#बैल_पोळा निमित्त सुंदर शब्द रचना आणि रांगोळी
#बळीराजा
राब राबतो शेतात शेतकरी
म्हणून म्हणती त्याला कष्टकरी
अनंत येती संकट अंगावरी
परतून लावितो वरचेवरी
मदतीला ही सर्जा राजाची जोडी
संसारी यांच्या अनोखीच गोडी
गाळूनी घाम देतो सर्वांना अन्न
प्रार्थना हिच राहो सदा प्रसन्न
ह्याच्या साठी अवतरला वामन
सरले नाही याचे अध :पतन
असा हा सर्वांचा लाडका बळीराजा
मी हात जोडीते नमस्कार माझा
कवयित्री: सौ. नलिनी येलगिरे
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
कविता आवडल्यास आपला अभिप्राय जरूर नोंदवा
No comments:
Post a Comment