संस्कार कपड्यांवर अवलंबून नसतात

' नमस्कार ' या विषयावर लिहिलेली ही कथा momspresso Marathi वर विजेती कथा म्हणून निवडल्या गेली आहे.
#१००शब्दांचीगोष्ट
#संस्कार_कपड्यांवर_अवलंबून_नसतात
            सोहमने  रिटाशी लग्न करायचा निर्णय सांगितला तेव्हा  आशाताईंनी अंदाज घेण्यासाठी  रिटाचे  fb पेज तपासले  . सगळ्या फोटोमधे ती सुंदर दिसत असली तरी तिच्या कपड्याकडे बघितल्यावर त्यांना स्वतःचीच काळजी वाटू लागली. एकटीने सांभाळलं आपण पोराला .... त्याच्याशिवाय राहता येईल??? हे शक्यच नाही..... असा  विचार करूनच त्या रिटाच्या घरी गेल्या .
तिथे तिच्या आईबाबांनी हात जोडून  'नमस्कार' म्हणत हसत  स्वागत केले. घरात गेल्यावर मॉडर्न कपड्यातल्या  रिटाने खाली वाकून पायाला स्पर्श केला.  मस्त गरमागरम उपमा आणि कॉफी बनवून आणली . तिच्या हातच्या उपम्याची चव घेतल्यावर त्यांना जाणवलं,'  संस्कार कपड्यांवर अवलंबून नसतात ' त्यांनी  आपल्या हातातल्या सोन्याच्या  बांगड्या हळूच होणाऱ्या सुनेच्या हातात घातल्या.

©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:

Post a Comment