दिवाळी : 2017 ( कविता आणि काही रांगोळ्या )

 दिवाळी हा  सण म्हंटला  की  मनात  आनंदाचे , पवित्र्याचे  आणि मांगल्याचे वातावरण रुंजी घालते. म्हणूनच खास दिवाळीला समर्पित ही कविता आणि  काही रांगोळ्या इथे पोस्ट करते आहे.
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


संभ्रम ( रांगोळ्या आणि कविता )

संभ्रम -------  खर तर मानवी मनाची ही अवस्था अनेक छोट्या -मोठ्या बाबतीत होतच असते.  दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नाची उत्तरे  शोधल्यास ती आपल्याला संभ्रमित करणारी असतात.  अशाच मला पडलेल्या  काही  प्रश्नाची उत्तरे शोधतांना  तयार झालेली ही कविता ...... म्हणून तीच नाव " संभ्रम ". 
   या कवितेला अनुसरुन  काही रांगोळ्याही आहेत. कविता आणि रांगोळ्या आवडल्यास अभिप्राय कॉमेंट बॉक्स मधे नक्की नोंदवा. 

©️अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३











लग्नाच्या ११ व्या वाढदिवसा निमित्त काढलेली रांगोळी

लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त काढलेली रांगोळी : 

     आज (१६/३/२०१८ ) आमच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. हा कालावधी खुप मोठा असला तरी एकमेकांच्या साथीने तो इतक्या जलद गतीने गेलाय की विश्वास बसत नाही........तब्बल ११ वर्ष झालीत संसाराला सुरुवात करून.   चांगल्या वाईट अनुभवातून शहाणपण येत गेलं  आणि संसार अधिक फुलंत गेला. आमच्या दोघांचे स्वभाव वेगळे तरी एकमेकांना समजून घेत, समजूत काढत, रूसत, मनवत, कधी छोटे छोटे आश्चर्याचे धक्के देत, हट्टी पणा करत तर कधी माघार घेत दिवसा मागून दिवस गेले. एकमेकांना समजून घेता घेता एकमेकांच्या आवडी-निवडी ही आपोआप जपल्या जावू लागल्या. माहेरची ओढ असलेल्या  माझ्या मनाला हळूहळू एकमेकांच्या सहवासाची सवय होवू लागली. संसार वेलीवर एक गोंडस फुलही उमललं. एकमेकांच्या साथीने मुलाच्या संगोपनाचा कठीण काळही सोपा झाला. लोणच्या सारखं आम्ही ही आमच्या संसारात मुरत गेलो. संसाराचा एक मोठा टप्पा पार करतोय.....अजून खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रत्येक स्त्री च्या मनात तिचा जोडीदार आणि त्याच्या सोबत फुलत गेलेला संसारच असतो म्हणून माझी आजची ही रांगोळी माझ्या जोडीदाराला आणि त्याच्या सोबत फुलत गेलेल्या माझ्या संसाराला समर्पित करते.
  या मंगल प्रसंगी तुम्हा  सर्व वाचकांच्या शुभेच्छा सदैव पाठीशी असू दया......हीच ईश्वर चरणी प्रार्थना
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३