#दसरा२०१९
#दुर्गुणांचे_दहन
#पाटीपुजा
दसरा हा सण आपण चांगल्याचा वाईटावर विजय या अर्थाने साजरा करतो. इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन् दिसतात पण आपल्यातल्या दुर्गुणांकडे कळत नकळत आपलेच दुर्लक्ष होते. कोणीही परिपूर्ण नसतं. परिपूर्णतेचा ध्यासच आपल्यातील चांगल्या गुणांची वृध्दी करण्यास कायम प्रेरित करतो.
आधी आपल्यातल्या दुर्गुणांचा नाश केला पाहिजे तेव्हा आपण एक उत्तम माणूस म्हणून आपले अस्तित्व टिकवू ठेवू शकतो.
" जग बदलावे असे वाटत असेल तर त्या बदलाची सुरुवात आपल्या पासूनच करायला हवी ". हा बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा शिक्षणातील मूल्यांचा वापर आपण आपल्या आयुष्यात करू . शिक्षणाने आपण केवळ शिक्षित होत नाही तर सुसंस्कृत होण्यास मदत मिळते. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी पाटी पूजनाला खूप महत्त्व आहे.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिक्षणाची कास धरत स्वतःतल्या रावणाचे दहन करण्याचा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा...
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment