#अदृष्य_ओझं
#१००शब्दांचीगोष्ट
©️ अंजली मीनानाथ धस्के
घरी मोठी पूजा ...... होम हवन .... येणारे पाहुणे आणि त्यात हाताशी सुमन नाही म्हणून तिच्या आईची धावपळ सुरू होती. तर मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय जाहीर झाल्यावर त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी कॉलेजच्या मुलींनी काढलेल्या रॅलीमधे सुमन अगदी उत्साहात नारे देत होती.
जुन्या रुढींच्या विरोधात आज एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद घेवुनच सुमन घरी परतली . तिला खूप काही सांगायचं होत आईला. ती आईला प्रेमाने मिठी मारणार इतक्यात मागून काठी टेकत आजी आली आणि तिच्या आईला म्हणाली, " बाहेरची आहे ना आज ही ...... मग हिला मागच्या खोलीत जायला सांगा . घरात मोठी पूजा झाली.... उगाच शिवाशिव नको. जेवणाचे ताट ही मागेच नेवून द्या आणि हो.... काय लाड करायचे ते चार दिवसांनी करा".
दोघींनी एकमेकींकडे बघितले ...दोघींचे ही डोळे पाणावले ...... जवळ येण्यासाठी उचललेली पावले मात्र एका अदृष्य ओझ्याने जड झाली....... आणि.... आपसूक मागे फिरली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
#AnjaliMDhaske
( हि रांगोळी तळहाता एवढी लहान आहे)

No comments:
Post a Comment