रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या






 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त काढलेली  गणपतीची ही  रांगोळी तुम्हालाही खुप आवडेल. नारंगी ,पिवळा आणि लाल रंगाच्या छटांच्या साह्याने   आणि पांढऱ्या रंगाच्या रांगोळीने गणपतीच्या आकृतीला उठावदार केलेले आहे. अनेक  रंगांचा वापर टाळून  फक्त ठराविक  रंगांच्या छटांचा वापर प्रभावी पणे करून तुम्हाला हवा असलेला आकार तुम्ही उठावदार  शकता.

 

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन


काढायला सोपी पण योग्य रंगसंगतीने अधिक खुललेली ही रांगोळी सणाच्या दिवशी दारात काढायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. 

 

गणपती

 सूर्याच्या  मधोमध गणपतीचे मुख असलेली ही  रांगोळी  बघायला सुंदर आणि काढायला तितकीच सोपी आहे.  
  

रंग भरायला  वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट गणपतीची रांगोळी काढता येते.