#ती_एक_लढवय्या
#१००शब्दांचीगोष्ट
लावण्या नावाप्रमाणेच सुंदर. चाळीशीत येवूनही ती महाविद्यालयीन तरुणीप्रमाणे कमनीय बांधा राखून होती.
एक दिवस आंघोळ करतांना काखेत गाठ जाणवली आणि सगळच बदलून गेलं.
आईचं काळीज ते.... पोरांच्या कोवळ्या वायाकडे बघून खंबीर झाली. सगळे उपचार न कंटाळता पूर्ण केले. किमोने तिचा रंग काळवंडला. डोक्यावरचे काळे भोर केस गायब झाले. कमनीय बांधा जावून हाडांचा सापळा राहिला. वय अचानक तिपटीने वाढल्यासारखा चेहरा झाला. मात्र आत्मविश्वासाला कधीच तिने साथ सोडू दिली नाही.
आरशात बघतांना कधी डोळ्यातून पाणी काढलं नाही. पूर्वीसारखीच आत्मविश्वासाने वावरत राहीली. ती खरी लढवय्या होती.
तिच्या खंबीर साथीने नवरा, मुलंही सावरली.
आयुष्याची लढाई फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकता येते हे तिने सिद्ध केले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टीप: लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहीत करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
No comments:
Post a Comment