गजानन महाराज प्रकट दिन (१ / ३ / २०१६ )

गजानन महाराज प्रकट दिन (१ / ३ / २०१६ ):

" गण गण गणात बोते " च्या गजरात शेगावच्या गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा उत्सव मोठया उल्ल्हासात साजरा होतो. माझा हा रंगोळीचा प्रयत्न गजानन महाराज यांच्या चरणी सादर अर्पण आहे.

 

 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

 आजच्या चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी



 तुम्हालाही झटपट काढता येईल अशी एकदम सोपी गणपतीची रांगोळी आहे.

 

व्हॅलेंटाईन डे ( २०१६ )

व्हॅलेंटाईन डे ( २०१६ ) :
खऱ्या प्रेमाची एक निराळीच गंमत आहे. खऱ्या प्रेमाला एक आयुष्यही पुरेस नाही आणि खऱ्या प्रेमाचा एक क्षणही आयुष्य जगण्यासाठी पुरेसा असतो. सगळे प्रश्न प्रेम , समंजस्याने सोडवण्याकडे जरी आपला कल असला तरी, " माझं तुझ्यावर प्रेम आहे " असं सांगण्यासाठी खास एक दिवस साजरा करावा हे आपल्या संस्कृतीत  बसत नाही. काय हरकत आहे या धकाधकीच्या  जीवनात आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढून या दिवसाच्या निमित्ताने आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना आपल्या प्रेमाची कबुली देवून आणि ज्यांच आपल्यावर प्रेम आहे त्यांचे आभार  मानून हा दिवस साजरा केला तर. ... ........ ........
 आपल्या सभोवतालच्या सृष्टीतही प्रेमाचं वास्तव्य आहे. तेव्हा प्रेमाने जगा आणि मनातल्या  प्रेमाच्या भावनेलाही असचं जपा . हा संदेश देणारी ही रांगोळी ..... तुम्हाला ही प्रेरणा देणारी ठरेल.



व्हॅलेंटाईन डे निमित्तं साध्या सोप्या रांगोळ्या

व्हॅलेंटाईन डे निमित्तं बाजारात रेड हार्ट्स ची रेलचेल असते , इतर बरेच प्रकार गिफ्ट्स मधे उपलब्ध असले तरी हार्ट चा आकार आपल्याला अधिक जवळचा वाटतो. रांगोळीत ही हार्ट चा आकार काढून तुम्ही तुमच्या प्रियजनांच मन जिंकू शकता. कुटुंबातील प्रत्येक सदस्या साठी एक हार्ट काढून त्यांची आकर्षक रचना केल्यास तयार होणारी रांगोळी कुटुंबातील प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डे चा वेगळाच आनंद देऊन जाते.
व्हॅलेंटाईन डे निमित्तं काही साध्या सोप्या  रांगोळ्या  इथे देत आहे , तुम्हाला आवडल्या तर नक्की काढून बघा.




 

गणेश जयंती

गणेश जयंती निमित्त काढलेली ही रांगोळी दिसायला सुंदर आणि काढायला अगदी सोपी आहे.  गणेश  चरणी माझा सादर प्रणाम .......

 

हळदी - कुंकू कार्यक्रमानिमित्त (२०१६ )

हळदी - कुंकू कार्यक्रमानिमित्त (२०१६ ): आमच्या चैतन्य विहार सोसायटीच्या सगळ्या महिला एकत्र येवून सामूहिक हळदी -कुंकू चा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमातून उरणारी रक्कम ही गरजू संस्थांना मदत म्हणून दिली जाते. हा उपक्रम गेली तीन वर्ष सातत्याने सुरु आहे. त्या निमित्तानेच काढलेली ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल......

वटपौर्णिमा दर्शवणारी रांगोळी

वटपौर्णिमा दर्शवणारी रांगोळी :