#पिप्पी_डंपरची (अ ल क)
यावर ती पोट धरून मोठमोठ्याने हसत सुटली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( Momspreso मराठी ... मुख्य पानावर १०० शब्दांची विजेती कथा म्हणून प्रकाशित झाली आहे ती कथा👇 खाली देत आहे. त्यांनी दिलेल्या व्हिडिओ ला अनुसरूनच कथा लिहायला सांगितली होती. )
#पिप्पी_डंपर_ची
कडाक्याच्या थंडीत... दुलई पांघरून झोपलेल्या आईला शार्दुलने पिप्पी आलीचा घोषा लावू उठवले. जाम कंटाळा त्यात कार्ट आता पिप्पीच्या बहाण्याने पाण्यात खेळणार म्हणून तिने नामी युक्ती लढवली . पलंगाजवळची खिडकी थोडी उघली .त्याला तिथेच उभे केले आणि सांगितले , " इथूनच कर पिप्पी". थोड्या वेळाने उठून बघते तर .... खिडकी सताड उघडी ...... गजांना खेटून त्याचा आवडता डंपर उभा आणि शार्दुल त्याच्याकडे एकटक बघत बसलाय. शार्दुल खिडकीला व डंपरला हात लावू देईना. "का नको? " विचारल्यावर बोबड्या भाषेत म्हणाला , " अरे माझी झाली ... आता तो करतोय. डंपर केवढा मोठा असतो माहित आहे ना ?? मग....! त्याची पिप्पी पण मोठी असणार .... करू दे त्याला ..... डिस्टर्ब नको करू ".
ती पोट धरून हसत सुटली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#AnjaliMDhaske
©️ अंजली मीनानाथ धस्के
शार्दुलला त्याचे आवडते खेळणे कायम सोबत लागायचे . आजही तो ' डंपर' (ट्रक चा एक प्रकार)सोबत घेऊनच झोपला . कडाक्याच्या थंडीत... दुलई पांघरून झोपलेल्या आईला शार्दुलने पिप्पी आलीचा घोषा लावू उठवले. जाम कंटाळा त्यात कार्ट आता पिप्पीच्या बहाण्याने पाण्यात खेळणार म्हणून तिने नामी युक्ती लढवली . पलंगाजवळची खिडकी थोडीच उघली . त्याला तिथेच उभे केले आणि सांगितले , " इथूनच कर पिप्पी". इकडे हीचा डोळा लागला. एवढी थंडी का वाजते म्हणून उठून बघते तर काय ..... खिडकी सताड उघडी ...... तिच्या गजांना खेटून शार्दुलचा डंपर उभा आणि शार्दुल पलंगावर मांडी घालून दोन्ही हातांच्या तळव्यावर आपला चेहरा ठेवून त्या डंपरकडे एक टक बघत बसलाय. तिला काही कळेना . तो खिडकी बंद करू देईना. डंपरला ही हात लावू देईना. काहीच ऐकेना. प्रेमाने "का नको? " असे विचारल्यावर तो बोबड्या भाषेत म्हणाला , " अsssरेsss माझी पिप्पी झाली🙄 ... आता तो पिप्पी करतोय😊. डंपर केवढा मोठा असतो माहित आहे ना 😲.........मग !..... त्याची पिप्पी पण मोठी असणार न 😏.... करू दे त्याला पिप्पी 😩..... डिशटब ( डिस्टर्ब ) नको करू ".यावर ती पोट धरून मोठमोठ्याने हसत सुटली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
( Momspreso मराठी ... मुख्य पानावर १०० शब्दांची विजेती कथा म्हणून प्रकाशित झाली आहे ती कथा👇 खाली देत आहे. त्यांनी दिलेल्या व्हिडिओ ला अनुसरूनच कथा लिहायला सांगितली होती. )
#पिप्पी_डंपर_ची
कडाक्याच्या थंडीत... दुलई पांघरून झोपलेल्या आईला शार्दुलने पिप्पी आलीचा घोषा लावू उठवले. जाम कंटाळा त्यात कार्ट आता पिप्पीच्या बहाण्याने पाण्यात खेळणार म्हणून तिने नामी युक्ती लढवली . पलंगाजवळची खिडकी थोडी उघली .त्याला तिथेच उभे केले आणि सांगितले , " इथूनच कर पिप्पी". थोड्या वेळाने उठून बघते तर .... खिडकी सताड उघडी ...... गजांना खेटून त्याचा आवडता डंपर उभा आणि शार्दुल त्याच्याकडे एकटक बघत बसलाय. शार्दुल खिडकीला व डंपरला हात लावू देईना. "का नको? " विचारल्यावर बोबड्या भाषेत म्हणाला , " अरे माझी झाली ... आता तो करतोय. डंपर केवढा मोठा असतो माहित आहे ना ?? मग....! त्याची पिप्पी पण मोठी असणार .... करू दे त्याला ..... डिस्टर्ब नको करू ".
ती पोट धरून हसत सुटली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
Hehehe
ReplyDelete