Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
गणेश उत्सव ( प्रथम दिन )
स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धीदम ।
बल्लाळो मुरुडम विनायक मढम चिंतामणी : थेउरम ॥
लेण्याद्री गिरिजात्म्जम सुवरदम विघ्नेश्वरम ओझरम ।
ग्रामे रांजण संस्थितो विजयताम कुर्यात सदा मंगलम ॥
गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले आहे. त्यांच्या सेवेसाठी लहान -थोरांची तयारी ही जय्यद झालेली आहे. तर मग मंगलमय रांगोळ्यांना विसरून कसे चालेल. माझ्या या रांगोळ्या आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी सप्रेम भेट ……
गणेश उत्सवासाठी अष्टविनायक रंगोळीत रेखाटण्याच्या माझ्या प्रयत्नाला मोरगांव च्या मोरेश्वराला नमन करून सुरुवात करत आहे. तुम्हालाही या रांगोळ्याच्या प्रवासात सामिल व्हायला आवडेल न.… , तर मग तुमचा अभिप्रय कळवायला विसरु नका. ब्रम्हा, विष्णू , महेश ,शक्ती आणि सूर्य या पाच देवतांनी मोरेश्वर गणपतीची स्थापना केली आहे. याच ठिकाणी सिंधू व कमलासूर दैत्यांचा संहार करतांना गणपतीचे वाहन मोर होते. त्यामुळेच या गणपतीला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली आहे.
(गणेश मंडळाच्या मंडपात कमी रंग वापरून तयार केलेल्या या गालीच्यामधेही तुम्ही श्री गणेशाची ही रांगोळी प्रभावीपणे काढू शकता. )

( ४) श्रावण सोमवार २०१५
महादेव हे लोकांना अध्यात्मिक भक्तीसाठी सदैव प्रेरीत करत आलेले आहेत. " संसारात राहुनही संन्यासी बनतां येतं" हे आपल्याला त्यांच्याकडुन शिकतां येत. संन्यासाच प्रतिक म्हणजे , ' मस्तकावर रेखाटलेल्या विभूतीच्या तीन रेषा ' . महादेवाचे त्रिशुल हे ' मद , मत्सर आणि मोह ' या तीन वाईट गुणांवर नियंत्रण करण्याचे सुचवते . म्हणूनच विभुतीचे तीन पट्टे आणि त्रिशुल असलेले गंध शिवभक्तांच्याच मस्तकावर शोभून दिसते. आज श्रावणातला शेवटचा सोमवार तेव्हा शिवाला आणि शिवभक्तांना माझे शत् शत् प्रणाम.
गोकुळाष्टमी २०१५
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त काढलेली ही रांगोळी कृष्णाच्या मंत्रमुग्घ करणा-या बासरीच्या मधुर सुरांची आठवण आपल्याला करून देते. कृष्ण म्हणताच सर्व प्रथम डोळ्यांसमोर उभी राहते," ती कृष्णाची निळसर कांती असलेली काया, त्यातील मुकुटावर दिमाखात मिरवणारे मोरपिस आणि हातातील बासरीवर हळूवार फिरणारी कृष्णाची बोटे". गोकुळाष्टमीचा हा सण कृष्णलीलांना उजाळा देणारा आहे. सर्व वाचकांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा .
शिक्षक दिन २०१५
शिक्षक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आयुष्याच्या नव्या को-या पाटीवर आपण त्यांच्याच सहाय्याने " श्री गणेशाय नम: " लिहून शैक्षणिक वाटचालीला सुरूवात करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर ज्यांनी मला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरीत केलं अश्या माझ्या सर्व शिक्षकांना "शिक्षक दिना निमीत्त" माझे भावपुर्ण नमन.
Subscribe to:
Posts (Atom)