#१००शब्दांचीकथा
#जगण्याची_मिळालेली_एक_संधी
मित्रांसोबत बाईक रेसिंगचा प्लॅन ठरवलेला. घरी कल्पना न देता फक्त 'आई येतो गं' म्हणत घराबाहेर पडला.
ती हाक ऐकून बाहेर येणाऱ्या आईचे लक्ष समोर पाडलेल्या हेल्मेटकडे गेलं. त्वरेने तिने ते त्याच्या हातात दिलं.
वेगात गाडी चालवतांना मोठा अपघात झाला. मित्रांनी दवाखान्यात दाखल केले.
दहा दिवस कोमात गेलेला तो शुद्धीत आला. केवळ हेल्मेट होत म्हणून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
महिनाभर रोज त्याच्या काळजीने काळवंडलेल्या आईवडिलांना बघून त्याने आज एक निश्चय केला.
२९ फेब्रुवारी या वर्षातला एक जास्तीचा दिवस. मलाही देवाने जगण्याची एक जास्तीची संधी दिली. इथून पुढे मी स्वतः वेगावर नियंत्रण ठेवणारच पण इतरांनाही सुरक्षिततेची काळजी घ्यायला प्रेरित करणार.
©️ अंजली मीनानाथ धस्के
कथा आवडल्यास नावा सहित शेयर करावी.
No comments:
Post a Comment