जगण्याला माझ्या अर्थ दे ( कविता)

 #जगण्याला_माझ्या_अर्थ_दे


खूप काही मला नको

फक्त आत्मविश्वाचे बळ दे

इतरांच्या कामी यावे

अशी सद्सदविवेक बुद्धी दे

गोरगरीबांचे आशिर्वाद लाभावे

हातून असे कार्य घडू दे

जीवाला जीव द्यावे

असे आप्तगणांचे प्रेम दे

संघर्षालाही मी हरवावे

असे मला सामर्थ्य दे

जीवन हे फुका न जावे

जगण्याला माझ्या अर्थ दे

©️Anjali Minanath Dhaske 




नवरात्र विशेष (१८) सुविचार

#नवरात्र विशेष #सुविचार 

नऊ दिवस.....   नऊ देवी.....  नऊ रंग यांच्या सोबतीला प्रत्येक देवीच्या अंगी असलेल्या दोन गुणांवर आधारित आधुनिक सुविचार. 

नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. 

Thank you 

@Anali Minanath Dhaske 

शैलपुत्री:  स्थीर 

स्त्रीचे चित्त स्थीर असल्यास संसारातील 

आव्हाने सहज पेलता येतात.


शैलपुत्री: निग्रही 

दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यास स्त्रीने निग्रही असणे गरजेचे आहे.




ब्रम्हचारिणी: निडर

आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्त्रीने निडर होवून काम करावे. 


ब्रम्हचारिणी: सामर्थ्यशाली 

सामर्थ्यशाली स्त्रियाच इतिहास घडवत  त्यांच्या आयुष्याचा प्रवास अजरामर करतात.




च्रंदघंटा: सजगता

समाजात वावरतांना सजगता बाळगल्यास अनेक वाईट प्रसंग टाळता येतात.



च्रंदघंटा: खंबीरपणा

कोमल हृदयाची स्त्री कठीण प्रसंगी कुटुंबासाठी
 खंबीरपणे उभी राहते. 

 


कुष्मांण्डा : निर्मिती

कला, कल्पना, जीव निर्मिती क्षमता 
स्त्री अंगी जन्मजात असते 


कुष्मांण्डा : अस्तित्व

'स्त्री अस्तित्वाचा सन्मान करणारे मन' 
ख-या पुरूषाची ओळख होय. 

स्कंदमाता : निरागसता

बालपणीची 'निरागसता' कायम जपल्यास
मनुष्यप्राणी ख-या अर्थाने 'माणूस' होईल.


स्कंदमाता: करूणा

परदुःख पाहून करुणा जागृत होणार्‍या हृदयात साक्षात देवी वसते. 



कात्यायनी: मातृत्व 
केवळ गर्भधारणेतून नव्हे तर
'वात्सल्य' भावनेतून खरे 'मातृत्व' साकारते.

कात्यायनी: संगोपन 

संगोपनाला 'संस्काराची' जोड दिल्यास बालमनाचा योग्य विकास  साधता येईल. 


कालरात्री : वेळ

वेळीच वेळेचे महत्त्व ओळखल्यास 
माणसावर वाईट वेळ येत नाही. 


कालरात्री : कार्यक्षमता 
चांगल्या सवई, शिस्त, नियम यांच्या पालनाने कार्यक्षमता वाढीस लागते.

महागौरी: विद्वत्ता

पेहेराव क्षणभर 'नजरा', तर
विद्वता 'बुद्धीला' कायम आकर्षित करते 

महागौरी: ज्ञान 

पैसा, गाडी, बंगाला देण्यापेक्षा 
मुलांना 'वारसा' म्हणुन 'ज्ञान' द्यावे.
 
सिध्दीदात्री: बुध्दी 

उपजत बुद्धीचा वापर करण्याच्या 
'कौशल्यावरून' मनुष्याचे 'संस्कार' 
ओळखले जातात. 


सिद्धीदात्री :  दृष्टी

निव्वळ 'सौंदर्य टिपणारी दृष्टी' असण्यापेक्षा
 'दूरदृष्टी' असणे आवश्यक आहे. 









































कालिका माता रांगोळी

 #कालिका_माता_रांगोळी 

कालिका देवी तिच्या उग्र रूपाने प्रचलित असली तरी तिचे शांत रूप हे अत्यंत प्रसन्न आणि वरदायी आहे.  

अत्यंत मंगलमय वातावरण निर्माण करणारी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/BYhgkFMw-go

©️Anjali Minanath Dhaske 





नाण्याच्या दोन बाजू ( कविता)

विषय: सुखाची परिभाषा

कवितेचे नाव: नाण्याच्या दोन बाजू



कर्पूरा सम जळते सुख 

अन् 

दुःख अगरबत्ती समान 


उगाळल्या दुःख जाते फार 

अन् 

सुख उडते अत्तरा समान 


सुतळी बॉब क्षणात फुटतो सुखाचा

अन्

 दुःखाचा भुईनळा वेदनेच्या पाऊसा समान 


 सहवास दुःखाचा त्रासदायक फार 

अन्

सुखाचा दरवळ सुगंधा समान 


सारे सज्ज कवटाळण्या सुख 

अन्

दुःख वागविले जाते अस्पृश्या समान 


चिवट दुःख जगते फार 

अन्

सुख क्षणभंगूर आयुष्या समान 


दिव्याचा प्रकाश म्हणजे सुख 

अन्

दुःख अंधकारा समान 


एकट्यात झिजते दुःख फार 

अन्

सुख गर्जते जयकारा समान


अमृताची गोडी घेई सुख 

अन्

 दुःख झिडकारले जाते विषा समान 


पदोपदी शिकविते दुःख फार 

अन्

सुख जपतो आपण छंदा समान


गर्वाची बाधा होते सुखाला 

अन्

दुःख शिकविते पाया घट्ट करने वृक्षा समान 


सुखाला दुःखाची साथ फार 

अन्

आयुष्याची वाटणी करती सम समान 


स्फूर्ती देई सुख 

अन्

दुःख नैराश्या समान 


सुख दुःख आयुष्याचे सोबती

 अन्

संसार यांचा नवरा बायको समान 


रूसता सुख, दुःखही हसवते फार 

अन्

अवचित सुखही ओघळते अश्रू समान


निव्वळ सुखाची परिभाषा अवघड फार 

कारण 

सुख दुःख नाण्याच्या दोन बाजू समान 


©️ अंजली मीनानाथ धस्के 

 पुणे



 

 #नवरात्री2022

नवरात्र, नऊ रंग  आणि नऊ शुभ चिन्हे असलेली मंगलमय रांगोळी कशी काढावी हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 

https://youtu.be/2CKUyI_ay-0




घट स्थापना 2022

 #घटस्थापना2022

अत्यंत साधी सोपी सुंदर अशी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇👇👇

https://youtu.be/kIf4pLzKqYg

©️Anjali Minanath Dhaske 



ठिपक्यांची रांगोळी

 #ठिपक्यांची_रांगोळी 

ही रांगोळी काढायला अत्यंत सोपी असून दिसायला आकर्षक आहे.  या रांगोळीसाठी रंग ही कमी वापरावे लागतात. 

संपूर्ण video खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर बघायला मिळेल. 

https://youtu.be/g_S_2nRVzVQ

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)