आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ \ ०६ \ २०१६ )

आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ \ ०६ \ २०१६ ) :

योग हा निव्वळ व्यायाम न मानता त्याचा स्वीकार एक चांगली सवय म्हणून करायला हवा. योगामुळे आपल्याला  उत्साही आणि आरोग्यदायी व्यक्तिमत्व तर लाभतेच,सोबत  शारीरिक आणि मानसिक ताणतणाव यांचे व्यवस्थापन ही साधले जाते. सकारात्मक बदलासाठी आयुष्यात योग हा हवाच.
सर्व वाचकांना योग दिनानिमित्त आरोग्यदायी जीवनासाठी खूप  शुभेच्छा........

 

फादर्स डे निमित्त ( १९ \ ०६ \ २०१६ )

फादर्स डे निमित्त ( १९ \ ०६ \ २०१६ ) :

डैडी ते बाबा , पप्पा  आणि आबा आश्या  अनेक नावाने ज्यांना आपण संबोधतो ते म्हणजे आपले वडील. आपल्याला  ठेच लागल्यावर आपल्या तोंडून " आई ग .... " च निघतं  परंतु  जेव्हा एखादं मोठ्ठ संकट येतं तेव्हा आपण " अरे बाप रे ....... " असच म्हणतो  .  मोठ्ठ्या संकटांशी सामना करायचा असतो तेव्हा आपल्याला  बाबाच  हवे  असतात . स्पर्धेत जिंकल्यावर देवा समोर पेढा ठेवणारी आई आठवते आपल्याला पण गुपचुप मिठाईच्या दुकानात जाणारे बाबा  आठवत नाहीत. चुकल्यावर रागवणारे , प्रसंगी मारणारे  बाबा चटकन आठवतात  पण तेच बाबा  आपल्याला  हॉस्टेल वर सोडतांना कुशीत घेवून डोळे ओले करतात हे  मात्र आठवत  नाही. नेहमीच  कर्तव्य पूर्ण करणार-या  बाबांना , प्रेम मात्र   व्यक्त  करता येत नाही. नारळ जसे बाहेरून कठीण असते, तसेच आपले बाबा ही आपल्याला कड़क शिस्तीचे वाटत असले तरी ते मनाने फार हळवे असतात.  बाबांच  आपल्या  आयुष्यात खुप महत्व आहे , जसं जेवणातलं  मीठ डोळ्यांना दिसत नाही पण ते उत्तम स्वादासाठी असावं मात्र लागतं.    फादर्स डे निमित्त माझ्या व सर्व वाचक  वडिलांना खूप खूप  शुभेच्छा.

(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


वटपौर्णिमा (१९ \०६ \२०१६)

वटपौर्णिमा (१९ \०६ \२०१६) :

काळाची गरज लक्षात घेता, प्रत्येक स्त्रीने आज  केवळ वटवृक्षाचे पूजन करण्यावरच न थांबता  एक वटवृक्ष लावण्याची आवश्यकता आहे. हे व्रत आपण आपल्या पतिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतो. म्हणूनच आज  एक वृक्ष लावल्यास  आपल्या पतिला च नव्हे तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांनाही उत्तम आणि निरोगी आरोग्याची देणगी आपण देवू शकतो. चला तर मग " एक पाऊल पुढे जाऊया  , एक झाड लाऊया .  सर्व वाचक मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप  शुभेच्छा.

 

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या :


                                                                   डिझाइन क्र. १

 
डिझाइन क्र. २  

 
डिझाइन क्र. ३ 

 
डिझाइन क्र. ४ 
 
 
डिझाइन क्र. ५  





 

पर्यावरण दिन (५ जून २०१६ )

पर्यावरण दिन (५ जून २०१६ ) :

सद्य परिस्थितीत पर्यावरण दिनाचे महत्व अधिक आहे. या दिनानिमित्त तरी आपण अधिकाधिक झाडांची लागवड आणि संगोपन करायला हवे. तसेच पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पुनर्वापर होणा-या  वस्तुंचाच वापर करणे गरजेचे आहे. "अजूनही वेळ गेलेली नाही, पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी "झाडे लावा, झाडे जगवा"ही म्हण प्रत्यक्ष्यात आणा  आणि वस्तुंचा पुनर्वापर करा ," हेच तर पृथ्वी आपल्याला सांगत आहे.
सगळ्या वाचकांना पर्यावरण दिनाच्या खूप  शुभेच्छा।