नाताळ ( २०१७ )

नाताळा निमित्त काढलेली रांगोळी.
सान्तक्लोज सगळ्यांना भेट वस्तू देतो. हरणाच्या गाडी मधे बसून येतो. हा सण स्नो मॅन च्या प्रतिकृती शिवाय पूर्ण होवुच शकत नाही. सर्व वाचकांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा.....







थेंबाची रंगीत रांगोळी ( कोलम प्रकार )

थेंबांच्या रंगीत  रांगोळ्यांचे काही  वेगळे प्रकार  येथे दिलेले आहेत.
                        प्रकार क्र. १



प्रकार क्र.२



रंगीत रांगोळी

मनाला भावेल अशी रंगसंगती करून आज अगदी साधी रांगोळी रेखाटली  आहे.

रंगीत रांगोळी

मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा  गुरूवार..... म्हणून रांगोळीत लक्ष्मीची पाऊले काढलीत आणि  त्या भोवती मनाला भावेल अशी रंगसंगती करून अगदी साधी रांगोळी रेखाटली  आहे.

रंगीत रांगोळी

मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार.....आज अनेक गृहिणी वैभव लक्ष्मीची पूजा मांडून  उपवास करतात. म्हणून रांगोळीत लक्ष्मीची पाऊले काढून त्या भोवती पानांना मोरपीसाप्रमाणे रेखाटण्याचा माझा प्रयत्न तुम्हालाही आवडेल.

दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त (२०१७)

दिवाळी निमित्त (२०१७ ) :          

दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. या दिवशी आपण लक्ष्मी देवतेचे पूजनही करतो. लक्ष्मीची विविध रूपे  आहेत. गजलक्ष्मी हे ही लक्ष्मीचेच रूप. गजलक्ष्मी उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश करते आहे. हे चित्र जेव्हा मी बघितले तेव्हाच मी या चित्राच्या मोहात पडले . कमळ कळयांचा मुकुट ल्यालेली , चेहऱ्यावर सात्विक भाव असलेली आणि माप ओलांडून घरात धनधान्याची भरभराट घेवून येणारी ही गजलक्ष्मी आपण सर्वांना प्रसन्न होवो........
दिवाळीच्या सर्व वाचकांना  खूप  खूप  शुभेच्छा........
( रांगोळी आवडल्यास कॉमेंट बाॅक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका.)
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के

      पुणे, चिंचवड ३३













दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत बॉर्डर

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत बॉर्डर :

                                                             बॉर्डर प्रकार : १




 बॉर्डर प्रकार : २