दिवाळी बलिप्रतिपदा निमित्त २०२० काढलेली ही रांगोळी
बलिप्रतिपदा ही बळीराजाची उत्सव म्हणुन साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सिंधू संस्कृतीतील बैलाचे चित्र रांगोळीत रेखाटून धान्याच्या राशीने ही रांगोळी सजविण्याची पद्धत आहे.
या दिवशी थोडे धान्य एकमेकांना दिले जावे आणि ते देताना " इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो" असे म्हणावे अशी प्रथा आहे.
त्याला अनुसरून काढलेली माझी ही रांगोळी आहे.
या रांगोळीला "सत्यशोधक प्रबोधन महासभा" यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
याच स्पर्धेत माझ्या मुलाने ही सहभाग नोंदवला होता. त्याच्या रांगोळीला विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के
माझी रांगोळी: प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले