#खरी_लाईफ_लाईन
#१००_शब्दांची_गोष्ट
९वीच्या विद्यार्थ्यांना,"तूच माझी लाईफ लाईन" या विषयावर निबंध लिहून वाचायला सांगितला.
आयुष्यात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या व्यक्तींवर, नात्यांवर सगळ्यांनी भरभरून बोलायला सुरुवात केली.
शहरीकरणाला अगदीच नवीन त्यामुळे मंदबुध्दी म्हणून हिणवले जात असलेला संतोष जेव्हा त्याचा निबंध वाचायला उठला तेव्हा वर्गात एकच हशा पिकला.
"दिल्लीची सद्यपरिस्थिती बघता निसर्गाचा समतोल राखला नाही तर पुढची पिढी सुदृढ, निरोगी जन्माला येणं कठीण.
निसर्ग जीवन स्रोत आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि कसदार जमीन हिच भावी पिढीची लाईफलाईन आहे.
निसर्ग नेहमीच खूप देतो आता आपली वेळ आहे.
जल, वायू आणि जमीन राखूया प्रदूषण मुक्त,
निसर्गच खरी लाईफलाईन लक्षात असू द्या फक्त"
थोड्यावेळ पूर्वी हसण्यात बुडालेला वर्ग टाळ्यांच्या कडकडाटात गरजून निघाला.
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:
Post a Comment