नूतन वर्ष २०१६ च्या आगमनानिमित्त : उगवता सूर्य हा नेहमीच सकारात्मक ऊर्जा घेवून येतो. तरीही आजचा सूर्य नव्या नवलाईचं तेज घेवून येतो...... नव नव्या संकल्पनांचा नजराणा...... सोबतीला आशेच्या नव्या किरणांची झळाळी........ आणि सर्वात विशेष म्हणजे नवीन वर्षाची नव्हाळी.... म्हणूनच आजचा सूर्य काही खास असतो...... नव्या वर्षाचा आरंभ..... तर नव्या स्वप्नांचा प्रारंभ असतो. नव वर्षाच्या सूर्याचे स्वागत करतांनाची प्रसन्न पहाट रेखाटण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझ्या सर्व वाचकांना नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.........
Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त ( २०१५ )
दिवाळी हा सण खऱ्या अर्थाने दीपोत्सव आहे, दिव्यांचा प्रकाश अंधाराला दूर करून मंगलमय वातावरणाची अनुभूति देतो. दिवाळीच्या पाच दिवसांपैकी दिवाळी पहाट विशेष महत्त्वाची असते. म्हणूनच अभ्यंग स्नानाच्या सोबतीने दिव्यांच्या पवित्र प्रकाशात न्हावून निघालेल्या पहाटेला रांगोळीत चित्रित करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आकाश दिवा आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. ही दिवाळी सर्व वाचकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाची आणि भरभराटीची जावो .......
( रांगोळी आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरु नका. )
( रांगोळी आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरु नका. )
विजयादशमी निमित्त (२०१५ )
दसरा या सणाला अनेक ऐतिहासिक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. या दिवशी आपट्याच्या पानांना आणि झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोन्यासारखा मान असतो . " सोनं घ्या , सोन्यासारखं रहा " असे म्हणून लहानांनी मोठ्यांना आपट्याची पाने देण्याची पध्दत आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावून सुशोभित करतात. पहाटेच्या मंगलमय वेळी दाराला झेंडूच्या फुलांचे लावलेले तोरण आणि आपट्याच्या पानाची केलेली पुजा दस-याच्या सणाची जाणीव मनाला देवून प्रसन्न करतात. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा .(२०१५ )
नवरात्र उत्सव निमित्त
नवरात्र उत्सव निमित्त दुर्गा देवीचे मुख रेखाटले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे वेगळेपण हे आहे की, प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र रंग आहे. प्रत्येक रंग हा देवीच्या एका रुपाच प्रतिक आहे. म्हणूनच नऊ दिवसांच्या नऊ रंगांचा वापर मुखवट्याला बॉर्डर करण्यासाठी प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा…
गणेश उत्सव ( प्रथम दिन )
स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम ।
बल्लाळो मुरुडम विनायक मढम चिंतामणी : थेउरम ॥
लेण्याद्री गिरिजात्म्जम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम ।
ग्रामे रांजण संस्थितो विजयताम कुर्यात सदा मंगलम ॥
गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले आहे. त्यांच्या सेवेसाठी लहान -थोरांची तयारी ही जय्यद झालेली आहे. तर मग मंगलमय रांगोळ्यांना विसरून कसे चालेल. माझ्या या रांगोळ्या आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी सप्रेम भेट ……
गणेश उत्सवासाठी अष्टविनायक रंगोळीत रेखाटण्याच्या माझ्या प्रयत्नाला मोरगांव च्या मोरेश्वराला नमन करून सुरुवात करत आहे. तुम्हालाही या रांगोळ्याच्या प्रवासात सामिल व्हायला आवडेल न.… , तर मग तुमचा अभिप्रय कळवायला विसरु नका. ब्रम्हा, विष्णू , महेश ,शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी मोरेश्वर गणपतीची स्थापना केली आहे. याच ठिकाणी सिंधू व कमलासूर दैत्यांचा संहार करतांना गणपतीचे वाहन मोर होते. त्यामुळेच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली आहे.
(गणेश मंडळाच्या मंडपात कमी रंग वापरून तयार केलेल्या या गालीच्यामधेही तुम्ही श्री गणेशाची ही रांगोळी प्रभावीपणे काढू शकता. )
गणेश उत्सवासाठी अष्टविनायक रंगोळीत रेखाटण्याच्या माझ्या प्रयत्नाला मोरगांव च्या मोरेश्वराला नमन करून सुरुवात करत आहे. तुम्हालाही या रांगोळ्याच्या प्रवासात सामिल व्हायला आवडेल न.… , तर मग तुमचा अभिप्रय कळवायला विसरु नका. ब्रम्हा, विष्णू , महेश ,शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी मोरेश्वर गणपतीची स्थापना केली आहे. याच ठिकाणी सिंधू व कमलासूर दैत्यांचा संहार करतांना गणपतीचे वाहन मोर होते. त्यामुळेच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली आहे.
(गणेश मंडळाच्या मंडपात कमी रंग वापरून तयार केलेल्या या गालीच्यामधेही तुम्ही श्री गणेशाची ही रांगोळी प्रभावीपणे काढू शकता. )
( ४) श्रावण सोमवार २०१५
महादेव हे लोकांना अध्यात्मिक भक्तीसाठी सदैव प्रेरीत करत आलेले आहेत. " संसारात राहुनही संन्यासी बनतां येतं" हे आपल्याला त्यांच्याकडुन शिकतां येत. संन्यासाच प्रतिक म्हणजे , ' मस्तकावर रेखाटलेल्या विभूतीच्या तीन रेषा ' . महादेवाचे त्रिशुल हे ' मद , मत्सर आणि मोह ' या तीन वाईट गुणांवर नियंत्रण करण्याचे सुचवते . म्हणूनच विभुतीचे तीन पट्टे आणि त्रिशुल असलेले गंध शिवभक्तांच्याच मस्तकावर शोभून दिसते. आज श्रावणातला शेवटचा सोमवार तेव्हा शिवाला आणि शिवभक्तांना माझे शत् शत् प्रणाम.
Subscribe to:
Posts (Atom)