#गुढी पाडवा २०२४
आपल्या मनात एक तरी अशी खिडकी असावी जिथे प्रत्येक भावना व्यक्त करता यावी. सुख- दुःख, राग - लोभ, इर्षा , मत्सर, प्रेरणा, दया, सगळया पासून विरक्तही होता यावे. अन् या विरक्तीचाही उत्सव वाटावा. मोकळे पणाने जगण्यासाठी अशी एक खिडकी हवीच.
आजच्या रांगोळीतही खिडकीत गुढी उभारलेली आहे. या खिडकीत फुलझाडांच्या कुंड्याही आहेत. बाहेरचा रंग जरा उडाल्या सारखा वाटत असला तरी आतल्या बाजूने मात्र प्रसन्न वातावरण असल्याची खात्री देणारा रंग आहे. खिडकी म्हंटली की पडदा ही आलाच पण आज त्याला बाजूला सारले आहे.
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी व आनंदाचे जावो हिच सदिच्छा.
रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/tzaOA9aIoAs?si=c_khJF-0OJdUAueX
चैत्रांगण... ही एक रांगोळी नसून आपली संस्कृती आहे.
कसे काढावे? बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/Fug5nWsVy9g?si=AESFct1eXLH4-12e
No comments:
Post a Comment