#१००शब्दांचीगोष्ट
' माझे बाबा माझे जग '... या विषयावर लिहिलेली ही कथा आहे .
#ईशा_बाबा_आणि_डायरी
माझ्या शाळेची सगळी तयारी तूच करायचा. ताप आला की , रात्रभर पट्टया बदलत उशाशी बसायचा. आईची आठवण काढू नये म्हणून ती बाहेरगावी असते, असं खोटं सांगायचा. तिचे जुनेच व्हिडिओ दाखवून समजूत काढायचा तुला मनभरून रडताही आल नाही . तुझी धडपड ... घुसमट कळायची पण सांगू कसं?? मला ठावूक आहे आई सोडून गेल्याच . तू मात्र जगणंच विसरला म्हणूनच आज खोटा हट्ट केला तुझ्यातोंडून वदवून घ्यायला .... तुला ओझ्यातून मुक्त करायला . .... तिचं जाणं मी स्वीकारलं पण तुला असं दुःखी बघवत नाही रे कारण तूच माझं जग आहेस
रडून झोपलेल्या चिमुकल्या ईशाच्या डायरीत हे वाचून राहुलचे डोळे पाणावले.
©️ अंजली मीनानाथ धस्के

हृदयस्पर्शी....
ReplyDelete