जागतिक कुटुंब दिनानिमित्त काढलेली साधी , सोपी रांगोळी असली तरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. वारली कलेत ज्या प्रमाणे मनुष्याकृती काढतात त्याचाच वापर मी या रांगोळीत केला आहे. मध्यभागी आपली वसुंधरा आणि तिच्या सभोवती आनंदाने नृत्य करणारे स्त्री -पुरुष " अवघे विश्वची माझे घर " हा संदेश आपल्याला देतात. आपल्या देशाच्या विविधतेत असलेली सुंदरता दर्शवण्यासाठी सगळे स्त्री -पुरुष एकाच रंगाने न काढता मुद्दामच मी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे. खरतर त्यामुळेच ही रांगोळी बघणाऱ्याच्या मनाला अधिक भावते .

वसुधैव कुटुंबकम

No comments:
Post a Comment