Labels
- सण (222)
- डिझाइन (80)
- कथा (78)
- लेख (60)
- गणपती (58)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (44)
- दिवाळी (41)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (32)
- नवरात्री/.दसरा (28)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (15)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- नवरात्री (4)
- समीक्षा (3)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त (२०१७)
दिवाळी निमित्त (२०१७ ) :
दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. या दिवशी आपण लक्ष्मी देवतेचे पूजनही करतो. लक्ष्मीची विविध रूपे आहेत. गजलक्ष्मी हे ही लक्ष्मीचेच रूप. गजलक्ष्मी उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश करते आहे. हे चित्र जेव्हा मी बघितले तेव्हाच मी या चित्राच्या मोहात पडले . कमळ कळयांचा मुकुट ल्यालेली , चेहऱ्यावर सात्विक भाव असलेली आणि माप ओलांडून घरात धनधान्याची भरभराट घेवून येणारी ही गजलक्ष्मी आपण सर्वांना प्रसन्न होवो........
दिवाळीच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा........
( रांगोळी आवडल्यास कॉमेंट बाॅक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका.)
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
पुणे, चिंचवड ३३
मोराचे डिझाइन
दिवाळीसाठी दारात काढायचा साधी सोपी मोराची रांगोळी :
मोर...... काळ कीतीही पुढे गेला तरी स्त्री मनाला मोर... मोरपीस यांची पडलेली भुरळ काही कमी होत नाही. स्त्रीला अगदी साडीच्या पद्रावर ही मोर हवाच असतो. तिला आनंद झाला की मन ही मोर बनून नाचू लागते. ती प्रेम करते तेही मोर पिसासारखं हळुवार सुखावणारं..... तिच्या मनातल्या भावनाही विविधरंगी अगदी मोर पिसासारख्याच . जसे मोरपीसात एकाच रंगाच्या अनेक छटा असतात.....तसे एका स्त्रीची अनेक रूपे असतात आणि प्रत्येक रूप तितकच लोभसवाणं.
मोरपीसाकडे बघीतल्यावर डोळ्यांना सौंदर्य दिसते तर मनाला ऐश्वर्याचा भास होतो म्हणूनच मनाने सुंदर आणि ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या स्त्री व्यक्तीमत्वाला मोर आणि मोरपीस यांचे वेड कायम आहे. अशाच वेडावलेल्या क्षणी मी काढलेल्या मोराच्या काही रांगोळ्या इथे पोस्ट करते आहे.
anjali-rangoli.blogspot.com

विजयादशमी ( २०१७ ) निमित्त
विजयादशमी ( २०१७ ) निमित्त :
" शमी शमयते पाप शमी शत्रुविनाशनी।
धारिष्यार्जुनबाणानां रामस्य प्रिय वाहिनी। "
विजयादशमीच्या दिवशी श्री रामांनी रावणावर विजय मिळवला. हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय किंवा प्रकाशाने अंधारावर मिळवलेला विजय या अर्थाने ही ओळखला जातो. नवसंकल्पनांचा प्रारंभ ही आजच्या दिवशी करायचा असतो. सर्व वाचकांना दस-याच्या खुप खुप शुभेच्छा ...... तुम्हा सर्वांच्या मनातील
नवसंकल्प पूर्ण होवोत एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना .........

Subscribe to:
Posts (Atom)