रोज काढण्यासाठीचे डिझाइन






 

थेंबाची रांगोळी

 
 
 
६ -४ -२ थेंबाची रचना करून काढलेली रांगोळी, बाहेरील डिझाइन तुम्हाला हवे तसे काढा.  
 
७ ते ४ थेंबाची रांगोळी 


आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त

विठू  माउलींची  मुर्ती  बघितली  की, "पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ।। अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग ।।"  या  संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांची आठवण झाल्या खेरीज रहात नाही. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त  आकुर्डीतील पालखीच्या मुक्कामाचे औचित्य साधून काढलेली विठोबाची ही रांगोळी विठू माउलींच्या चरणी सादर अर्पण.


चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त गणपतीची ही  रांगोळी साधी , सोपी  आणि  तेवढीच आकर्षक आहे. जास्त रंगांचा वापर  न करताही  रांगोळी आकर्षक बनवता येते.


 

वाढदिवसासाठीच्या रांगोळ्या

मुलांच्या  वाढदिवसासाठी त्यांच्या आवडीचे कार्टून रांगोळीत  काढले की मुलं ही खुप खुश होतात.


 

थेंबाची रांगोळी

थेंबाची रांगोळी काढायला सोपी असते , रोज काढतांना यात रंग नाही भरला तरी चालते आणि सणाच्या दिवशी यात रंग भरला तर रांगोळीचे पारंपारिक सौंदर्य अनुभवता येते.

                                                           ११  ते  ६ थेंबाची रांगोळी
                  

                                       
                                           रंग भरल्या नंतर

 

आंतरराष्ट्रीय योग दिन ( २१-६- १५ )

ही आंतरराष्ट्रीय योग दिना  निमित्त काढलेली रांगोळी आहे. योगासनाचे महत्त्व  आता साऱ्या जगाला पटू  लागले आहे.  तरीही माझ्या सारखे बरेच जण  असतील जे  व्यायामाला " उदया पासून नक्की सुरुवात  करू "  म्हणत  टाळत  असतील , तेव्हा  माझ्या सारख्यां साठी व्यायाम सुरु करण्याची   " आंतरराष्ट्रीय योग दिन " ही एक सुवर्ण संधीच आहे  .  या वर्षी मी खरच  व्यायामाला  ( योग ) सुरुवात  केली  आहे. तुम्हीही पुढच्या वर्षीच्या  योग दिनाची वाट बघू नका.  उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ति आहे.