लक्ष्मीच्या पावलांचे विविध प्रकार

 तुम्हालाही नक्कीच आवडतील असे लक्ष्मीच्या पावलांचे विविध  प्रकार इथे  दिलेले  आहेत . यापैकी  जो  प्रकार  तुम्हाला  काढायला  सोपा  आहे किंवा तुम्हाला आवडला आहे  त्या   प्रकारे  तुम्ही  लक्ष्मीचे  पाऊल  दारात  काढू  शकता. रोज  विविध   प्रकारे   लक्ष्मीचे  पाऊल  काढल्यास घराच्या  उंबरठ्याची  शोभाही  द्विगुणित  होते. तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्ही यापेक्षा वेगळ्या प्रकारेही लक्ष्मीचे पाऊल काढू शकता.











 

स्वस्तिकची रांगोळी

स्वस्तिकची  रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते आणि यात स्वस्तिक चे चिन्ह असल्यामुळे ही रांगोळी दारात

काढणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीला  कमळ  खूप   आवडते.  म्हणून  मी  या  रांगोळीतल्या  पाकळ्यांमधे 

 गुलाबी रंग भरून कमळाच्या फुलाचा आभास निर्माण केला  आहे. काढायला कठिण वाटत असली तरी ,

 प्रत्यक्षात सोपी आहे. यात थेंबाच्या ऐवजी फुल्यांचा ( + चिन्ह ) वापर केलेला आहे.   रांगोळी काढतांनाच्या

काही पायऱ्या  दिल्या आहेत. तुम्ही  या पायऱ्यांच्या मदतीने  ही रांगोळी काढून  तर बघा , तुम्हालाही ती नक्की

 जमेल. 

 

पायरी क्र . १ 
पायरी क्र . २ 




पायरी क्र . ३

पायरी क्र . ४

दारात कढ़ावयाची बॉर्डर




 

दारात कढ़ावयाची बॉर्डर

दारात कढ़ावयाची बॉर्डर ही जाण्यायेण्या च्या मार्गात असते . त्यामुळे ती छोटी आणि सुबक असावी. जेणे करून ती मोडल्याही जाणार नाही आणि दाराची शोभा ही वाढेल.

 


 

साध्या , सोप्या …… तरीही सुंदर


तीन फुलं आणि काही रेषा यांच्या साह्याने दिसायला सुंदर ....... काढायला सोपी अशी रांगोळी.

 
साध्याच रंगोळीला पोस्टाच्या टिकिटा सारखी बॉर्डर दिल्यामुळे ती अधिक सुंदर दिसते आहे. 
 
 
बोटांचे स्ट्रोक दिल्यामुळे साधी रांगोळीही वेगळी दिसायला लागते. 
 
 
 
 

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयेला भौतिक वस्तूंची खरेदी करतात. वास्तविक, कोणतीही भौतिक वस्तू अक्षय्य नसते. अक्षय्य राहतात ती मूल्ये आणि ती मूल्ये जोपासणाऱ्या संस्कृती . म्हणून चांगले विचार आणि चांगल्या भावना आपल्या मनात रुजवूया . अक्षय्य संस्कृतिची निर्मिती करू या.
 आपण अक्षय्य समृद्धी ,संपत्ती आणि संस्कृती साठी  कलश स्थापून पूजन करतो. या प्रेरणेतूनच साकारलेली ही रांगोळी ……

 

व्हॅलेंटाईन डे निमित्तं

घरात उपलब्ध असलेले आरसे , मोती आणि कुंदन वापरून काढलेल्या रांगोळीला सुशोभित केले आहे.

होळी

वाईट गोष्टींचे दहन आणि एका  चांगल्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी होलिका पूजन करण्याची प्रथा आहे. अशीच एक होळी कायम आपल्या मनात पेटलेली असावी , ज्यात मनात येणारे वाईट विचार जळून जावेत. ह्या प्रेरणेतून निर्माण झालेली रांगोळी.
 
होळी २०११