होळी / रंगपंचमी (२०१६)

होळी / रंगपंचमी (२०१६ ) :

या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांनीच गांभीर्य ओळखून  पाण्याचा थेंबन् थेंब वाचवायला हवा. धूलिवंदनला  मित्रमंडळी सोबत नेहमीप्रमाणे रंग न खेलता सर्वांच्या कलगुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. रंगीत रांगोळ्या काढून किंवा चित्रकला स्पर्धा घेवूनही  रंगांची उधळण करता येईल.  तसेच  जमणाऱ्या सर्वांसाठी  अल्पोपहार चे आयोजन करून मिठाईचा  गोड़वाही  चाखता येईल.    सण साजरे करण्यामागचा  खरा उद्देश , " सणांच्या  निमित्ताने सर्वांनी एकत्र येवून सामाजिक बांधिलकी वाढावी हाच आहे " . आपल्या आनंदात दुसऱ्यांच्या सामाजिक भावना  दुखावल्या जावू  नये आणि काळाची गरज लक्षात घेता, काय हरकत आहे सनांच्या पारंपारिक पद्धतीत  थोड़ा बदल करायला.
सर्व वाचकांना होळी व  रंगपंचमीच्या खूप खूप  शुभेच्छा.......



 

महाशिवरात्री (७/३/२०१६ )

महाशिवरात्री निमित्त  (७/३/२०१६ ):

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव शक्ती .......  भक्ती  ........  आणि ब्रम्ह  ..........  आहे.

महाशिवरात्रीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेछा !

 

 

गजानन महाराज प्रकट दिन (१ / ३ / २०१६ )

गजानन महाराज प्रकट दिन (१ / ३ / २०१६ ):

" गण गण गणात बोते " च्या गजरात शेगावच्या गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा उत्सव मोठया उल्ल्हासात साजरा होतो. माझा हा रंगोळीचा प्रयत्न गजानन महाराज यांच्या चरणी सादर अर्पण आहे.

 

 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

 आजच्या चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी



 तुम्हालाही झटपट काढता येईल अशी एकदम सोपी गणपतीची रांगोळी आहे.

 

व्हॅलेंटाईन डे ( २०१६ )

व्हॅलेंटाईन डे ( २०१६ ) :
खऱ्या प्रेमाची एक निराळीच गंमत आहे. खऱ्या प्रेमाला एक आयुष्यही पुरेस नाही आणि खऱ्या प्रेमाचा एक क्षणही आयुष्य जगण्यासाठी पुरेसा असतो. सगळे प्रश्न प्रेम , समंजस्याने सोडवण्याकडे जरी आपला कल असला तरी, " माझं तुझ्यावर प्रेम आहे " असं सांगण्यासाठी खास एक दिवस साजरा करावा हे आपल्या संस्कृतीत  बसत नाही. काय हरकत आहे या धकाधकीच्या  जीवनात आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढून या दिवसाच्या निमित्ताने आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना आपल्या प्रेमाची कबुली देवून आणि ज्यांच आपल्यावर प्रेम आहे त्यांचे आभार  मानून हा दिवस साजरा केला तर. ... ........ ........
 आपल्या सभोवतालच्या सृष्टीतही प्रेमाचं वास्तव्य आहे. तेव्हा प्रेमाने जगा आणि मनातल्या  प्रेमाच्या भावनेलाही असचं जपा . हा संदेश देणारी ही रांगोळी ..... तुम्हाला ही प्रेरणा देणारी ठरेल.