Labels
- सण (222)
- डिझाइन (80)
- कथा (78)
- लेख (60)
- गणपती (58)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (44)
- दिवाळी (41)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (32)
- नवरात्री/.दसरा (28)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (15)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- नवरात्री (4)
- समीक्षा (3)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
थेंबाची रांगोळी
ही रांगोळी माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. बालपणीच्या ब-याच आठवणी या रांगोळीशी निगडीत आहेत. माझ्या रांगोळ्यांचा प्रवास याच रांगोळीने सुरू झाला . मी ही रांगोळी काढण शिकावं म्हणून आजी सांगायची ," ही रांगोळी दर सोमवारी दारात काढणा-याला एक गहु सोनं देवाला वाहिल्याचं पुण्य मिळतं ". खर तर तेव्हा या रांगोळीत थेंबांच्या जोडणीचा क्रम लक्षात ठेवला की, रांगोळी आपोआप तयार होत जाते ही गोष्टचं मला खुप आवडायची. आजही रांगोळी काढतांना मजा येते. दिलेल्या पाय-यांनुसार रांगोळी काढून बघा , तुम्हालाही खुप मजा येईल.
तयार झालेली रांगोळी:
पायरी क्र.१ :
पायरी क्र. २ : कुठल्याही रांगेतील थेंब १ दुस-या रांगेतील थेंब ३ ला जोडणे. मग तिस-या रांगेतील थेंब ५ ला जोडून चौथ्या
रांगेतील थेंब २ ला जोडणे. शेवटी पाचव्या रांगेतील थेंब ४ जोडणे, पुन्हा सहाव्या रांगेपासून १-३-५-२-४ हाच थेंब जोडणीचा क्रम सुरू ठेवणे.पायरी क्र. ३ : थेंब जोडणीचा १ - ३ - ५ - २ - ४ हाच क्रम ठेवणे.
पायरी क्र. ४ : ज्या थेंबापासून सुरूवात केली त्या थेंबावरच रांगोळीचा शेवट येतो आणि रांगोळी पूर्ण होते.
पायरी क्र. ५ : रांगोळीची थोडी सजावट करणे. रंग न भरताही रांगोळी छान दिसते.
पर्यावरण दिन
उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरलेले गुलमोहराचे झाड बघून मनाला जी प्रसन्नता लाभते, त्या पासून प्रेरीत होवून काढलेली ही एकदम साधी रांगोळी आहे. झाड काढण्यासाठी केवळ हिरवा रंग न वापरता अनेक रंगांचा प्रभावी पणे केलेला वापर फुलांनी बहरलेल्या झाडाची अनुभूती ही रांगोळी तर देतेच ,पण पर्यावरणाची गरज लक्षात घेता " झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेशही नकळत आपल्याला देवून जाते.
थेंबाची रांगोळी
थेंबाच्या या रांगोळीत मी एकात रंगाच्या छटा वापरल्या आहेत. परंतु तुम्हाला हवे ते रंग तुम्ही या रांगोळीत वापरू शकता.
रांगोळी काढायला सोपी जावी या उद्देशाने रांगोळी काढतांनाच्या काही पाय-या दिलेल्या आहेत. पाय-यांच्या साह्याने रांगोळी
फुलपाखरुची रांगोळी
१० ते १० थेंबाची फुलपाखरुची रांगोळी
आपण नेहमी पांढऱ्या रंगाने रांगोळी काढतो ,त्या ऐवजी पांढऱ्या रंगाने संपूर्ण चौकोन काढून तसेच या रांगोळीला काळ्या रंगाने बॉर्डर केल्याने ही रांगोळी अधिक खुलली आहे. रंग भरण्याच्या या पद्धतीमुळे ही रांगोळी थेंबाची असूनही गालीच्या पद्धतीची रांगोळी असल्यासारखी भासते.
ही रांगोळी थेंबाची असली तरी या रांगोळीचे वैशिष्टय हे आहे की , यात थेंबांना एकमेकांना जोडायचे नसून थेंबांना सोडून रांगोळी पूर्ण करायची असते. ही रांगोळी काढतांना आपण ज्या ठीकणा पासून सुरुवात करतो त्याच ठिकाणावर या रांगोळीचा शेवट होतो. (ही रांगोळी अखंड असते. )

या पद्धतीने थेंबांची रचना करून वर दाखवल्या प्रमाणे रांगोळी काढावी.
Subscribe to:
Posts (Atom)