पूर्ण चंद्र बघून मन मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही . बालपणी चांदोबा... चंदामामा... अशी त्याची ओळख करून दिली जाते. तारुण्यात याच चंद्रा मधे आपण आपल्या भावी जोडीदाराचे रुप शोधू पाहतो. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला पाहून .... त्याच्या शीतल प्रकशात मन चिंब भिजते... चंद्राला पाहून जशी समुद्राला भरती येते तशीच माझ्या मनातील भावनांना ही भरती येते.... शब्दरुपी लाटांनी मन व्यापून जाते. नशेत व्यक्ती आपली मातृभाषा सोडून इतरही भाषा आत्मविश्वासाने बोलते अगदी तसेच मंद शीतल चंद्रप्रकाशाची नशाच अशी आहे की ...... माझे मन ही शायराना झाले. हिंदी भाषा .... माझा प्रांत नाही तरी प्रेमात सगळे माफ असते. चंद्रावरच्या प्रेमासाठी ...... चंद्राला समर्पित.........
No comments:
Post a Comment