#वयाच्या_नाजूक_वळणावरचे_प्रेम
©️ अंजली मीनानाथ धस्के
हल्ली नवऱ्याच माझ्याकडे मुळीच लक्ष नसतं. मी अनेकदा या विषयावर त्याच्याशी बोलले पण ऑफिस मधे खूप काम असतं म्हणून दुर्लक्ष होतंय माझ्याकडे अशीच सबब तो पुढे करतो.
मी वयाच्या नाजूक वळणावर . असचाळीशी आली की असे म्हणतात , या वयात मन उत्साहाच्या घोड्यावर स्वार होऊन तारुण्यात हातून निसटलेला प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने वेचू पहातं. वयाच्या या नाजूक वळणावर कोणीतरी आपल्याकडे आवर्जून लक्ष द्यावं... आपल्या वाचून कोणाचं तरी अडावं.... आपल्यावर कोणीतरी जीवापाड... वेड्यासारखं प्रेम करावं... आपणही बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार होत मुक्त भावनांची उधळण करावी. असं उगाचंच वाटायला लागतं.
असं असतांनाही नावरोबा माझ्याकडे दुर्लक्ष करणार तर माझं मन या सगळ्यांचा शोध घेत भटकटणारच.
मी विचारांच्या समुद्रात गटांगळ्या खात असतांना एक दिवस अचानक ' तो ' माझ्या आयुष्यात आला. स्वयंपाक घराच्या खिडकीतून त्याची आणि माझी नजरानजर झाली. तो दिसायला राजबिंडा होता. नकळत माझी नजर त्याच्यावरच खिळली.
वय कितीही उधळू पहात असल तरी मी इतकीही चंचल स्वभावाची नाही. त्यामुळे सुरवातीला मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्याच्या दिसण्यावरून त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता. पण आता तो हळू हळू माझा अंदाज घेत बोलू लागला. लोक काय म्हणतील या भीतीने मी त्याच्याशी एक शब्द बोलायचे नाही. त्यालाही ते जाणवलं असावं. तो ही पक्का बेरकी होता. नवरा माझ्याजवळपास असला की हाही माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं करी. नवर्यासाठी सकाळचा डब्बा बनवत असतांना रोज मीही चोरून चोरून त्याला बघत होतेच.
आता त्याने नवरा ऑफिसला गेल्यावर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची प्रत्येक हालचाल मोहक होती. त्याचं वागणं खूप संयमी होतं. न बोलताही माझी घाई , चीडचीड त्याला कळत होती. मी चिडून स्वतःशीच बडबड करत असले तरी तो शांतपणे सगळं ऐकुन घेत होता. त्याचा आवाज दमदार होता. तरी तो हळुवार गोड आवाजात मला बोलला की माझा रागही शांत होई. त्याच असणं मला सुखावू लागलं.
अखेर मी त्याच्याकडे आकर्षित झालेच.
सकाळी नवऱ्याने दहादा आवाज दिला तरी उठायला टाळाटाळ करणारी मी सुटीच्या दिवशीही त्याची हाक कानी पडताच उठून बसत होते. चहाचा बहाणा करून स्वयंपाक घरात रेंगाळत होते. त्याच्या आवडीचे पदार्थ सगळ्यांच्या चोरून त्याला खायला घालत होते.
फक्त सकाळीच भेटणारा तो आता मुद्दाम दिवसातून चार वेळा चकरा मारत होता. मीही वेड्यासारखी त्याच्याशी बोलता यावं म्हणून स्वयंपाक खोलीत जास्तीत जास्त वेळ घालवत होते.
दुपारचा चहा तर हमखास आम्ही सोबत घेत होतो. घरात कोणी तिसरा नाही याची कल्पना येताच तो आनंदात मोठमोठ्याने गप्पा मारायचा. त्याच माझ्या हालचालींवर बारीक लक्ष असायचं. ही बाब मला खूप सुखावत होती. मीही त्याच्या आवडी निवडी जपत होते. दिवस आनंदात जात होते. पूर्वी नवरा ऑफिसला जायला निघाला की प्रेमाने अडवणारी मी आता घाई घाईने डब्बा त्याच्या हातात कोंबून त्याला घराबाहेर काढत होते. माझ्यातले हे बदल नवऱ्याच्याही लक्षात आले पण नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणं नवऱ्याला जड जावू लागले.
' तो' माझ्याशी इतका गोड आणि मोकळे पणाने बोलायचा की मी सतत त्याच्या येण्याची वाट बघायचे. मुलाचे लाड पुरवणारी मी आता मात्र त्याची चाहूल लागताच मुलाकडे ही दुर्लक्ष करू लागले. त्याचं माझ्याशिवाय अडत या जाणीवेने मी मुलाचा विरोध ही मोडीत काढला. आमच्या भेटी वाढल्या तसा तो मला आणि मी त्याला अधिक समजून घेवू लागलो.

आमच्या भेटीत एक दिवस ही खंड पडू नये असं वाटत असतांनाच रविवार यायचा आणि कामाच्या व्यापात त्याला रोज सारखा निवांत वेळ देणं मला अशक्य होवून बसायचं. त्याची भरपाई म्हणून तो सोमवारी त्याच्या आवडीचा पदार्थ माझ्याकडून घेतल्याशिवाय ऐकायचा नाही.
बाहेरगावी गेल्यावर तर मला त्याची आठवण छळायची. त्याच्या ओढीने मी घरी परत आले की तोही त्याचा लटका राग व्यक्त करत त्याने मला कितीदा आठवले हे सांगायचा.
एक वेगळंच नात आमच्यात तयार झालं होतं. त्याला माझ्या बद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला होता.
पण ......
पण एकदिवस अचानक तो तिला घेवून आला. त्याच्या आयुष्यात ' दुसरी' आली. माझ्याशी खिडकीतूनच का होईना पण तिचा औपचारिक परिचय करून दिला. एका स्त्रीला... आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणीबद्दल वाटते तशीच असूया.... भीती तिच्या वागण्यात जाणवत होती. आमच्यातला हा तणाव संपावा म्हणून तो बडबड करून वातावरण हलकं करू पहात होता. तो माझ्याशी वागायचा त्या पेक्षाही तिच्याशी मोकळेपणाने वागत होता ते पाहून मला खात्री पटली की खरं तर त्याच्या आयुष्यातली ती 'पहिली '.... मीच ' दुसरी ' होते. एखाद्याच्या आयुष्यात ' दुसरी ' होण काय असतं ते दुःख मी त्या निमित्ताने अनुभवलं.
वाढत्या वायाला मी कितीही लपवू पहात असले तरी वयानुसार माझ्यात समजूतदारपणाही वाढला होता. तो लपवणे शक्य नव्हते. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे डोळे खूपच बोलके होते. त्याच्या राजबिंड्या रूपाला ती अगदी साजेशी होती. पहिल्यांदाच आली आहे म्हंटल्यावर मी तिला पेढ्याची पोळी दिली. ती अजिबात खायला तयार नव्हती. त्याने समजावल्यावर तिने मनाविरुध्दच खाण्याच नाटक केलं. तिचा माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता हे तिच्या वागण्यात मला स्पष्ट जाणवलं
वर वर समजूतदारपणा दाखवत असले तरी तिच्या अशा वागण्याने त्या दोघांमधे मी तिसरी ठरत होते. मन अजुनच दुख्खी झालं. माझ्या अपेक्षा तरी काय होत्या..... त्याने माझ्याशीच बांधील रहावं अशी सक्ती मी कधीच केली नव्हती. त्याला त्याच हक्काचं माणूस हवंच... याला माझी हरकत नव्हतीच. त्याच्या आयुष्यात मी कायम ' दुसरी' राहणार हे ही मी मान्य करायला तयार होते. माझ्या मनाचा जराही विचार न करता तो तिला घेवून आला . एरवी माझ्याशी गोड बोलणारा तो आता तिच्या भोवती गोंडा घोळत होता . तिच्या आवडी निवडी जपत होता . हे ही मी सहन करायला तयार होते.
पण तिचा माझ्या प्रतीचा अविश्वास .... मला रोज रोज सहन करणं जड जात होतं.
न रहेगा बास न बजेगी बांसुरी..... या उक्तीप्रमाणे अखेर
मी स्वयंपाक घराची खिडकी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याला शंका आली होतीच. त्यात स्वयंपाक करतांना सतत खिडकी उघडीच ठेवणारी मी आता खिडकी बंद करून बसले होते. नवरा आता माझ्याकडे वेळात वेळ काढून लक्ष देत होता. मला काय हवं नको ते जातीने बघत होता. वेळोवेळी त्याच माझ्यावर असलेलं प्रेम आवर्जून व्यक्त करत होता.
'तो' ही न चुकता खिडकीत येत होता. सोबतीला तिलाही घेवून येत होता. जणू काही आमच्या नात्यात काहीच बदल झाला नाही हे मला दाखवू पाहत होता.

मी लक्ष देत नाही म्हंटल्यावर रविवारी सकाळी तर त्याने इतका गोंधळ घातला की नवऱ्यालाही जाग आली. मी धावतच नवऱ्याच्या मागे गेले.
नवऱ्याने आधी स्वयंपाक घराची खिडकी उघडली. नवऱ्याने खिडकी उघडताच तो जरा बावरला पण त्याचा निर्धार पक्का होता. त्याच्या सोबत तीही होतीच.
त्याचं तिच्यावर प्रेम होतं पण त्याला मीही हवी होती. स्वयंपाक घराची ती खिडकी म्हणजे त्याच हक्काचं दाणा पाणी मिळण्याच ठिकाण होतं. दिवसभर भटकून थकल्यावर खिडकीतल्या झाडावर बसून तो माझ्याशी आणि आता तिच्याशी गप्पा मारायचा ते त्याचे विसव्याचे क्षण होते. त्याला ते गमवायचे नव्हते. तो मोठ मोठ्याने चिवचिवाट करून मला त्याच्या मनातली तगमग सांगत होता.
खरं तर आम्हा दोघांना स्वतःचे स्वतंत्र आयुष्य असले तरी आता एकमेकांची सवय झाली होती. मलाही खिडकी बंद करून रहाणं जड जात होतंच ..... मग काय... मी माझा हट्ट मागे घेतला. चहा करता करता मी हळूच तांदळाचे दाणे त्याला खायला दिले आणि नवऱ्याला आमच्यातल्या तिसऱ्याचा अलगद शोध लागला.
माझ्यासाठी .... माझ्यावरच्या प्रेमासाठी..... नवऱ्याने आम्हाला थोडा एकांत मिळावा म्हणून "चालू द्या तुमचा संवाद ... मी जावून फ्रेश होतो म्हणत काढता पाय घेतला".
तांदळाचे दाणे बघताच त्यानेही लगेच तिला आवाज दिला. दोघांनी मस्त पोटभरून न्याहारी केली. आज ती लगेच उडून गेली नाही. दोघंही जरा वेळ मागेच रेंगाळले .
झाडाच्या फांदीवर बसलेला तो पूर्वी सारखाच चिवचिवाट करत होता. तीची मात्र शांत राहून चुळबुळ सुरु होती. त्याच्यासाठी तिने मला भित भित का होईना स्विकारलं.
एक ना एक दिवस तिला माझ्याबद्दल विश्वास वाटेल आणि ते दोघं आपल्या पिल्लांनाही विश्वासाने माझ्याकडे घेवून येतील. अशी मला आशा होती. तेवढ्यात चहाची वाट बघणाऱ्या नवऱ्याने त्यांच्याकडे बघत मला चिडवल...." त्यांचे लाड पुरवून झाले असतील तर मलाही एक कप चहा हवाय?" असं म्हणतच नवऱ्याने हळूच भरलेला पाण्याचा पेला त्यांच्या रिकाम्या मडक्यात ओतला. तो चिवचिवाट करायचा थांबला. हळूच खाली उतरून दोघेही पाणी प्यायले . तृप्त होवून भुरकन उडून गेले.
मी मात्र नवऱ्याच्या या छोट्याश्या कृतीने वयाच्या या नाजूक वळणावर नव्याने त्याच्या प्रेमात पडले.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी आहेच. इतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. ब्लॉग ची लिंक anjali-rangoli.blogspot.com हि आहे.

No comments:
Post a Comment