नूतन वर्षानिमित्त आकर्षक रांगोळी2022

 

DIY Easy yet Attractive Rangoli for New Year/Sankranti अंगणाची शोभा वाढवणारी अतिशय सुंदर रांगोळी

#DIY  #Rangoli #Easy #Beautiful #सोपी #सुबक #रांगोळी #Attractive #Newyear
#Sankranti

असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी 

Rang Majha Vegala YouTube Channel 👇👇

https://www.youtube.com//UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Subscribe करायला विसरू नका. Notification मिळवण्यासाठी Bell icon चे बटन दाबा.



©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या link वर click करा 👇👇👇👇

https://youtu.be/cEeXiG61q40





ख्रिसमस/ नाताळ निमित्ताने रांगोळी २०२१

 

DIY Christmas Special Rangoli नाताळ साठी खास सोपी सुंदर रांगोळी  .ज्यामधे आहे x-mas tree, Snowman आणि Santa claus
#Merry_Christmas
#Santa_Clause #Snow_Man #Christmas_tree
#DIY  #Christmas_Decoration
making #ideas #3D Christmas Tree #Art for  #Festivals
this video is useful for
#नाताळ किंवा
#ख्रिसमस #सजावट
साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.

#Easy #Beautiful #Simple #ArtandCraft
section 👇👇
ख्रिसमस ट्री #Paper-art चा व्हिडीओ पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇
https://youtu.be/2Vnyl1DWTZI
यात तीन ख्रिसमस ट्री बनविले आहे. त्यातील एक 3D ट्री आहे.
santa claus आणि Snowman  बनविण्यासाठी link 👇👇
https://youtu.be/YGIktXOXnLg


Rang Majha Vegala YouTube Channel 👇👇👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Subscribe करायला विसरू नका. हा व्हिडीओ Like Comment Share करा . bell icon चे बटन दाबा.
धन्यवाद
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



#ChristmasRangoli 👇👇👇👇
https://youtu.be/WjhL5CF94u0




दत्त जयंती 2021

 मित्रांनो .....

दत्त जयंती निमित्त घेवून आले आहे....अगदी साधी सोपी रांगोळी . 

दत्त जयंतीच्या मनस्वी शुभेच्छा 💐💐💐💐

तुम्हा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा. 

खाली दिलेल्या लिंक वर संपूर्ण रांगोळी उपलब्ध आहे 👇👇👇

https://youtu.be/FjGemj2SpDw

तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद हीच माझी प्रेरणा असल्याने Like, comment share करायला विसरू नका. 

 असेच सोपे सुंदर कलाविष्कार पाहण्यासाठी channel ला अवश्य भेट द्या 👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg


©️Anjali Minanath Dhaske ( Elgire )

THANK YOU 




ठिपक्यांची रांगोळी ( 16 ते 16)

 

#DIY Easy Beautiful #Dot_rangoli 16 ते 16
ठिपक्यांचा वापर करत  #सोपी #सुबक #रांगोळी
दिवाळी, दसरा, पाडवा, हळदी कुंकू अशा कोणत्याही शुभ प्रसंगी ही रांगोळी अगदी सहज काढू शकता.

१६ ते १६ ठिपक्यांची रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇https://youtu.be/w1y8Kh5_mN0

©️Anjali Minanath Dhaske (Elgire )








अत्यंत सोप्या आणि सुंदर रांगोळ्या

 #DIY #simple #Rangoli #Designs for #Beginners अत्यंत कमी #वेळेत आणि #श्रमात होणार्‍या #आकर्षक अशा रांगोळ्या #सोपी #सुबक #रांगोळी हि रांगोळी काढायला सोपी आहे. दिसायला #आकर्षक दिसते तुम्हाला हा #व्हिडिओ नक्की आवडेल . https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel #subscribe करायला विसरू नका. #like #comment #share करुन आपला सकारात्मक प्रतिसाद नक्की नोंदवा धन्यवाद ❤️🙏❤️🙏 ©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

खाली दिलेल्या लिंक वर या रांगोळ्या कशा काढल्या हे बघायला मिळेल.... लिंक क्लिक करून नक्की बघा 👇👇👇

https://youtu.be/206mtTZkg0E












ठिपक्यांच्या रांगोळ्या

 

#DIY  #Dot #Rangoli #Easy #Beautiful
ठिपक्यांचा वापर करत  #सोपी #सुबक #रांगोळी (3 रांगोळ्या)
#DIY #Easy yet #Attractive Dot Rangolis अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या गालिच्यापद्धतीच्या  #ठिपक्यांच्या तीन आकर्षक रांगोळ्या कशा काढल्यात हे पाहण्यासाठी link 👇👇👇
https://youtu.be/yDr1IIQivYk






त्रिपुरारी/ कार्तिक पौर्णिमा रांगोळी (एकच रांगोळी तीन आकर्षक रूपात)२०२१

 

#DIY #TripurarPurnima special #Rangoli (3 different ways) #त्रिपुरारीपौर्णिमा #कार्तिकपौर्णिमा #रांगोळी
एकच रांगोळी तीन आकर्षक आणि सोप्या रुपात काढून दाखविली आहे. त्यातील
तुम्हाला आवडेल आणि काढता येईल असा कोणताही प्रकार निवडण्याची संधी यात दिली आहे.
हा प्रयोग कसा वाटला ते जरूर कळवा.
channel subscribe करून Bell icon चे बटन नक्की दाबा. link 👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
like comment share जरूर करा
Thank you
@Anjali Minanath Dhaske (Elgire)

ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gjqwKktROeI







तुळशी विवाह २०२१

 #तुळशीविवाह 2021

अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेली ही रांगोळी दिसायला फारच आकर्षक दिसते.  ही रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ ही फारच कमी आहे.  तसेच आकर्षक असे तुळशी वृंदावन काढण्यासाठी माचिसच्या डबीचा  वापर केलेला आहे. ही रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/aISTyetTjAI

फुलांच्या पाकळ्यांचा वापर करत सुरेख असे तुळशी वृंदावन रेखाटले आहे. दिलेल्या लिंकवर  कसे रेखाटले हे बघायला मिळेल 👇👇👇👇

https://youtu.be/3zTvi7p6aF0

©️Anjali Minanath Dhaske ( Elgire )









बॉर्डर रांगोळ्या

  #बॉर्डररांगोळ्या 

कोणत्याही सणाला काढण्यासाठी अगदी सोप्या आणि आकर्षक अशा काही बॉर्डर रांगोळ्या ईथे देत आहे. 

त्या कशा काढल्या आहेत हे बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/mgCkjL6-Ur8


रांगोळ्या आवडल्या तर Rang Majha Vegala by Anjali M Dhaske  हे YouTube Channel subscribe ही नक्की करा

©️Anjali Minanath Dhaske ( Elgire  )







बॉर्डर रांगोळ्या

 #बॉर्डररांगोळ्या 

कोणत्याही सणाला काढण्यासाठी अगदी सोप्या आणि आकर्षक अशा काही बॉर्डर रांगोळ्या ईथे देत आहे. 

त्या कशा काढल्या आहेत हे बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/qhxh5dguH9s

रांगोळ्या आवडल्या तर Rang Majha Vegala by Anjali M Dhaske  हे YouTube Channel subscribe ही नक्की करा

©️Anjali Minanath Dhaske ( Elgire  )












दिवाळी, रांगोळी आणि बरेच काही(२०२१) प्रत्येक दिवसासाठी एक रांगोळी

 हा लेख "ईरा दिवाळी अंक २०२१" या मध्ये प्रकाशित झालेला आहे 

#दिवाळी_रांगोळी_आणि_बरेच_काही
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)
दिवाळी म्हंटले की फराळ आठवतो तसेच त्या दिवसांमध्ये काढल्या जाणाऱ्या भव्य, आकर्षक रांगोळ्याही आठवतात.
आपल्या संस्कृतीत कोणताही सण हा रांगोळी शिवाय अपूर्ण वाटतो.  पूर्वी दारात रोज रांगोळी काढली जायची. रोज काढणाऱ्या रांगोळीत रंग भरले जात नव्हते. पूर्वी मुख्यत्वे टीपक्यांच्या रांगोळ्या काढल्या जायच्या. घरोघरी रांगोळीची एक वही असायची. ज्यात अनेक रांगोळ्या व त्यांची तपशीलवार माहिती लिहून काढलेली असायची.
माझ्या आईनेही रांगोळीला एक वही केली होती. त्यात अनेक छोट्या मोठ्या रांगोळ्या काढून ठेवलेल्या होत्या. पोपट , हत्ती, मोर , राजहंस असलेल्या टीपक्यांच्या रांगोळ्या होत्या. अकरा ते सात , सात ते एक अशा तोडीच्या रांगोळ्या होत्या. ठराविक वार किंवा सणाला अनुसरून ही अनेक रांगोळ्या होत्या. जून्या वर्तमान पत्रात किंवा मासिकात छापून आलेल्या रांगोळ्यांचे फोटोही त्यात चिटकवलेले होते. मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर तिथे शेजारी पाजारी कोणाच्याही अंगणात  नविन रांगोळी दिसली की आई थांबून रांगोळीचे निरीक्षण करायची. किती ते किती थेंबाची मांडणी केली आहे हे आधी शोधून काढायची . तिथेच कागद पेन घेवून रांगोळी काढून घ्यायची. अगदीच कठिण रांगोळी असली तर ज्यांनी काढली त्यांची थेट भेट घेवून त्यांच्याकडून शिकून घ्यायची. घरी आल्यावर आमच्या पाटीवर त्या रांगोळीचा सराव करायची . तिला रांगोळी जमली की मगच ती तिच्या वहीत रांगोळी काढून ठेवायची. रांगोळी योग्य येण्यासाठी अगदी बारीक सारीक नोंदीही लिहून ठेवायची.
तिच्या या सवयीने तिला अनेक जणांनी भेटतील तिथून नवीन रांगोळ्या शोधून आणून दिल्या होत्या. रोज सकाळी अंगणात सडा शिंपला की पांढरी रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहूनच तिच्या दिवसाची सुरूवात व्हायची. तिला रांगोळी काढतांना बघने माझ्या आवडीचे काम होते. म्हणूनच तिने रांगोळी काढायला सुरुवात केली की सकाळी अंगणातली गार हवा अंगावर घेत पेंगुळलेली मी  तिच्या शेजारीच बसुन असायचे. त्यामुळेच कळत नकळत रांगोळीचे संस्कार माझ्या मनावर झाले .
रंगीत रांगोळी ही शक्यतो दिवाळी आली की बाजारात हातगाडीवर विकायला यायची. त्या काळी रंगीत रांगोळी म्हणजे चैन होती. त्यामुळे दिवाळीला पुरेल इतकीच रांगोळी खरेदी केली जायची. कागदी पुड्यामधे ही रांगोळी बांधून मिळायची. सणाच्या घाईतही कोणता रंग कोणत्या पुडीत आहे हे शोधण्यासाठी सगळया पुड्या उघडून बघाव्या लागायच्या. यावर उपाय खास रंगीत रांगोळ्यांसाठी म्हणून मसाल्याचा डबा असतो तसा प्लॅस्टिकचा डबा आमच्या घरात आला. रांगोळीत ठराविकच रंग मिळत होते तरी रांगोळीचा तो डबा बघून मलाही रांगोळी काढण्याचा मोह व्हायचा. मग आईची मनधरणी करून मला माझ्या छोट्या रांगोलीसाठी रंग मिळवावे लागायचे.
दिवाळीत वीस ते वीस, चाळीस ते चाळीस .... किंवा या पेक्षाही मोठया रांगोळ्या काढल्या जायच्या. रांगोळीत रंग भरण्यासाठी जितके हात मिळतील तितके ते हवे असायचे. म्हणूनच एरवी घरातही रंगीत रांगोळीला हात लावण्याची परवानगी नसलेल्या माझ्या सारख्या मुलींनाही शेजारीही रंग भरण्यासाठी बोलावणे यायचे. रांगोळीत रंग कमी पडला की लगेच शेजारच्या घरी तो रंग मागितला जायचा. दुसऱ्या दिवशी जितकी रंगीत रांगोळी घेतली तितकी साभार परत देखील केली जायची. रंगीत रांगोळी जपून वापरली जायची. दिवाळी संपली तसे अनेक रांगोळीचे रंग ही संपून जायचे. संपलेले रंग पुन्हा  पुढच्या दिवाळीतच घेतले जायचे. अनेकदा वर्षभर रंगीत रांगोळी सांभाळावी लागू नये म्हणूनही मोठ्या मोठ्या रांगोळी काढून त्यात ती सढळ हाताने वापरली जायची. दिवाळीच्या दिवशी क्वचित रांगोळीवर पसरवण्यासाठी चमचम ही विकत घेतली जायची. ही चमचम दिव्याच्या प्रकाशात  रांगोळीची शोभा वाढवत असे 
दिवाळीत कोणाच्या अंगणातली रांगोळी भव्य आणि सुबक आहे यावर चर्चा ही व्हायची.
दिवाळीच्या दिवशी तर कामाची एवढी घाई असायची की अनेकदा वाड्यातल्या सगळया मिळून एकच मोठी रांगोळी काढत असू. रंग भरताना गप्पा गोष्टीही रंगायच्या. जाणकार मुलींच्या हाताखाली रंग भरताना नकळत आम्ही कच्चे लिंबू रांगोळीत  तयार व्हायचो. त्याचा आत्मविश्वास घेवून मग वर्षभर छोटया छोटया रांगोळ्या अंगणात काढून बघायचो.
हल्ली रांगोळीत अनेक प्रकार आहेत. एका पेक्षा एक सुंदर कलाकृती रांगोळीत काढल्या जातात. परंतू आजही दिवाळी आली की मला टीपक्यांच्या रांगोळीची ओढ लागते. या रांगोळ्या शिस्तबध्द असतात. आकाराचा, रंगांचा समतोल राखला तर या रांगोळीच्या सोंदर्याची कशाशीच तुलना होवू शकत नाही.  मुख्य म्हणजे टीपक्यातील अंतर कमी जास्त करून तुम्ही या रांगोळीला मोठी किंवा छोटी भासवू शकता. आजी आणि आईने रांगोळीची आवड माझ्यात निर्माण केली . चार ते चार थेंबी  चॉकलेट रांगोळी पासून सुरू झालेला प्रवास अनेक नव नवीन प्रकार आत्मसाद करत पुढे जातोय. पण आजही रांगोळी म्हटलं की मन बालपणीच्या सुखद आठवणीत रमत.
दिवाळी अंकानिमित्त वसूबारस ते भाऊबीज पर्यंत काढता येतील अशा काही रांगोळ्या इथे देत आहे.
वसू बारस म्हणजेच गाय गोऱ्याची बारस. या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लागतो.
बालपणी घरात चकली चिवडा या पदार्थांचा खमंग  दरवळ पसरलेला असायचा.
  "दिन दिन दिवाळी .... गायी म्हशी ओवाळी" .... असे म्हणत आम्ही फुळझडी गोल गोल फिरवत उत्साहात नाचायचो.  त्याचीच आठवण म्हणून गाय वासरू अशी रांगोळी रेखाटली आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी . या दिवशी आरोग्य उत्तम रहावे म्हणून धन्वंतरीची पूजा करतात. तसेच घरात असलेल्या धनाची ही पूजा करतात. आमच्या घरी या दिवशी फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग राहायची. बेसनाच्या लाडूचा दरवळ दिवाळीची ओढ तीव्र करायचा. त्या दिवसाची आठवण म्हणून मांगल्याचे प्रतीक कलश आणि लक्ष्मीचे प्रतिक कमळ रांगोळीत रेखाटले आहे.
तिसरा दिवस लक्ष्मी कुबेर पूजन म्हणजेच दीपावलीचा. या दिवशी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घर , आंगण, घरातली लहान थोर मंडळी सगळेच नटून थटून तयार असतात. आमच्या घरी ही सगळ्यांचीच धामधूम असायची. खास दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत सगळेच उत्साहात असायचे. आई नैवेद्यासाठी म्हणून गरमा गरम  अनारसे आणि बासुंदी करायची. बासुंदी लवकरच खायला मिळणार या उत्साहातच आम्ही बच्चे कंपनी आमच्या किल्याची सजावट पार पाडत असू. आज जणू अंगणातल्या पणत्या आणि आकाश कंदील मांगल्याच्या तेजाची उधळण करत असतात असाच भास मला  होत असे. त्याचीच आठवण म्हणून टीपक्यांच्या रांगोळीत आकाश कंदील, पणत्या आणि स्वस्तिक रेखाटले आहे.
चौथा दिवस बलिप्रतिपदा /दीपावली पाडवा. बळीच्या राज्यात जसे सगळे सुखी समाधानी होते तसेच सुख कायम राहावे म्हणून अंगणात वेगवेगळ्या धान्याचा वापर करून रांगोळी काढली जायची. दिवाळी नंतर पाहुणे आपआपल्या घरी परततील तेव्हा त्याच्या सोबत दिवाळीचा सगळा फराळ  देता यावा म्हणून आई  शंकरपाळी आणि शेव असे काही राहिलेले पदार्थ करण्याचा घाट घालायची. म्हणूनच बळी राजाची आठवण करून देणारा आणि शेतात राबणारा  बैल रांगोळीत रेखाटून त्यावर समाधानाची झुल चढवलेली आहे.
" इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो" असा संदेश वेगवेगळी धान्ये वापरून लिहिला आहे. 
पाचवा दिवस भाऊबीज . आज घरी परतणाऱ्या पाहुण्यांची सामान भरण्याची लगबग सुरू असायची. त्याच्यासोबत देता याव्यात म्हणून सगळयात शेवटी ओल्या नारळाच्या करंज्या बनवल्या जायच्या.  ओल्या नारळाच्या करंजीचा खुसखुशीत गोडवा घेवूनच भावला ओवाळले जायचे. त्याचीच आठवण म्हणून बहिण भावला ओवाळते आहे अशी रांगोळी रेखाटली आहे.  प्रत्येक रांगोळी ही अनेक  आठवणींना उजाळा देणारी आहे. घरी आलेले पाहुणे दिवाळीचा फराळ शिदोरी म्हणून नेताना अनेक नविन रांगोळ्या शिकून आणि शिकवून ही जायचे. पुढच्या दिवाळीत पुन्हा भेटू असे आश्वासन देवून निरोप घेतले जायचे.
मागे राहायच्या फक्त काही  खुणा.  ओल्या अंगणातल्या रंगीत रांगोळीचा रंग अनेक दिवस दिवाळीची आठवण मानत रेंगाळत ठेवायचा. आजही दिवाळीतल्या आठवणींचा तो रंग ओल्या मनात त्याच्या खुणा जपून आहे.
तुमच्याही दिवाळी बद्दल अशाच अनेक गोड आठवणी असतील. याची मला खात्री आहे.

या रांगोळ्या कशा काढल्या याचे व्हिडियो
*Rang Majha Vegala by Anjali M* या यु ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
Rang Majha Vegala by Anjali M चॅनेल लिंक 👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

*रंग माझा वेगळा* फेसबुक पेज लिंक 👇👇
https://www.facebook.com/AnjaliMinanathDhaske/

तसेच *आशयघन रांगोळी* या ब्लॉग वरही अनेक रांगोळ्या उपलब्ध आहेत.
*आशय घन रांगोळी* ब्लॉग लिंक 👇👇👇👇
http://anjali-rangoli.blogspot.com

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे)




वसू  बारस  रांगोळी: link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/IpGoTT_uZt8



धनत्रयोदशी रांगोळी: link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/BmXAmjHdZ0s



लक्ष्मी पूजन रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/EtxQo5vgMiY




बलिप्रतिपदा रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/ien1_oIdrPg



भाऊबीज रांगोळी :link 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/qC6DZWaIbX0







छोट्या आकर्षक रांगोळ्या

#छोट्या_आकर्षक_रांगोळ्या

या रांगोळ्या तुम्ही दिवाळी किंवा कोणत्याही शुभ दिवशी काढू शकता.  दिवे ठेवण्यासाठी तसेच लक्ष्मी पाउले काढण्यासाठी या आकर्षक रचना फारच उपायुक्त आहेत. 

या रांगोळ्या अगदी झटपट काढून होतात.  तसेच हे video shorts असल्याने एका मिनिटा पेक्षाही कमी वेळात या रांगोळ्या बघून होतात. 

प्रत्येक रांगोळी कशी काढली त्या  व्हिडिओची लिंक देत आहे. आवर्जून बघा. 

Like comment share तर कराच परंतु channel subscribe  देखिल करा. 👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)


प्रत्येक रांगोळीच्या वर त्या रांगोळीची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक केल्यास ती रांगोळी कशी काढली हे पाहता येणार आहे 


छोटी आकर्षक रांगोळी  link 👇👇👇

https://youtube.com/shorts/mTl8MgS7Ryk?feature=share



छोटी सुंदर रांगोळी link 👇👇👇


अत्यंत सोपी रांगोळी  link 👇👇👇




सुबक रांगोळी लिंक 👇👇👇



कलश रांगोळी लिंक 👇👇👇















दिवाळी २०२१

#दिवाळी२०२१

खास दिवाळीसाठी अत्यंत सोपी आणि तितकीच सुंदर अशी आकाशकंदील, लक्ष्मी पाउले आणि दिव्यांची रांगोळी 

यंदा दिवाळीत नक्की काढून बघा. रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

असेच सोपे सुंदर कलाविष्कार बघण्यासाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske  हे 

 YouTube Channel subscribe करा

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

रांगोळी link 👇👇👇👇

https://youtu.be/0cbmT4qsVq4




झटपट शिका रांगोळी

 #झटपट_शिका_रांगोळी

दिवाळी निमित्त घेवून येत आहे अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या.....

एका मिनिटात होईल अशा रांगोळ्या 

चॅनेल subscribe करायला विसरू नका. 

रांगोळी शिकायची असेल तर हे शॉर्ट video एकदा बघा. *एका मिनिटांपेक्षा कमी वेळात तुम्हीही सुंदर रांगोळी अगदी सहज काढू शकता.*

Video आवडल्या like comment share नक्की करा .

आकर्षक फुल link 👇🏻

https://youtube.com/shorts/9niwfDXNTng?feature=share


सोपे सुंदर फुल link 👇🏻

https://youtube.com/shorts/0rYm_fi3ZMU?feature=share


झटपट होणारे सुंदर फुल link 👇🏻

https://youtube.com/shorts/WvWCWq6HfJ8?feature=share


अतिशय मोहक पाने link 

https://youtube.com/shorts/_mYa4XNQQ6c?feature=share


अधिक पाकळ्यांचे फुल link 👇🏻

https://youtube.com/shorts/PnDxrDPLO04?feature=share


अतिशय सोपे फुल link 👇🏻

https://youtube.com/shorts/PY-wfUSlLZQ?feature=share


फुलाचा वेगळा प्रकार link 👇🏻

https://youtube.com/shorts/_3WcfuPWPzY?feature=share


फुलाचा आकर्षक प्रकार link 👇🏻

https://youtube.com/shorts/RVJ7J1yny2A?feature=share


अजूनही सोप्या आणि छोट्या रांगोळ्या video रुपात तूमच्या भेटीला येणार आहेत. 

ईतर सुंदर रांगोळ्या चॅनल वर उपलब्ध आहेत तेव्हा अवश्य भेट द्या 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्यवाद 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



धनत्रयोदशी2021


#DIY #Attractive #Diwali #Special #Kalash #Rangoli (4by4dots) #धनत्रयोदशी निमित्त अतिशय #सोपी व #सुंदर #रांगोळी / #muggulu / #kolam
ईतर सुंदर सोप्या रांगोळ्यांच्या लिंक खाली देत आहे.
like comment share नक्की करा
thank you
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

#Dhanteras special Rangoli 👇
https://youtu.be/BmXAmjHdZ0s

#धनत्रयोदशी kalash Rangoli  👇
https://youtu.be/m_xjsW3I6Js

#लक्ष्मी_पाउले रांगोळी 👇 easy and Beautiful
https://youtu.be/EpsTFU11vqg

Diwali Special Rangoli 1 👇
https://youtu.be/VlVKkYhhQU4

Diwali Special Rangoli 2 👇
https://youtu.be/HZgCOSTwkdM

Diwali Special Rangoli 3👇
https://youtu.be/IQej33700V4


संपूर्ण video खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे 

#धनत्रयोदशी_2021 rangoli👇
https://youtu.be/JkbvDp_ZlMg




 

#DIY #Attractive #Diwali #Special #Kalash #Rangoli (4by4dots) #धनत्रयोदशी निमित्त अतिशय #सोपी व #सुंदर #रांगोळी / #muggulu / #kolam
ईतर सुंदर सोप्या रांगोळ्यांच्या लिंक खाली देत आहे.
like comment share नक्की करा
thank you
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)

#Dhanteras special Rangoli 👇
https://youtu.be/BmXAmjHdZ0s

#धनत्रयोदशी kalash Rangoli  👇
https://youtu.be/m_xjsW3I6Js

#धनत्रयोदशी_2021 rangoli👇
https://youtu.be/JkbvDp_ZlMg

#लक्ष्मी_पाउले रांगोळी 👇 easy and Beautiful
https://youtu.be/EpsTFU11vqg

Diwali Special Rangoli 1 👇
https://youtu.be/VlVKkYhhQU4

Diwali Special Rangoli 2 👇
https://youtu.be/HZgCOSTwkdM

Diwali Special Rangoli 3👇
https://youtu.be/IQej33700V4



बाल_मनाचा_प्रश्न

 #बाल_मनाचा_प्रश्न

©अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

साहिल हा ७ वर्षांचा अतिशय जिज्ञासू मुलगा. त्याला सतत काहीना काही प्रश्न पडत असतात. त्या सगळया प्रश्नांची उत्तरे देता देता त्याची आई निशा... हिच्या मात्र नाकी नऊ येतात.

       रविवार हा घरात सगळ्यांचा सुटीचा दिवस. साहिलच्या बाबांना फिश , चिकन किंवा मटण खाल्याशिवाय रविवार अपूर्ण वाटे. घरातल्या इतरांनाही मांसाहार म्हंटले की तोंडाला पाणी सुटे.  साहिल मात्र याच्या अगदी उलट होता. त्याला मांसाहार अजिबात आवडत नसे. 

            नेहमीप्रमाणे निशाने साहिलसाठी त्याच्या आवडीचे आलू पराठे आणि घरातील बाकी सगळ्यांसाठी  मस्त फिश करी, फिश फ्राय सोबतीला ज्वारीची भाकरी आणि भात असा  बेत केला होता. सगळ्यांची पाने वाढली . तिलाही कडकडून भूक लागली होती. पहिला घास घेतला तेवढ्यात शाकाहारी  असणाऱ्या सहिलने  इतके दिवस मनात दाबून ठेवलेला प्रश्न  अखेर तिला विचारलाच.

      "आई.... तू नेहमी म्हणतेस मुक्या प्राण्यांवर दया करावी. मात्र रविवार आला की  स्वतःच मुक्या प्राण्यांचे जेवण बनवते. असे का?"

       खरं तर निशाला इतकी भूक लागली होती की त्यापुढे साहिलच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यावे असे तिला वाटत नव्हते. 

साहिलने घरातील इतरांप्रमाणे मांसाहार करावा अशी सक्ती तिने त्याला कधीच केली नव्हती. साहिलच्या प्रश्नाने मात्र  घरातल्या सगळ्यांचेच मांसाहारावर असलेले प्रेम धोक्यात आले होते.

     " अरे तू रस्सा खावून तर बघ ... तूही फिश करीच्या प्रेमात पडशील " असे म्हणत बाबांनी साहिलच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. तर " मांसाहार करायलाच हवा.... त्यानेच तर शरीर ताकदवर बनते " अशी पुष्टी जोडत आजोबांनी फिश फ्राय वर ताव मारायला सुरुवात केली. 

          सहिलच्या नजरेत अजूनही प्रश्न आहे तसाच होता . त्या जाणिवेने निशाला अस्वस्थ केले. काहीही सांगून तिलाही प्रश्नाला बगल देता आली असती परंतू तसे करणे चुकीचे ठरले असते.

"जेवण झाले की तुला नक्की सांगते ह " म्हणत निशाने त्याला पटेल असे उत्तर शोधण्यासाठी वेळ मिळवला.

   सगळ्यांचे निवांत जेवण झाले. राहिलेली कामे उरकून निशा   झोपाळ्यावर आरामात डुलत  बसलेल्या साहिलकडे गेली. 

तिने साहिलला समजवायला सुरूवात केली. " साहिल ... शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्र आहारी.... असे तीन गट आहेत. तुला माहीत आहेच की प्रत्येक सजीव प्राणी हा या तीन गटापैकी एका गटात नक्की असतो. आता शाकाहारी म्हणजे काय ?"त्यावर साहिल ने लगेच उत्तर दिले " जे फक्त भाजीपाला खातात ते " निशा बोलली ," आपण फक्त भाजीपाला खातो . इतर शाकाहारी प्राणी  झाडपाला, गवत  ही खातात. आता मांसाहारी प्राणी म्हणजे काय सांग?" त्यावर साहिल बोलला," असे प्राणी जे इतर प्राण्यांना खातात" निशा बोलली," अगदी बरोबर. मिश्र आहारी म्हणजे असे प्राणी जे शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करू शकतात. हे प्राणी आपल्या गरजेनुसार किंवा उपलब्धतेनुसार आपला आहार बदलू शकतात. मनुष्य प्राणी हा मिश्र आहारी प्राणी आहे. फार पूर्वी आपण फक्त शिकार करून खात होतो. शिकारीसाठी एका ठीकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत होतो. जंगलात भटकतांना शिकार नाहीच मिळाली तर फळे खाण्याचा पर्यायही ही आपल्याला गवसला. कालांतराने आपल्याला शेतीचे ज्ञान प्राप्त झाले. शेतीमूळे आपल्याला एकाच ठिकाणी थांबण्याची गरज निर्माण झाली. याच दरम्यान अन्न शिजवून खाल्ले तर ते लवकर पचते या शोधातून पाककला जन्माला आली. म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज तयार केल्या गेल्या. या काळात आपण शाकाहारी आणि मांसाहारी असे अनेक पदार्थ बनवायला शिकलो. ऋतूनुसार जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असे शाकाहारी पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ यांची साठवणूक करायला शिकलो. पूर्वी शेती फक्त पावसाच्या पाण्यावरच केली जायची. पाऊस नसेल तेव्हा शिकार करून खाणे हाच पर्याय होता.  या समस्येवर उपाय म्हणून मग आपण प्राणीही पाळायला लागलो. गाय शाकाहारी असते तिला चारा देवून त्या बदल्यात आपण तिचे दूध मिळवू लागलो. बकऱ्यानपासून मास आणि दूध  तर कोंबड्यापासून मास आणि अंडी मिळवली जावू लागली. नदीत किंवा समुद्रात  मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे मासे ही पकडून खावू लागलो. शेती सोबतच ज्या प्राण्यांचा आहारात समावेश करु शकतो अशा प्राण्यांची संख्या आपण कृत्रिम रित्या वाढवतो . जेणेकरून त्या प्राण्यांची संख्या कमी होता कामा नये, निसर्गाचा समतोल राखला जावा. तसेच प्रतिकूल परिस्थितीत हे प्राणीच आपला आहार बनतील. जगातल्या प्रत्येकाने शाकाहारी बनण्याचे ठरविले तर सध्या आपल्याकडे सगळ्यांना पुरेल एवढे धान्य, भाजीपाला उगविण्यासाठीची जागा उपलब्ध नाही . तसेच  उपलब्ध जागेत आपण पूर्णपणे शाकाहार स्वीकारला तर इतर शाकाहारी प्राण्यांना खाण्यासाठी काहीच मिळणार नाही. कारण मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत शाकाहारी प्राण्यांची संख्या ही भरपुर आहे. आपण पूर्णपणे मांसाहार स्वीकारला तरी प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी आपल्याला जागा कमीच पडणार आहे. तसेच आपण मांसाहारी प्राण्यांची शिकार केली तर निसर्गाचा समतोल ही राखला जाणार नाही. जगण्यासाठी आपल्याला प्राणवायू देणारी झाडेही हवीच आहेत. आपली एक अन्नसाखळी आहे.... गवत, झाडपाला भाजीपाला उगवतो ... तो शाकाहारी प्राणी खातात... शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. मिश्र आहारी प्राणी काही गोष्टी झाडांपासून मिळवतो, काही शाकाहारी प्राण्यांपासून मिळवतो . यामुळे पूर्णपणे मांसाहार करणाऱ्या प्राण्यांचेही रक्षण होते. ही झाली मानवाच्या आहारात मांसाहार समाविष्ट असण्याची छोटी पार्श्वभूमी. आता तुझ्या मूळ प्रश्नाकडे जावू ....

मी मांसाहार करते तेव्हा फक्त मानवाने खास खाण्यासाठी वाढविलेले प्राणीच वापरते. डोळ्यांना दिसतील ते  सगळे प्राणी आपण आहारात वापरावे  किंवा निव्वळ चव अप्रतिम लागते म्हणून निसर्गाचा समतोल न राखता कोणत्याही प्राण्याचे मांस मिळविण्यासाठी शिकार करावी या मताची मी मुळीच नाही. कृत्रिम रित्या संख्या वाढविलेल्या प्राण्यांची आयुष्य मर्यादा कमी असते. त्यांचा उद्देशच मुळी आपल्याला मांस पुरविणे हा असतो.पालेभाज्यातून शरीराला जीवन सत्वे मिळविण्यासाठी भरपुर प्रमाणात पालेभाज्या खाव्या लागतात.  पालेभाज्या शिजविल्या तर त्यातील जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी होते. कच्या पालेभाज्या आपल्या आहारात फारशा नसतात . अशा वेळी आठवड्यातून एकदा  मांसाहार करून आपल्या शरीराला आवश्यक असे जीवन सत्व मिळवण्याचा प्रयत्न करते. घरातली जाणती मंडळी नेहमी सांगायची  मांसाहाराने शरीराची झीज लवकर भरून येते. झाडे काय किंवा प्राणी काय दोन्ही सजीव असतात हे शाळेतल्या विज्ञानात शिकले . लहानपणापासून आम्ही मांसाहार करत आलो म्हणूनही ते करतांना तुझ्या सारखे प्रश्न कधी पडले नाही. मला भाजीपाला , फळे ही आवडतात आणि फिश फ्राय, चिकन बिर्याणी ही तेवढीच आवडते.

 परंतू तुझ्या प्रश्नावर एवढच सांगेन....

आपल्या शरीराला आवश्यक अशी जीवनसत्वे आपण शाकाहार किंवा मांसाहार या दोन्हीतून मिळवू शकतो. ज्याला जे आवडते ते खाण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तुला काय आवडते ते तू खावू शकतोस. तुला आवडत नसेल तर मांसाहार केलाच पाहिजे असा आग्रह तुला कधीही कोणी करणार नाही. मांसाहार करणे चांगले असेही तुला सांगणार नाही. स्वतः साठी तू जे निवडशील त्यात मी तुझी साथ देईल हे मात्र नक्की.

 इतरांनी मांसाहार करावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तुला आवडत नाही म्हणून त्यांना कधी  नावे ठेवू नकोस. आहार कोणताही आसो...अन्न हे पूर्णब्रह्म असते त्याचा आदर करावा. 

आहार कोणताही असू दे... त्यातून आपल्याला आवश्यक ती सगळी जीवनसत्वे मिळावी आणि खाताना जिभेला त्याची चव जाणवावी येवढाच उद्देश असावा. "

निशाने साहिलला तिच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्याला पटलेही. मोठं झाल्यावर त्याचे त्यालाच चांगल्या प्रकारे कळेल. 

आहार पद्धती कोणती असावी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे . एकाच घरात जेव्हा भिन्न पद्धतीचा आहार घेणारे व्यक्ती असतात तेव्हा असे मतभेद किंवा प्रश्न उपस्थित होणारच. कोणत्याही एकाने दुसऱ्यावर आहाराबाबत  सक्ती करु नये. उलट एकमेकांच्या मतांचा, आवडीनिवडीचा कायम आदर करावा.  आहार घेतांना शरीराला पोषण मिळणे आणि घरातील प्रत्येक सदस्य आनंदी असणे  महत्त्वाचे.... बाकी सगळे गौण आहे. 

©️अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

टिपः लिखाण आवडल्यास नावा सहित शेयर करावे. मुले अनपेक्षित असलेले प्रश्न विचारतात आणि पालक म्हणून उत्तर देताना आपल्या बुध्दीचा कस लागतो. आपल्या साठी शुल्लक असलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. तेव्हा आपली मते त्यांच्यावर न लादता त्यांच्या शंकेचे निरसन करणे आवश्यक असते.  पिरियडस् , मुलांची उत्सुकता आणि गूगल , हनिमून म्हणजे काय ग आई? अशा संवेदशील विषयावर ही पालक या भूमिकेतून मी लिखाण केलेले आहे. असे आणि इतर लेख हे आशयघन रांगोळी (anjali_rangoli.blogspot.com) , रंग माझा वेगळा या fb पेज वर उपलब्ध आहे. नक्की भेट द्या. लेख लिहितांना  चूक भूल माफ असावी.


सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 



दसरा 2021

#दसरा2021

#Dussehra 

 " सोनं घ्या सोन्यासारखे रहा "


दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हा सोन्यासारख्या मित्रांना शुभेच्छा देताना आयुष्य तुमच्या मुळे खूप सुंदर आहे याचीच अनुभूती होते.


Let this Dussehra bring lot of happiness, joy, prosperity and health in your life ! 


दसऱ्याच्या निमित्त एक सोपी आणि सुन्दर कलाकृती. आज ही रांगोळी नक्की काढून बघा. 

Beautiful creation for today's occasion -


https://youtu.be/6CJ0vUZ55mk


Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube channel subscribe करून Bell icon चे बटन दाबा 😀🙏 लिंक देत आहे 👇👇


https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg


रांगोळी आवडल्यास चॅनल वर अभिप्राय जरूर नोंदवा

धन्यवाद

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



नवरात्री सिरीज आणि बरेच काही

 #नवरात्री_सिरीज_आणि_बरेच_काही

#रांगोळीचा _बाल_चाहता

#रांगोळीची_ज्येष्ठ_चाहती

 नवरात्र निमीत्त अगदी सोप्या रांगोळ्या आणि देवीच्या प्रत्येक रुपाबद्दल थोडक्यात महिती अशा स्वरूपाची व्हिडियो मालिका मी तयार केली . या मागचा उद्देश नवरात्रीचे यावर्षीचे नऊ रंग याची माहिती देता यावी तसेच अशा सोप्या रांगोळ्या असाव्यात की ज्या पाहून त्या काढून बघण्याचा मोह अनावर व्हावा. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे देवीच्या नऊ रूपाची नावे आणि त्या संबंधीच्या आख्यायिका ज्यांना माहित नाही त्यांनाही सहज माहिती व्हाव्या. 

             जेव्हा आपण प्रचंड मेहनत घेवून काही तरी सादर करतो तेव्हा त्याचे चीज व्हावे हेच ध्येय असते. नवरात्र सिरीज बनविण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अनेक टेक्निकल आणि वैयक्तिक अडचणी आल्या. टेक्निकल बाजू कमजोर असल्याने चुकांमधून मी शिकते आहे.  परंतू हे करत असताना वेळ आणि मेहनत खर्ची पडते. ...

         या खडतर प्रवासात दिलासा देणारी बाब घडली. माझ्या व्हिडियोचा  पहिला वहिला बाल चाहता मला गवसला. रांगोळी सोबत कथा असल्याने  त्याला रांगोळी मालिका बद्दल आवड निर्माण झाली. ही आवड इतक्या प्रमाणात होती की आवडलेली रांगोळी जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत हा चाहता गप्प बसला नाही . इतकेच नाही तर ," मी तुझ्या व्हिडियो ला लाईक, कमेंट subscribe करून बेल आयकॉन चे बटन दाबले . तू माझ्यावर खुश आहेस का? अरे

पण मोबाईल आईचा आहे  म्हणून 

मी तुझीलिंक शेअर करू शकलो नाही. तू खूश आहे ना ?"

असे फोनवर बोलून मला पुरते खूश नाही तर घायाळ केले.

आता या बाल चाहत्याला रांगोळी काढून बघण्याचे वेध लागले.

"आता नको नवरात्र सुरू झाले की काढ रांगोळी" असे सांगून त्याचा उत्साह थोपवण्यात आला . हार मानेल तो बाल चाहता कसला..... त्याने नवरात्र सुरू होण्याची वाट बघितली आणि अखेर रांगोळी मिळवून त्याने त्याला आवडलेली रांगोळी रेखाटलीच.

हा जिद्दी बाल चाहता म्हणजे माझा सहा वर्षाचा भाचा अंशुल असून त्याची रांगोळी मी इथे देत आहे. कारण जेव्हा त्याने मला माझी रांगोळी खूप आवडली , कथा आवडली असे सांगितले तेव्हा 

मला वाटलं रांगोळी, कथा आवडली इथपर्यंत ठीक आहे नंतर हा रांगोळी काढण्याची त्याची इच्छा विसरून जाईल. 

 परंतु आठवणीने त्याने मला ही रांगोळी पाठवली आणि सोबतीला गोड गोड आवाजात व्हॉईस मेसेज पाठवला तेव्हा ती रांगोळी बघून आणि त्याचा मेसेज ऐकून मला आकाश ठेंगणे झाले.

रांगोळी बघून अंदाज येईल की या वयात अशी रांगोळी काढली म्हणजे येत्या काही वर्षांत त्याने अशीच आवड टिकवली तर त्याच्या रांगोळीचा मोठा चाहता वर्ग नक्कीच निर्माण होईल. रांगोळीची परंपरा फक्त जोपासली जाणार नाही तर ती वृद्धिंगत होईल...

त्याने त्याची आवड जपावी आणि त्यात अधिकाधीक प्रावीण्य मिळवावे हिच सदिच्छा.

नवरात्री सिरीज बघून माझ्या आईलाही तिचे जूने दिवस आठवले. परंतू गेली अनेक वर्षे खाली बसून रांगोळी काढणे जमत नसल्याने तीची रांगोळीची आवड मागे पडली. परंतू नवरात्री येणार आहे निमित्ताने तीही रोज छोटया छोटया रांगोळ्या काढून बघू लागली. तिला ठिपक्यांच्या आणि फक्त पांढरी रांगोळी वापरून काढलेल्या रांगोळ्या अधिक आवडतात  परंतू आज तिने प्रथमच डिझाईन आणि रंगीत रांगोळी वापरून बघितली. तिने  ब्रह्मचारिणी ही रांगोळी काढली आणि मला फोटो पाठवला . " हल्ली बारीक सरळ रेष येत नाही... जपमाळसाठी ठिपके नीट पडले नाही....  डिझाईन नाहीच जमत ग मला तरी आज प्रयत्न केलाच बघ... हवी तशी जमली नाही पण काढून बघितली आणि स्टेटसला ठेवली आहे बघ तुला आवडली तर... " असे सांगितले. 

रांगोळी कशी आली यापेक्षा अनेक वर्षांनी तिने रांगोळी पुन्हा हातात घेतली याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही.

आज एका ज्येष्ठ तर एका बाल चाहत्याने माझ्या नवरात्री सिरीजला अतिशय भावनिक करणारा प्रतिसाद दिला आहे. 

आज हे चाहते माझ्या घरातले आहेत म्हणून मला त्यांची प्रतिक्रिया कळली परंतू माझ्या मैत्रिणी सांगतात की त्यांची आजी, मावशी , काकू माझे व्हिडियो लिंक पाठवल्यास त्यावर क्लीक करून आवर्जून सगळे व्हिडियो बघतात परंतू टेक्निकल अडचणी असल्याने त्यांना लाईक कमेंट करणे सूचत नाही/ जमत नाही.

 त्यामूळेच मला खात्री आहे की असे अनेक चाहते आहेत की ज्यांना टेक्निकल अडचणी असल्याने ते प्रतिसाद नोंदवू शकत नाहीत परंतू ते प्रेरित मात्र नक्कीच होतात. त्यांनी प्रेरित होणे हाच मुख्य हेतू असल्याने तो सार्थकी लागतोय याचा आनंद मोठा आहे.

" किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला "

टिपः माझा व्हिडियो बघण्याची इच्छा झाली तर आधीच्या अनेक पोस्ट मधे लिंक दिलेली आहे. ही जाहिरातीची पोस्ट नसल्याने इथे लिंक देणे संयुक्तिक वाटतं नाही. आजचा लेखा ज्या बाल आणि ज्येष्ठ चाहत्यासाठी आहे त्यांचीच रांगोळी इथे देत आहे.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire )