गौरी पूजन निमित्त सुंदर शब्द रचना आणि रांगोळी
#माझी_गौराई
बाई माझी गौराई लाडा कोडाची
हिला आवड ग आवड गोडाची!!1!!
ठुमकत आली सोन्याच्या पावली
आम्हावर सदा मायेची सावली!!2!!
नाकी नथ ही घागरा रुणझुण
हाती हिरव्या चूड्याची किणकीण!!3!!
समयांचा भवती लख लखाट
बसायला चौरंग नैवद्याचा थाट!!4!!
अडीच दिवसाचे हिचे माहेर
जाताना लावते मनाला हुरहूर!!5!!
मी नित्य पहाते गौराईची वाट
अनोखी ही शोभा आगळाच थाट!!6!!
कवयित्री:
सौ. नलिनी येलगिरे ✍️
💥💥💥💥💥💥💥💥💥
कविता आवडल्यास आपला अभिप्राय जरूर नोंदवा
मस्त
ReplyDeleteThank you ❤️
ReplyDelete