#बदाम
शिरा करून झाल्यावर बदामाचे काप घालावे म्हणून १०.... १२ बदाम हातात घेतले..... का... कुणास ठावूक मन भूतकाळात गेलं.( हातात काम असलं तरी डोक्यात विचार रूंजी घालत राहतातच )
मी ५... ६ वर्षांची असेल ( तुम्ही म्हणाल की स्मरणशक्ती फारच दिसतेय.... तर काही प्रसंगच असे असतात की ते विसरले जात नाहीत ) उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही सगळे अंगणात झोपत असू. विदर्भातला उन्हाळाच तसा असतो. आम्ही.. आमचे घर मालक.... शेजारी सगळेच अंगणात झोपत असू.... फार मज्जा असायची.... झोपतांना गप्पांची मैफील रंगायची. असो....
तर अशाच एका दिवशी पप्पा पेपर तपासण्याचे काम करत बसलेले ( तेव्हा पेपर घरी द्यायचे शिक्षकांना तपासायला )... आई भरतकाम करत बसलेली.... आम्ही भावंड मजेत बाहेर झोपलेलो. आई माझ्याजवळ आली आणि मला उठवून घरात घेवुन गेली. तिने हळूच एक कागदाची पुडी उघडली. त्यात १०... १२ बदाम होते. ( तेव्हा परीस्थिती अशी होती की गरजे शिवाय बदाम घरात आणून ठेवणं परवडत नसे. आज ही तसंच काहीस महत्त्वाच काम असणार असा मी अंदाज बांधला )जवळच दुधाची छोटी वाटी होती. आईने सहाण घेवुन त्यावर बदाम उगळायच काम सुरू केलं . सगळ झाल्यावर तो लेप तिने माझ्या हाता - पायाला... चेहऱ्याला लावला आणि जावून झोपायला संगितले. झोप इतकी आली होती की मीही निमूट जावून झोपले.
सकाळी उठल्यावरही मी काही तिला रात्रीबद्दल विचारलं नाही. ( मला एकटीलाच उठवल.... लेप लावला...म्हणजे नक्कीच आमच्या दोघींच गुपित आहे. हे मला जाणवलं आणि एकदाम भारी वाटलं )
दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. तिसऱ्या दिवशी मात्र मी झोपायला गेलेच नाही. आईच्या मागे मागेच होते. माझी दोन्ही भावंड झोपल्यावर.... आई नेहमीप्रमाणे कामाला लागली. आज मात्र बदाम कमी होते कागदात. ते पाहून मी आईला विचारायला सुरुवात केली. " तू हे काय करतेस? का करतेस?"

आई म्हणाली "बदाम चांगले असतात म्हणून उगाळते आणि तुला त्याचा लेप लावते."
मी... " चांगले म्हणजे कसे ग?"
त्यावर ती.... " बदाम उगाळून लावली की त्वचा चांगली होते, रंग उजळतो."
पुन्हा मी... " अजून काय होतं?"
त्यावर ती..." बदाम खाल्ले की बुद्धी तल्लख होते."
पुन्हा मी.... " मग तू मला बदाम खायला का देत नाहीस?.... माझी बुद्धी तल्लख होईल न खावुन...अंगाला का लावतेस? "
माझ्या भोळ्या प्रश्नावर ती एकदम बदाम उगाळायची थांबली..... स्वतःशीच काहीतरी खोल विचार केल्यासारखी वाटली. मला तेव्हा वाटलं... ती एवढं करते आहे..... आणि मी... नसते प्रश्न विचारत बसले . तिला वाईट वाटल असेल. पण झाल उलटंच. तिने राहिलेले ३... ४...बदाम आणि उगाळत असलेला अर्धा बदामही धुवून मला खायला दिले.सगळे बदाम संपवले म्हंटल्यावर नंतर कधी रात्री तिने मला उठवल नाही. हा प्रसंग खूपच छोटा पण माझ्या लक्षात राहिला कारण मला वाटायच की मी स्पेशल आहे. आई सर्वात अधिक प्रेम माझ्याच वर करते. ती मला झोपवतांनाही
" एका तळ्यात होती बदके पिले अनेक....." हे माझ्या आवडीचे गाणे म्हणायची. गाण्यातला राजहंस तूच आहे असं सांगून मला एकदम खुश करायची.
पण मी जस जशी मोठी होत गेले मला कळत गेल की... ती त्या रात्री मलाच का लेप लावायची? तिच्यावर असलेल माझं प्रेम... आदर अधिक वाढत गेला. तो तिने स्वतः शीच संघर्ष करून घेतलेला निर्णय आणि आजही ती त्यावर ठाम आहे यामुळेच....
मी दोन्ही भावंडांपेक्षा थोडी सावळी.... ते दोघे गोरे. त्या काळी ( खरंतर आजही ) मुलीच्या रंगालाच खूप महत्व. मुलगी सावळी म्हणजे हुंडा द्यावाच लागेल आणि तोही इतर मुलीं पेक्षा जास्तच... असा समज मुलीच्या आई वडीलांचा करून दिला जात होता . इच्छा नसतांनासुद्धा समाजाच्या ह्या भ्रामक कल्पनांना अनेक मुलींचे आई-वडील बळी जात होते. अवघ्या २५ व्या वर्षी तीन मूलांचे मातृत्व स्वीकारलेल्या माझ्या आईच्या मनातही काळजीने घर करणं सहाजिकच होतं.त्याही वयात परिस्थितीने विचारलेल्या प्रश्नांना ती सद्सद् विवेक बुद्धीने सामोरी जायची आणि त्यातूनच एक प्रगल्भ व्यक्तीमत्वाची स्त्री... आई घडत गेली. समाजात मुलीचा रंगच बघितल्या जाणार..... म्हणून तिने परिस्थिती नसतांना... बदाम आणण्याचा... तो उगाळून लेप लावण्याचा घाट घातला खरा.... पण लेकीच्या प्रश्नाने लगेच अंतरमुख होवून.... बदाम लेप लावण्यापेक्षा... ते बदाम खावून बुद्धी तल्लख करणंच गरजेच आहे. या निर्णयापर्यंत पोहचण्याचा तिचा प्रवास... त्यात तिची झालेली घालमेल, समाजाच्या गैरसमजांना बळी न जाता आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीर उभे रहावे लागणार.. याची जाणीव.... हे सगळ मी त्या क्षणी तिच्या डोळ्यांत पाहीलं होत. ( त्याचा अर्थ कळायला बरीच वर्षे जावी लागली हा भाग वेगळा )
आजही अनेक छोट्या मुलींच्या वाढदिवसाला मी जाते. तेव्हा आपली मुलगी छान दिसावी म्हणून आई मुलीला छान फ्रॉक तर घालतेच पण तिच्या मुळातच नाजुक असलेल्या ओठांना....गरज नसतांनाही लिपस्टिक लावते. तेव्हा आत खूप खोल काळीज कुठेतरी तुटतं. टेलिव्हिजन वर अनेक जाहिराती आजही गोरा रंग कसा श्रेठ.... हेच आपल्या मनावर ठसवतात. त्यात भर म्हणून आता मुलांच्या ही मनात गोऱ्या रंगाचे महत्त्व जागृत करून त्यांच्यासाठीही अनेक सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध करुन दिली आहेत . ( या गैरसमजातही स्त्री-पुरुष समानता आली हाच काय तो आनंद )
लहानपणी मला भांडणात " डोंबडी " म्हंटलं की मी हमखास रडत असे. ( विदर्भात काळ्या-सावळ्या मुलीला डोंबडीच म्हणतात.) माझे वडील मला समजावून सांगायचे..." सुंदर व्यक्तीकडे आपण एकदा... दोनदा.... तीनदा वळून बघू पण ज्या व्यक्तीचे रूप तिच्या कर्तुत्वाने उजळून निघालेले असते तिच्या वरून आपली नजर हटत नाही. रूप आपल्या हाती नाही पण कर्तुत्व आहे. तेव्हा तुझं तू ठरव... रडत बसायच की कर्तुत्व घडवायच." मला ते पटायचं आणि मी रडायचं थांबायचे. रंगाचा विषय निघाला की आमचे घर मालक 'लोखंडे काका' आणि माझी मोठी मावशी यांच एकच मत असे.... ते माझ्या आई - वाडीलांना सांगत " आत्ता तुम्ही तिच्या भविष्याच टेन्शन घेताय खरं पण भविष्यात तीच टेन्शन तुम्हाला कधीच नसणार." या आणि अशा अनेक गोष्टी मला आत्मनिर्भर बनवत गेल्या. आरस्या समोर उगाच दुख: करत बसण्यापेक्षा अनेक छंद मी जोपासले... त्यात रमले. सौंदर्य सगळ्यांनाच आवडतं..... प्रत्येक व्यक्ती सुंदर असते... फक्त बघणाऱ्यांना तशी दृष्टी हवी. स्वतःला कळले की आपण कशात सुंदर आहोत तर आपल्यालाही आपल सौंदर्य खुलवता येत. पण काही गैरसमज आपल्या इतके अंगवळणी पडले आहेत की ते चूक... की....बरोबर हे पडताळूनही बघीतले जात नाही. सौंदर्याचे ढोबळ निष्कर्षच आपण पळतो.... त्यांना पात्र ठरण्यासाठीच धडपडतो..... ते बदलण्यासाठीचे प्रयत्न मात्र कमी पडतांना दिसतात. असो..... शिरा खावुन झाल्यावर आईने दिलेल्या बदामाने आपली स्मरणशक्ती काही बाबतीत ( म्हणजे अभ्यास सोडून इतर ) अधिक तीव्र झाली आहे आणि त्यातूनच असं अचानक भूतकाळात हरवून जाण्याचा आजार जडला असावा अशी कल्पना मनात येवुन मी गालातल्या गालात हसूनही घेतलं आणि धन्यवादही दिले... आई - बाबांना आणि माझ्या आयुष्यातील त्या प्रत्येक व्यक्तीला जिने माझ्या दिसण्यापेक्षा .... माझ्या असण्याला महत्व दिले.

( नेहमीप्रमाणे सोबतीला मी काढलेली रांगोळी ही आहे)
©️ अंजली मीनानाथ धस्के
पुणे
No comments:
Post a Comment