वेदना..... सुखाची

#अलक
#वेदना
गेले १६ तास ती कळा सोसत होती ... शेवटचा प्रयत्न म्हणून शिणलेल्या जीवाने डोळे घट्ट मिटून घेतले वरचे  दात  खालच्या ओठात जोरात रूतवले .... बाळाचे रडणे कानी पडले आणि सोसलेल्या सगळ्या वेदना आनंदाश्रु होवून पाझरू लागल्या.
©️ अंजली मीनानाथ  धस्के
वेदना या विषयावर लिहिलेली ही एक अतिशय लघु कथा (अलक)

1 comment: