली होती. ते निवांत पंख्याची हवा खात बसले. मी मात्र  कामाला लागले होते. मनातील अनेक कप्पे एक एक करून रिकामे करायचे होते.

©️ अंजली मीनानाथ धस्के



टिपः

      मला  मन शांत करायचे असले की डोळ्यांना शीतल वाटणाऱ्या.... मनाला आणि हाताला गुंतवून ठेवणाऱ्या  गोष्टी मी करत असते.

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या चेहऱ्याकडे बघितले की  त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान , शांती हळूहळू आपल्या मनात झिरपत जाते आहे  असा  भास मला होतो . बुद्ध पौर्णिमेनिमित्त  त्यांची ही छबी रांगोळीत रेखाटण्याचा मोह मला अनावर झाला.

रांगोळी काढून आणि तयार झालेले त्यांचे  हे रूप पाहून माझं मन तर शांत झालं ..... रांगोळी बघून तुम्हालाही असाच अनुभव होतोय का?

©️ अंजली मीनानाथ धस्के

 लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी  कायद्याने गुन्हा आहे.