Labels
- सण (212)
- कथा (78)
- डिझाइन (78)
- लेख (60)
- गणपती (57)
- थेंबाची रांगोळी (45)
- रोजची रांगोळी (41)
- दिवाळी (39)
- १०० शब्दांची गोष्ट (35)
- कविता (31)
- नवरात्री/.दसरा (26)
- बॉर्डर (19)
- मोर (17)
- व्यक्तिचित्र (13)
- गुढीपाडवा (11)
- शायरी (10)
- निसर्ग चित्र (7)
- वाढदिवस (7)
- व्हॅलेंटाईन डे (7)
- स्थिर - चित्र (5)
- अलक (2)
- पाटाभोवती काढायची रांगोळी (2)
- समीक्षा (2)
- 3D रांगोळी (1)
- उखाणा (1)
- चारोळ्या (1)
- नवरात्री (1)
- सुविचार (1)
- स्थळ (1)
आंतरराष्ट्रीय योग दिन ( २१-६- १५ )
ही आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त काढलेली रांगोळी आहे. योगासनाचे महत्त्व आता साऱ्या जगाला पटू लागले आहे. तरीही माझ्या सारखे बरेच जण असतील जे व्यायामाला " उदया पासून नक्की सुरुवात करू " म्हणत टाळत असतील , तेव्हा माझ्या सारख्यां साठी व्यायाम सुरु करण्याची " आंतरराष्ट्रीय योग दिन " ही एक सुवर्ण संधीच आहे . या वर्षी मी खरच व्यायामाला ( योग ) सुरुवात केली आहे. तुम्हीही पुढच्या वर्षीच्या योग दिनाची वाट बघू नका. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ति आहे.
जागतिक पर्यावरण दिन आणि संकष्ट चतुर्थी
जागतिक पर्यावरण दिन आणि संकष्ट चतुर्थी यांचा सुरेख संगम साधण्यासाठी काढलेली ही रांगोळी आहे . रांगोळीतील गणेशाचे रूप पाहून मनाला प्रसन्नता तर लाभतेच, सोबत पानांचा हिरवा रंग डोळ्यांना थंडावाही देतो. रांगोळीतील हिरवा रंग केवळ रांगोळीत न राहता आपल्या सभोवतालच्या परीसरात सजीव व्हावा म्हणून प्रत्येकाने झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा प्रयत्न करायला हवा. कुंडीत लावलेल्या झाडाला जेव्हा फुलं येतात तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. ही रांगोळीतं काढून बघाच ,पण कुंडीत एक रोपही नक्की लावून बघा.
फुल्यांची रांगोळी
या रांगोळीत थेंबा ऐवजी फुल्यांचा ( # या चिन्हाचा ) वापर केलेला आहे. कोलम या सणाला तांदळाच्या पीठाने या रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे. फुल्यांच्या ( # ) रेषा एकमेकांना विशिष्ट पद्धतीने जोडल्यास या रांगोळ्या तयार होतात. फुल्यां मधील रेषांची संख्या वाढवल्यास रांगोळी ही वाढत जाते. गेरू किंवा शेणाने सारवलेल्या अंगणात ही रांगोळी काढल्यास या रांगोळीत रंग भरण्याची गरज भासत नाही.
वटपौर्णिमा
सगळ्या वाचक मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज प्रत्येक स्री वडाच्या झाडाची मनोभावे पुजन करून" जन्मोजन्मी हाच पती लाभो " अशी प्रार्थना करते. संस्कृतिचे जतन करतांना काळाची गरज लक्षात घेवून "वृक्ष लागवड आणि संवर्धन " हा वसा जर प्रत्येक स्रिने घेतला तर सिमेंटच्या या जंगलात पुन्हा हिरवळीचे राज्य पसरायला वेळ लागणार नाही.
Subscribe to:
Posts (Atom)