दिवाळी \ लक्ष्मी पूजन निमित्त (२०१७)

दिवाळी 

दिवाळी आली.......दिवाळी आली.......
आली दिवाळी पहाट,
लेवुन सुगंधी उटण्याचा साज..
अभ्यंग स्नानाच्या पावित्र्याने ,
कोवळी किरणं न्हाली..
दिवाळी  आली.......दिवाळी आली.......
सारवुन झाले, सडा ही शिंपला ,
घराघरात लगबग सारी..
झेंडू फुलांची तोरणे ही माळली,
रांगोळी सजली दारोदारी..
दिवाळी  आली.......दिवाळी आली.......
परंपरेचा बाज हा सारा ,
संस्कृतीचा साज ही न्यारा..
चिवडा चविष्ट , चकली खमंग झाली,
जिभेवर करंजी, लाडवाची गोडी ही आली..
दिवाळी  आली.......दिवाळी आली.......
सुख , समृध्दी , समाधान घेवून ,
एैश्वर्य , संपत्ती , नाविन्य लेवून..
दिव्यांच्या तेजात सांज उजळली,
लक्ष्मी देवताही प्रसन्न झाली..
दिवाळी  आली.......दिवाळी आली.......
                                               

दिवाळी हा सण दिव्यांचा आहे. या दिवशी आपण लक्ष्मी देवतेचे पूजनही करतो. लक्ष्मीची विविध रूपे  आहेत. गजलक्ष्मी हे ही लक्ष्मीचेच रूप. गजलक्ष्मी उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश करते आहे. हे चित्र जेव्हा मी बघितले तेव्हाच मी या चित्राच्या मोहात पडले . कमळ कळयांचा मुकुट ल्यालेली , चेहऱ्यावर सात्विक भाव असलेली आणि माप ओलांडून घरात धनधान्याची भरभराट घेवून येणारी ही गजलक्ष्मी आपण सर्वांना प्रसन्न होवो........
दिवाळीच्या सर्व वाचकांना  खूप  खूप  शुभेच्छा........
( कविता व रांगोळी आवडल्यास कॉमेंट बाॅक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका.)
No comments:

Post a Comment