रक्षाबंधन स्पेशल छोट्यारांगोळ्या भाग३ (४ते४ थेंबी)


#रक्षाबंधन_स्पेशल
#४ते४ठिपक्यांच्या
#छोट्या_रांगोळ्या
#भाग३
#कमळ
#मोर
#स्वस्तिक
#दिवे
खास तुमच्यासाठीच घेवून येत आहे. मोर ,कमळ, स्वस्तिक दिवे अशी चिन्हे असलेल्या अगदी सोप्या आणि सुंदर रांगोळ्या .
रांगोळ्या बघितल्यावर तुम्हालाही रांगोळी काढून बघण्याचा मोह अनावर होईल.
सुंदर  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग ३) हा व्हिडिओ नक्की बघा. याचेच भाग १  आणि भाग २ हे व्हिडिओ ही बघायला विसरु नका.
सगळ्या रांगोळ्या बघण्यासाठी *रंग माझा वेगळा* या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगिरे )

                          प्रकार १:


प्रकार २:



प्रकार ३:







जागतिक मैत्री दिवस रांगोळी २०२०

#जागतिक_मैत्री_दिवस(२०२०)
#आगळी_वेगळी
#रांगोळी 
       जागतिक मैत्री दिवस निमित्त घेवून येत एक सुंदर आगळी वेगळी रांगोळी. आपल्या परसबागेतील फुला पानांचा वापर करून एक अनोखी रांगोळी साकारता येते. अगदी सोपी सुंदर अशी ही रांगोळी तुम्हाला आवडली का ? प्रतिक्रिया नोंदवायला विसरु नका.
जागतिक मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
          असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Thank you
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

रक्षाबंधन स्पेशल छोट्या रांगोळ्या (४ते४थेंबी) भाग २



#रक्षाबंधन_स्पेशल२०२०
#छोट्या_रांगोळ्या
#भाग२
#४ते४थेंबी
श्रावणात सणांची रेलचेल असते. रोज देवासमोर / दारात छोटी का होईना रांगोळी काढावी वाटते.
    म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांच्या #झटपट होणाऱ्या आणि तितक्याच #सुंदर दिसणाऱ्या रांगोळ्या.  #देवासमोर , #तुळशीसमोर किंवा #अंगणात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. आकाराने #अतिशय #छोट्या असल्याने ह्या रांगोळ्यांना जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.
विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाला  याच छोट्या  रांगोळ्यांच रूपांतर राखी रांगोळी मधे अगदी सहज करता येते.
      सुंदर  रांगोळी काढणे खूप किचकट काम वाटते तर छोट्या रांगोळ्यांचे तीन प्रकार (भाग २) हा व्हिडिओ नक्की बघा. याचेच भाग १  आणि भाग ३ हे व्हिडिओ ही बघायला विसरु नका.
   #लहान मुलांना #kids शिकवण्यासाठी खूप #उपयुक्त. तुम्हीही काढून बघा. तुम्हाला रांगोळी शिकण्यासाठी या व्हिडिओचां फायदा होतो आहे का? हे जाणून घ्यायलाही नक्की आवडेल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Thank you
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

                           प्रकार १:



प्रकार २:


प्रकार ३:





प्रकार ४:


छोट्या रांगोळ्या


राखी रांगोळ्या






श्रावण_सोमवार१ शिवामूठ रांगोळी (२०२०)


#श्रावण_सोमवार१
#शिवामूठ
#रांगोळी
     
 यंदा घराबाहेर पडून मंदिरातील महादेवाचे दर्शन घेवून शिवामूठ आणि बेल पाने वाहाने शक्य नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात शिवा मूठ पासून मनमोहक  रांगोळी साकारून ती रांगोळी शिव चरणी अर्पण करून भक्तीमय वातावरणाची निर्मिती नक्कीच करू शकता. बेल पाने रांगोळीत साकारून घरच्या घरी मनोभावे पूजा करून मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
         म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे  #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #रांगोळी. ह्या रांगोळीला जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.
तयार रांगोळी बघितल्यावर तुम्हालाही अध्यात्मिक सुखाचा अनुभव येईल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you
धन्यवाद
#Stayhomestaysafe
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)

ती, तो आणि प्रेमळ संवाद (प्रसंग २)

    #ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद
प्रसंग २
   ©️ अंजली मीनानाथ धस्के
 कोरोना नावाच्या विषाणूने जग बंद पाडलं होतं पण तीच काम काही बंद पडलं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच फुकट गेल्या. पावसाळी सहलीला   जाण्याचे योगही नष्ट झाले. चीनी लोकांच्या वृत्तीचा आणि सामानाचा निषेध करून झाला तरी हा मेला विषाणू मरायच नाव घेत नाही याचा राग मनात खदखदत होता. आपणच बनवायचं, आपणच खायचं आणि नंतर आपणच भांडी घासायची याचा आलेला कंटाळाही लपवू म्हंटल तरी तिला लपवणे कठीण जात होत. त्याचा ताण शरीरावर आणि मनावरही येत होताच.
 अधिक महिन्यात माहेरी जाता येणार नाही याची चिंताही मनाला सतावत होती. दिवसाच्या रूटीनमधे या  ऑनलाईन शाळेने जी काही उलथा पालथं केली होती तिचा जोरदार विरोध करण्याचा विचार असूनही तो कधीच कृतीत आणता येत नाही याची सलही मनात बोचत होतीच.
     सकाळी सकाळी डबा  बनवण्याची घाई असलेल्या तिच्या डोक्यात विचारांचा नुसता गोंधळ सुरू होता.
          इतक्यात ऑफिसला जाण्याची तयारी करत असलेला नवरोबा अधून मधून स्वयंपाक घरात चक्कर टाकून जात होता. पहिल्या खेपेला त्याच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली. दुसऱ्या खेपेला मस्त गरमा गरम चहा दिला. तरी तिसऱ्या खेपेला ती डबा नीट भरते आहे की नाही याची खात्री करून घेत तो उगाच तिथे घुटमळला.
     आपण तिच्यावर लक्ष ठेवतो आहे हे तिच्या लक्षात येवू नये म्हणून उगाच खिडकी बाहेर झाडाच्या फांदीवर  अंग फुगवून निवांत बसलेल्या चिमण्याकडे बघत तो बोलला ," बघ ग ...  लॉकडाऊनमुळे हा चिमणा जाड झालाय ना ?"
     तिने  चिमण्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. एक जळजळीत कटाक्ष शर्टच्या इन मधे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या ढेरीकडे टाकला  आणि बोलली ," चिमणा जाड झालाय खरा "
तस त्याने एका श्वासात पोट आत  तर पाय काढता घेतला.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
सोबतीला रांगोळी ही आहेच.

ती, तो आणि प्रेमळ संवाद ( प्रसंग १)

#ती_तो_आणि_प्रेमळ_संवाद
प्रसंग १
©️ अंजली मीनानाथ धस्के
    टिव्ही वर साबणाची जाहिरात पाहिली की तिला भारी नवल वाटत.
जाहिरातीतील स्नानगृह हे झाडा झुडूपानी भरलेलं जंगलच  असतं.....
आंघोळीला जातांना यातल्या बायका  साबणाची नवी कोरी वडी काय घेतात. त्या वडीवरच नाव दाखवत आंघोळ काय करतात. अंघोळ करून झाली रे झाली की स्नान गृहाच्या बाहेर पडल्यावर आई, मुलगी, बहीण, वहिनी तत्सम ....जी कोणी व्यक्ती बाहेर असेल तिला आधी मिठी काय मरतात.   कौतुक करायला नवरा हजर असतो आणि तो भरभरून स्तुती काय करतो. साबणाची वडी असते अगदी त्याच रंगाचे मॅचींग कपडे काय घालतात. भरीस भर छोटी पोरगी....  गर्दीतही "मम्मी " अशी हाक मारते.... त्याचंही कोण कौतुक .... म्हणे संतूर मम्मी .
चिमुकली पोरगी ... पुन्हा पोरगीच हं .... आपल्या सगळ्या मित्र परिवाराला घेवून आंघोळ करून शुचिर्भूत झालेल्या आपल्या आईच्या दर्शनासाठी काय  येणार  "मिम्मी तुझा चेहरा बघितला की दिवस चांगला जातो काय म्हणणार.
किटाणू मारायची वेळ आली की मग चिखलात लोळायच काम मात्र  मुलांच्या वाट्याला येणार. त्यांची आई ती आणि तिचा गुणी बाळ किटाणू मारण्यात कसे तज्ञ आहेत हे मिरवणार.
वरील अनेक गोष्टी जुळवून आणल्या तरी मुलगी नसणाऱ्या आयांना सुंदर  मम्मी .... सो कॉल्ड संतूर मम्मी बनता येणार नाहीच का ???? आम्ही काय कायम किटाणूच मारत बसायच का जन्मभर ????
असा खडा सवाल तिने लॅपटॉप मधे डोकं घालून काम करणाऱ्या तिच्या नवरोबाला विचारला ........
तो ढिम्म....
ते काही नाही ..... मुलगी नसली म्हणून काय झालं....
मलाही संतूर मम्मी बनायचं आहे. तिने तिचा निरागस हट्ट त्याच्या पुढे पुन्हा नेटाने मांडला.
"चिंताssतूर" मम्मी आहेस तेवढं पुरेस नाही का ??? अजून " संssतूर  " मम्मी कशाला हवंय. असं म्हणत तो स्वतःच्याच शब्द कोटीवर मोकळा हसला...
      बाळराजेंनी नजरेनेच वडीलांना सहनभूती दाखवली. तसा
नवरोबाचा श्वास अडकला तरी त्याने धैर्याने ' तो मी नव्हेच' असे भाव चेहऱ्यावर ठेवून पुन्हा लॅपटॉपमधे डोकं खुपसून काम करत असल्याचा अभिनय सुरू ठेवला.
शब्द तीर वर्मी घाव लागेल याचा ठाव घेत निघाला होता.    घरात एकदम भयाण शांतता पसरली.
©️ अंजली मीनानाथ धस्के
टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावा सहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

नागपंचमी २०२०

#नागपंचमी
 #रांगोळी
#४ते४ठिपक्यांची 
 यंदा घराबाहेर पडून नागपंचमी साजरी करणे सुरक्षित नसले तरी घरच्या घरी सुरक्षित वातावरणात नागाचे मनमोहक रूप तुम्ही रांगोळीत साकारू शकता.
पाटावर ही रांगोळी काढून मनोभावे पूजा करू शकता. मन आणि घर प्रसन्न ठेवू शकता.
         म्हणूनच खास तुमच्यासाठी घेवून येत आहे #४ते४ ठिपक्यांची #झटपट होणारी आणि तितकीच #सुंदर दिसणारी #रांगोळी. आकाराने #अतिशय #छोटी असल्याने ह्या रांगोळीला जास्त #जागा आणि वेळ लागतं नाही.

या आधी तुम्ही अशी सोपी सुंदर रांगोळी बघितली नसेल.
#व्हिडिओ #Video आवडल्यास #like #comment #share करू शकता. तसेच  *रंग माझा वेगळा* या YouTube channel ला subscribe करा. असेच नवनवीन कला आविष्कार बघण्यासाठी Bell icon press करायला विसरू नका.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि
"रंग माझा वेगळा " चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

Thank you
धन्यवाद
#Stayhomestaysafe

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
रोज काढण्यासाठी छोटया व अतिशय सोप्या रांगोळ्या ही चॅनलवर उपलब्ध आहेत.