( ३ ) श्रावण सोमवार २०१५

ही रांगोळी बघता क्षणीच  महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वहिले आहे असे  वाटते. परंतु फक्त काळ्या रंगाच्या रेखाटनावर लक्ष केंद्रित करता , " ध्यानधारणेत   मग्न असलेल्या महादेवाच्या मस्तकावर आध्यात्मिक शांततेची आणि परम सुखाची तेज वलये  निर्माण होत आहेत "  असा भास आपल्याला   होतो.  महादेवाचे   तीनही  डोळे  बंद असले  तरी त्यातील आध्यात्मिक शक्तीची जाणीव  आपल्या  मनाला स्पर्शून जाते. महादेवालाच  आपण  नीलकंठ असेही संबोधतो म्हणून रांगोळीत  निळ्या रंगाच्या छटांचाच वापर प्रभावीपणे करण्यावर भर दिलेला आहे.  चला तर मग रांगोळीच्या माध्यमातून आपणही शिव भक्तित लीन होवूया.



 

रक्षाबंधन २०१५

रक्षाबंधन म्हणताच बहिणीला आपल्या भावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भावासाठी  राखी  घेतांनाही आपण  मन लावून राखी  खरेदी करतो.   म्हणूनच  राखी बांधण्यासाठीचे ताट  आज   रांगोळीत  रेखाटण्याचा  प्रयत्न मी  केला आहे.  यात भावासाठीची  खास राखी  तर आहेच  परंतू  भावाला गंध  लावण्यासाठी कुंकु , अक्षता  तसेच ओवाळायला सुपारी आणि अंगठी ही आहे.  तोंड गोड करायला मिठाई सुद्धा हवीच.  चला तर मग भावाला राखी तर बांधूच पण दारात रांगोळीही रेखाटू या ……… सगळ्या वाचकांना रक्षाबंधनच्या खूप  खूप शुभेच्छा.





 

( २ ) श्रावण सोमवार २०१५



श्रावण सोमवार निमित्त काढलेली ही रांगोळी  पाहताच, मनात भगवान शंकर  यांच्याबद्दल असलेला भक्ति-भाव जागृत होतो. पारिजातकाच्या नाजुक फुलांचा हार  आणि  बेल पत्र  महादेवांच्या पिंडीवर  रेखाटलेले आहे. तसेच महादेवाचे प्रिय त्रिशूल आणि डमरू ही रेखाटले आहे. कोपऱ्यातल्या घंटा या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत अशी अनुभूति देतात. चला तर मग महादेवांच्या अखंड नामस्मरणात नतमस्तक होवुया.

 

( १ ) श्रावण सोमवार २०१५

श्रावण महिन्याचे आगमन म्हणजे अनेक व्रते, सण आणि उत्सव यांची सुरुवात असते. सोमवार हा भगवान शंकराचा  वार मानतात.   श्रावणातील सोमवार ह्यांना आगळे महत्त्व आहे. शंकर भगवान आणि ॐ या शब्दाचे अतूट नाते आहे. ओंकार  केल्याने   मनाचीच नाही तर शरीराचीही  शुद्धि होते अशी महती आहे.  आध्यात्मात  ओंकारला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शंकर यांच्या निळ्या रंगाची प्रभा आणि ॐ  या शब्दातील आध्यात्मिक  शांतीची अनुभूति देणारी ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच  रांगोळीच्या विश्वाकडे आकर्षित करेल.



रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन




१५ ऑगस्ट २०१५

  
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा 

रोज काढायची साधी सोपी रांगोळी

 रोज काढायची  साधी  सोपी  रांगोळी : 

रेषांची रांगोळी

रेषांची रांगोळी : मोठया  स्वस्तिकच्या प्रत्येक भागात चार -चार रेषा काढून त्या रेषा गोलाकारत स्वस्तिक च्या बाहेरून जोडून  तयार केलेली ही रांगोळी.
 

कलशाची व कमळाची रांगोळी

५ ते ५ थेंबाची (कलश) रांगोळी : कलश चिन्ह शुभ मानले जाते. ५ ते ५  थेंबांची रचना करून कलशाचे चिन्ह काढले आहे. यात रंग भरल्यामुळे ही रांगोळी अधिक खुलते. तुम्ही एखाद्या  सणाला  ही  कलशाची रांगोळी काढू शकता.
( या दोन्ही रांगोळ्या तुम्ही देवघरात  किंवा तुळशी वृन्दावनासमोर ही काढू शकता. )

 
 
७ ते ७ थेंबाची ( कमळ ) रांगोळी :कमळ लक्ष्मीला खुप आवडते. डिझाइन म्हणुन कमळ काढणे शक्य नसल्यास थेंबाच्या सहाय्यानेही आपण कमळ रेखाटू शकतो. 

 
                                           (रंगाच्या अधिक छटा न वापरताही रांगोळी सुरेख दिसते. )

 

रोज काढण्यासाठीचे डिझाइन

रोज काढण्यासाठीचे स्वस्तिक  रांगोळीचे  प्रकार











 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी : श्री या अक्षराच्या सहाय्याने श्री गणेशाचे मुख तयार करण्याचा हा सुरेख प्रयत्न आहे.

फ्रेंडशिप डे निमित्त काढलेली रांगोळी

फ्रेंडशिप डे निमित्त काढलेली रांगोळी : मैत्री मधे नात्यांचे बंधन नसून हृदयांची सुरेख गुंफन असते. माझ्या सर्व मित्र व मैत्रिणींना फ्रेंडशिप डे च्या खुप खुप शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मिळणारा आनंद  मित्रांमुळे  वाढतो तर मिळणारे दुःख  मित्रांमुळेच कमी होते , तेव्हा  प्रत्येकाच्या आयुष्यात  हृदयांची ही  सुरेख गुंफन अशीच वाढत जावी हीच इच्छा.