कोलम प्रकार हा काढायला कठीण वाटत असला तरी ह्या रांगोळ्यां काढण्यात काही औरच मजा आहे. थेंब जोडण्यात जशी मज़ा असते. तशीच मज़ा थेंबा भोवती गिरक्या घेण्यात असते. या रांगोऴीत हाताला सफाई असणे ज़से गरजेच आहें तसे च बुद्धिचा कस ही इथे लागतों. घाईत न काढ़ता.... जेव्हा डोक्यात अनेक विचार गोँधळ घालत असतात तेव्हा या रांगोळया आपल्याला त्या पासुन दूर ठेवन्यात मदत करतात. अशी माझी धारणा आहें. "ब्रेन विथ ब्यूटी" अश्याच या रांगोळया आहेत अस मला वाटतं. कोलम प्रकार काढण्यात सराईत असणारे अनेक महान कलाकार आहेत. ऑनलाइन अनेक ड़िझाइनस् उपलब्ध आहेत. या रांगोळया नेहमीप्रमाणे काढण्यात येतात. परंतु वेगळ्याच पद्धतीने सजवल्यामुळे तीच्या सौंदर्यात भर पड़ते . आवड़लेल्या काही रांगोळ्या इथे देत आहे. प्रत्येक थेंबाच्या भोवती गिरक्या घेत ही रांगोळी पूर्ण होते. काही प्रकार इथे देत आहे.
प्रकार क्र. १
प्रकार क्र. १
प्रकार क्र. २
प्रकार क्र. ३
प्रकार क्र. ४
प्रकार क्र. ५
प्रकार क्र. ६
No comments:
Post a Comment