देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे मुख दर्शन ( नवरात्र २०१९)

#देवीच्या_साडेतीन_शक्तिपीठांचे_मुख_दर्शन

               नवरात्र म्हणजे शक्तीचा जागर.  नवरात्रात देवीच्या मुखावर प्रचंड तेज असते. या तेजस्वी रूपाच्या दर्शनाने आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते. संपूर्ण वातावरण जणू आध्यात्मिकतेने भारावून गेलेले असते. मूर्तीतल्या दिव्य तेजाचे शक्ती रूप बघितल्यावर जी अनुभूती होते ती शब्दात सांगणे कठीण.

        सगळ्यांनाच हा अनुभव घ्यायचा असल्याने देवीच्या मंदिराकडे आपोआप आपली पाऊले वळतात. कधी नव्हे इतकी भक्तांची गर्दी मंदिराच्या गाभाऱ्यात जमते.  देवीचे मनोहरी  रूप आपल्याला आपल्या डोळ्यात साठवायचे असते म्हणून आपण नतमस्तक होवून ते रूप टिपण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाच धक्‍का बुक्की सुरू होते.
प्रत्येकाला निवांत दर्शन घ्यायचे असते पण गर्दीत ते काही केल्या शक्य होत नाही.
दर्शन घेवूनही अनेकदा अपुरे पणाची भावना बोचत राहते. अनेकदा मंदिर परिसरात भक्तांची एवढी प्रचंड गर्दी असते की नाईलाजाने अनेक भक्त मंदिराचे ' कलश दर्शन ' यावर समाधान मानून माघारी जातात.

या अपुरे पणाच्या भावनेतूनच " साडेतीन शक्ती पीठांचे मुख  दर्शन " ही संकल्पना डोक्यात आली. एक भीती मनात वाटत होतीच. रांगोळीत देवीच्या दिव्य तेजाला साकारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भलतेच धाडस करतो की काय असं वाटतं होतं.
पण देवीचीच ही इच्छा असावी म्हणून  हे शक्य झाले.
मी केलं मी केलं असं म्हणून सृजनशीलतेच आपण कितीही श्रेय घेवू पहात असलो तरी ...... खरी सृजनशीलता ही त्या *शक्तीत* असते. तिने तुमची निवड केली तरच तुमच्या हातून काही निर्माण होवु शकते अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न करा सारे व्यर्थ.
  रांगोळीत चेहरा काढतांना माझी भंभेरी उडते आणि इथे नुसता चेहरा काढायचा नव्हता तर केवळ चेहऱ्यावरून देवी ओळखू यायला हवी होती. पण या रांगोळ्या मी काढाव्या ही कल्पना ही त्या शक्तीमुळेच सुचली होती  आणि प्रत्यक्षात  आली तेही त्या शक्ती मुळेच. मी केवळ साधन मात्र ......
आमच्या कडे कामाला येणाऱ्या मावशींनी जेव्हा सप्तशृंगी देवीची रांगोळी बघितली त्याही घटकाभर थांबल्या .... डोळेभरून देवीच रूप बघितलं आणि मला म्हणाल्या ," आम्ही दर्शनाला गेलो होतो वणीला ......... पण नुसती धक्का बुक्की .... नीट डोळे भरून बघताही आल नाही देवीला ...... नुसती ढकला ढकली ...... नंतर आठवून म्हंटल तरी देवीच रूप फार काही आठवत नव्हतं..... पण तुमची रांगोळी बघितली तेव्हा आठवलं ..... देवी अगदी हुबेहूब अशीच दिसते. तुमच्या मुळे देवीच निवांत दर्शन होतंय आज  " अस म्हणून त्यांनी हात जोडून डोळे मिटून घेतले . त्यांचं समाधान झालं तेव्हा बोलल्या ," मॅडम तुम्ही तुमची नजर काढून घ्या बर आज ..... कसली भारी कला आहे तुमच्या हातात. एक एक रूप काय सुंदर काढलयं रांगोळीत .... घरबसल्या साडे तीन  पीठांचे दर्शन घडवले तुम्ही ...... कमाल आहे तुमची....
..... काही झालं तरी नजर काढाच आज ... विसरु नका "
त्यांनी मन भरून घेतलेलं दर्शन, समाधानाने तृप्त होवून केलेलं कौतुक आणि त्यांची ही निरागस माया बघून रांगोळी काढल्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं.  म्हणून या रांगोळीच्या माध्यमातून  साडे तीन शक्ती पिठांचे दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न   ज्या भक्तांना मंदिरात जाऊनही मनासारखं दर्शन घेता येत नाही त्या सगळ्या भक्तांनाच समर्पित करते.....
या रांगोळ्यांमुळेच मला तुमच्यासारख्या अनेक वाचकांच्याही शुभेच्छा मिळत असतात. त्या अशाच मला मिळत रहाव्यात आणि माझ्या हातून सतत काही चांगले घडत जावे हीच इच्छा...
या नवरात्र निमित्त प्रत्येक स्त्रीने तिच्यात असलेल्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घ्यावी आणि हिच ऊर्जा कुटुंब, समाज, विश्व कल्याणासाठी वापरावी हिच सदिच्छा....
सगळ्या भक्तांवर तिची कृपा कायम असू दे....
सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा....
देवीच्या एकूण ५१ शक्ती पीठांपैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहेत म्हणून त्यांचा मान मोठा आहे. असं ऐकिवात आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचेतुळजापूरच्या तुळजाभवानीचे
 आणि माहूरच्या रेणूकादेवीचे मंदिर अशी ही तीन पूर्ण पीठे तर वणीच्या सप्तःशृंगीचे हे अर्ध पीठ आहे.
या रांगोळ्यांमधे मुद्दामहून सगळ्यांना हिरवी साडी नेसवलेली असून सगळ्यांची नथ ही एकाच प्रकारची आहे.
रेणुका माता आणि सप्तश्रृंगी देवीच्या मुखा मधे तांबूल ही आहे.
 आई अंबा बाईचा उदो उदो
©️ अंजली मीनानाथ धस्के

                    कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी




तुळजापूरची तुळजाभवानी माता


माहूरची रेणुकामाता



वणीची सप्तशृंगी देवी


देवीची साडतीन शक्ती पीठे



रांगोळीच्या माध्यमातून देवीच्या साडेतीन शक्तिपीठांचे मुख दर्शन घडवण्याचा छोटासा व्हिडिओ








बाल गणेश (गणेश उत्सव २०१९)

    #बाल_गणेश     
        गणेश उत्सव  २०१९ निमित्त काढलेली रांगोळी :
खरं तर बाप्पाचे कोणतेही रूप मोहकच असते . या वर्षी बाप्पाचे बाल  रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला.
बाप्पाचे हे बाल रूप  निरागस , लोभस वाणे आहे . बाप्पाचा हाच गोंडसपणा सृष्टीतील प्रत्येक  वस्तू, प्राणी , पक्षी यांच्या  बाल रुपात बघायला तर निरागसपणा अनुभवायला  मिळतो .
म्हणूनच कदाचित आपण " लहान मुलांमधे देव असतो  " असं म्हणतो.
बाप्पाचा बाल रूपाला समर्पित ही रांगोळी ...... तुम्हालाही आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि नावा सहीत शेयर करायला विसरु नका.
सगळ्यां वाचकांना  गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.......
©️ अंजली मीनानाथ धस्के