#कोजागिरी_पौर्णिमा
#चंद्र
पौर्णिमा म्हणताच सगळ्यात आधी आठवतो तो शीतल , असा पूर्ण चंद्र. त्यातही कोजागिरीचा चंद्र तर अप्रतिम सुंदर दिसतो . या चंद्र प्रकाशाचे महत्त्व जितके तितकेच कवी मनावर याचे राज्य अधिक आहे. सागरला भरती येते त्याप्रमाणेच पोर्णिमेच्या चंद्राला पाहून माझ्या शब्दांनाही उधाण येतं. कोजागिरीच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा.......
शरद पौर्णिमेनिमित्त सहजच सुचलेले शब्द..... तुम्हाला आवडल्यास नक्की कळवावे.
#चंद्र
#मिलन
तू पौर्णिमेचा चंद्र होता
मी रातराणीचा गंध व्हावे
शरदाच्या चांदण्यात न्हावून निघता
कणाकणाने मी बहरत जावे
प्रेमाच्या धुंदीत हरवत जाता
हळूच कवेत मला तू घ्यावे
श्वासात सुगंध भरून घेता
तूही तुला विसरत जावे
तुझ्यात मी मला शोधता
माझ्यात तू झिरपत जावे
काळोखाच्या पार्श्वभूमीवर
तुझे अन् माझे मिलन व्हावे
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment